लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय | – Best 8 Remedies

लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय/ लघवी साफ न होण्याची कारणे/ लघवी करताना त्रास का होतो/ युरिन इन्फेक्शन ची लक्षणे /urine infection home remedies in marathi >>> आपल्या मानवी शरीरात अनेक कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था निर्मित असतात जसे की, अन्नसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, अभिसरण संस्था, प्रतिकारक संस्था, स्नायू संस्था, प्रजनन संस्था, चेता संस्था तसेच मूत्र संस्था आणि त्या प्रत्येक संस्थेची निसर्गतः स्वतःची अशी विशिष्ठ प्रकारची कार्य प्रणाली असते.

आपल्या मानवी आणि सजीव प्राण्यात यापैकी कोणत्याही एका जरी संस्थेत बिघाड निर्माण झाला किंवा कार्यप्रणालीमध्ये अडचण निर्माण झाली तर त्या संपूर्ण संस्थेवर आजारांचा शिरकाव होतो. लघवी साफ न होणे किंवा युरिन इन्फेकशन होणे, अथवा लघवी संबंधित इतर समस्या उद्भवणे हे, मूत्रसंस्थेत आजार झाल्याचे किंवा बिघाड झाल्याचे लक्षण आहे.

आपल्या घरातील सिंक मधील तुंबलेले पाणी साफ होणे किंवा पाईप द्वारे वाहवून जाणे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच आपल्या शरीरातून मल-मूत्र म्हणजेच लघवी बाहेर पडणे हे देखील अत्यंत गरचेचे आहे, लघवी साफ न झाल्याचा त्रास किंवा लघवी पूर्ण न झाल्याचा होणारा त्रास हा अत्यंत भयानक आणि त्रासदायक असतो, तो कमी करण्यासाठी, अथवा होऊ नये यासाठीच आम्ही हा लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय urine infection home remedies in marathi , हा लेख घेऊन येत आहोत, जेणे करून तुम्हाला या आजाराची कारणे आणि या इन्फेकशन ची लक्षणे लक्षात येतील, आणि तुम्ही या त्रासापासून स्वतःचे रक्षण करू शकता.

लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय/ लघवी साफ न होण्याची कारणे
लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय/ लघवी साफ न होण्याची कारणे/ लघवी करताना त्रास का होतो/ युरिन इन्फेक्शन ची लक्षणे /urine infection home remedies in marathi

लघवी साफ न होणे, लघवी करताना आग होणे, जळजळ होणे असो अथवा मूतखडा होणे असो, यासर्व मूत्रसंस्थेच्या आजाराचे आणि तक्रारी उद्भवण्याचे मूळ कारण हे शरीरातील पाणी कमी होणे हे आहे. सहसा उन्हाळ्याच्या दिवसात बर्‍याच लोकांना अश्या लघवी साफ न होणे, सतत थोडी थोडीच युरिन येणे, लघवी होत असताना प्रचंड आग होणे ह्या तक्रारींचा भडीमार होतो, आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्यात घाम येणे, तप्त उन्हामुळे शरीराला पाणी कमी पडणे आणि त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन या दिवसात लघवीतील क्षाराचे प्रमाण हे अधिक वाढते आणि वरील सर्व त्रास सुरू होत असतात.

लघवी साफ होण्यासाठी आणि शरीरातील क्षार आणि खर शरीरातून लघवीवाटे निघून जाण्यासाठी शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते अन्यथा हे क्षार आणि खर तसेच लघवी साफ न झाल्यास प्रचंड यातनाचे कारण ठरू शकतात. सुरूवातीला आपण जाऊन घेऊया की, लघवीला त्रास का होतो, याचे नेमके कारण काय आहे?

लघवी करताना त्रास का होतो/ लघवी साफ न होण्याची कारणे-

आपल्या शरीराबाहेर पडणारी ही लघवी म्हणजेच युरिन आपल्या शरीरातील बर्‍याच अडचणी समोर आणते, आणि बरेच काही सांगून जाते. लघवीचा बदलेला रंग आपल्या शरीरात काही तरी बिघाड झाल्याचा, इशारा आहे. असे समजावे. त्यामुळे शक्यतो लघविला अत्यंत त्रास होत असेल तर तो अंगावर न काढता, त्वरित वैद्यकीय सल्ला देखील घ्यावा. युरेट्रल सिंड्रोम चा विकार झाल्याने किंवा डिसूरिया झाल्याने तसेच युरिण इन्फेक्शन झाल्याने लघवी करताना त्रास होतो.

मूत्र संस्थेत काही जखम किंवा बिघाड झाल्यास देखील लघवी करताना त्रास होतो आणि त्यावर योग्य वेळी योग्य औषधोपचार झाला नाही गंभीर आजाराला आमंत्रण होऊ शकते, त्यामुळे वरील पैकी कोणताही त्रास झाल्यास किंवा रंग बदलल्यास त्यावर उपाय करावेत आणि अधिक त्रास जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. आता आपण पाहूया की, युरिन इन्फेक्शन ची लक्षणे काय आहेत?

युरिन इन्फेक्शन ची लक्षणे-

लघवी करताना त्रास का होतो/ युरिन इन्फेक्शन ची लक्षणे /urine infection home remedies in marathi
लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय/ लघवी साफ न होण्याची कारणे/ युरिन इन्फेक्शन ची लक्षणे /urine infection home remedies in marathi

युरिन इन्फेक्शन तसे कुणालाही होऊ शकते, लहान मुलगा मुलगी, वयस्क व्यक्ती, मध्यम वयस्क किंवा वयोवृद्ध व्यक्ती, स्त्री असो वा पुरुष मूत्रसंस्थेत अडचण निर्माण झाल्यास, युरिन इन्फेक्शन होऊ शकते, परंतु जर लघवी वाटे रक्त पडत असेल किंवा गंभीर त्रास होत असेल तर आजार वेगळा असू शकतो, अशा वेळी लघवी तपासणी, रक्त तपासणी या चाचण्या कराव्या लागू शकतात. या परिच्छेदामध्ये आपण युरिन इन्फेक्शन ची लक्षणे काय आहेत हे पाहणार आहोत, जेणे करून तुम्हाला योग्य तो घरगुती उपचार करता यावा आणि इतर आजार असेल तर त्यावर उपचार घेता यावेत.

सतत लघवी आल्यासारखी वाटणे

जर युरिन इन्फेक्शन झाले तर, लघवी पूर्ण न झाल्यासारखी वाटत असते. युरिन इन्फेक्शन हे आतील किंवा बाहेरील देखील असू शकते. जर तुम्हाला सतत सारखी सारखी लघवी आल्यासारखी वाटत असेल, युरिन ला गेल्यानंतर पूर्ण मूत्र विसर्जन होत नसेल तर समजावे की,याचे कारण म्हणजे यूरीन इनफेक्शन झालेले असू शकते.

लघवी करताना जळजळ होणे

युरिन इन्फेक्शन झालेले असल्यास लघवी होत असताना किंवा करत असताना अतिशय त्रासदायक वेदना होऊन खूप जळजळ होत असल्यासारखे वाटते. म्हणजे शरीरातून लघवी बाहेर पडत असताना आग होते हे लक्षण देखील तुम्हाला युरिन इन्फेक्शन झाले असण्याचे आहे.

लघवीचा दुर्गंध येणे

शरीरात किंवा लिव्हर ला काही आजार झाल्यास आणि युरिन इन्फेक्शन झाल्यास, शरीराबाहेर विसर्जित होणार्‍या मुत्रास एक प्रकारचा दुर्गंध येतो, त्यामुळे लघवीचा दुर्गंध येणे हे देखील युरिन इन्फेक्शन झाल्याचे, एखाद्या आजाराचे लक्षण असू शकतो. तसेच शरीरातील बदलाचा इशारा असतो. लघवीत संसर्ग झाल्यास वास येतो. त्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करावे त्याने दुर्गंधी कमी होते.

लघवीचा रंग बदलणे

 युरिन इन्फेक्शन ची लक्षणे /urine infection home remedies in marathi
युरिन इन्फेकशन ची लक्षणे

आपल्या शरीराबाहेर पडलेल्या लघवीचा बदलेला रंग शरीरातील बर्‍याच गोष्टी सांगून जातो. हा बदलेला लघवीचा रंग म्हणजे वेगवेगळ्या आजाराचे लक्षण देखील असू शकते त्यामुळे आपल्या लघवीचे प्रमाण आणि त्याचा रंग याकडे आवर्जून लक्ष द्यावे. लघवीचा रंग वेगवेगळ्या आजारचे लक्षण असू शकते. जसे की,

  • हलगा पिवळा रंग – लघवीचा फिका पिवळा रंग पाण्याचे योग्य प्रमाण असल्याचे लक्षण आहे तर;
  • गडद पिवळा रंग – गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे हे, पाण्याचे प्रमाण कमी असल्याचे , कावीळ आजार झाल्याचे किंवा लिव्हर चा आजार झाला असल्याचे लक्षण आहे.
  • पांढरा रंग – मूत्राशयाचा आजार, मूतखडा, आणि लघवी मध्ये कल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण असल्याचे लक्षण म्हणजे पांढर्‍या रंगाची लघवी होणे आहे.
  • हलका जांभळा रंग – प्रोफायरिंस च्या चयापचाय यात समस्या निर्माण झाल्यास, लघवीवाटे प्रोफ्यरिण जाते त्यामुळे लघवीचा रंग जांभळा होतो.
  • नारंगी रंग – क जीवनसत्व वाढल्याने, अति गाजर खाल्याने, अॅंटीबायोटिक्स घेतल्याने लघवीला नारंगी रंग येतो.
  • लाल रंग – जर रक्त जात असेल तर अथवा शरीरातील उष्णता अतिशय वाढल्याने तसेच मूत्राशय मार्गात जखम झाल्याने लाल रंगाची लघवी होते, हे लक्षण अतिशय गंभीर असू शकते म्हणून तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • हिरवा किंवा तपकिरी रंग – कुठल्या संसर्गासाठी वेदनाशामक गोळ्या घेतल्यास असा लघवीचा हिरवा रंग येतो.

थोड्याच प्रमाणात लघवी होणे

युरिन इन्फेक्शन झालेले असल्यास लघवी आलेली असली तरी देखील ती पूर्ण होत नाही सतत अडखळत होते आणि अगदी थोड्या थोड्या प्रमाणात होत असते.

लघवी म्हणजेच युरिन इन्फेक्शनची वरील सर्व लक्षणे आहेत. आता आपण लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत ते पाहूया

लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय/urine infection home remedies in marathi

तर वरील सर्व झाले लघवीचे म्हणजेच युरिन इन्फेक्शन झाल्याची लक्षणे आता आपण पाहूया की, यावर कोणते उपाय केल्याने लघवी साफ होते किंवा लघवी साफ होण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत.

जास्त पाणी पिणे

लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय
जास्त पाणी पिणे- लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय/urine infection home remedies in marathi

दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे हे उत्तम आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या शरीराला दिवसभरात कमीत कमी 5 ते 6 ग्लास पाणी लागते त्यामुळे सर्व अनावश्यक घटक लघवी वाटे बाहेर पडण्यास मदत होते तसेच साफ आणि त्रास विरहित लघवी होते.

क्रांबेरी चा रस प्यावा- लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय

क्रांबेरीच्या रस मध्ये प्रोन्थोसायनिडिस सक्रिय असते आणि हा घटक मूत्रमार्गातील बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते, आणि त्यामुळे लघवी साफ होण्यास मदत होते.

नारळाचे पाणी पिणे

शरीरातील अपुर्‍या पाण्याचे प्रमाण भरून काढण्याचे कार्य शाहळ्याचे पाणी म्हणजेच नारळाचे पाणी पूर्ण करते त्यामुळे लघवी साफ होत नसेल तर नारळाचे पाणी पिणे हा उत्तम उपाय आहे.

कलिंगडाचा रस पिणे

कलिंगड मध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते तसेच कलिंगड थंड गुणांनी परिपूर्ण असल्याने त्याचा रस काढून पिल्यास, लघवीच्या बर्‍याच समस्या या नाहीश्या होतात आणि लघवी साफ आणि पूर्ण होण्यास देखील मदत होते.

शुद्ध नीरा – urine infection home remedies in marathi

लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय
नीरा पिणे – लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय

लघवी साफ होण्याची समस्या असेल, तर त्यावर नीरा पिणे हा सर्वात उत्तम आणि प्रभावी असा उपाय आहे. लघवी अडखळत किंवा जळजळ करत लघवी होत असेल तर, ताज्या आणि शुद्ध नीरा पानांची नीरा प्यावी, त्यामुळे लघवी साफ आणि पूर्ण होते. तसेच सतत लघवी आल्यासारखी देखील वाटत नाही.

लघवी आल्यास रोखू नये- लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय

बर्‍याच लोकांना सवय असते, लघवी आलेली असली तरी देखील, त्यांना बराच वेळ कंट्रोल करून ठेवण्याची, परंतु या सवयी चा विपरीत परिणाम हा लघवीच्या अनियंत्रित मात्रेवर होतो आणि लघवी साफ होत नाही, त्यामुळे लघवी आल्यास न रोखणे हे उपाय म्हणून लागहवि साफ होण्यास बरीच मदत करते।

पालक चे सूप पिणे

लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय
पालक चे सूप- लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय

पालक हे युरिन स्टोन आणि युरिन इन्फेक्शन यावर प्रभावीपणे काम करते. पालक चे सूप पिल्याने लघवी मार्गात अडकलेले सर्व क्षार आणि खर साफ होण्यास लघवी साफ होण्यास मदत होते, त्यामुळे जर तुम्हाला पूर्ण आणि साफ लघवी होत नसेल तर पालक चे सूप करून प्यावे.

शेक देणे –

लघवी साफ आणि पूर्ण न झाल्यास, पोट फुगते आणि किंचितसे दुखूही लागते तर अशावेळी लघवी साफ होण्यासाठी बेंबी खाली फुगलेल्या भागावर गरम पाणी, किंवा कपडा किंवा पळसच्या फुलणे शेक द्यावा, असे केल्याने गरम शेक दिल्यानंतर लघवी पूर्ण होते.

सारांश – लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय/युरिन इन्फेक्शन ची लक्षणे/ urine infection home remedies in marathi

तुम्हाला जर युरिन इन्फेक्शन झाले असेल, लघवी साफ होत नसेल तसेच लघवी करताना त्रास होत असेल तर तुम्ही आमच्या या लेखात आम्ही सांगितलेले घरगुती उपाय करावेत तसेच या लेखात आम्ही याची कारणे आणि लक्षणे देखील स्पष्ट केली आहेत, त्यामुळे या गोष्टींवरून योग्य तो उपचार करू शकता. परंतु कोणताही आजार हा प्राथमिक स्तरावर असेल तरच घरगुती उपचार करावेत अन्यथा वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , “लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय / लघवी साफ न होण्याची कारणे/ युरिन इन्फेक्शन ची लक्षणे /urine infection home remedies in marathi ” हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top