घराचे वास्तुशास्त्र | वास्तुशास्त्र विषयी माहिती | घराचा नकाशा

घराचे वास्तुशास्त्र विषयी माहिती | वास्तुशास्त्र नुसार घराचा नकाशा | Gharache vastushastra >>> आजच्या आधुनिक काळात देखील पांरपारिक भारतीय वास्तुकला आणि वास्तुशास्त्र यांचा विचार केला जातो. किंबहुना खरे सांगावयाचे झाल्यास सध्याच्या काळात देखील नवनवीन ज्ञान,विज्ञान ,तंत्रज्ञान, तंत्रविज्ञान तसेच आधात्म आणि अध्यात्कि शक्ती, त्याचसोबत पॉझिटिव्ह व्हेवस, निगेटिव्ह व्हेव्स या सगळयांचाच प्रतिकुल आणि अनुकूल अशा दोन्ही बाजुंचा अभ्यास करून सध्या ‘वास्तुशास्त्र‘ ही एक अनोखी ,उपयोगी आणि महत्त्वपुर्ण शाखा अगदी जोमने पुढे आली आहे . त्यामुळे ‘वास्तुशास्त्र‘ म्हणजे घराबाबतचे ,वास्तुचे जे शास्त्र आहे ते शास्त्र काय सांगते , वास्तुशास्त्र मराठी माहिती , वास्तुशास्त्र नुसार घराचा नकाशा कसा असावा ,हे जाणून घेण्यास सर्वच जन इच्छुक आहेत . त्याचसाठी आजच्या या लेखात , आम्ही अतिशय महत्वाची माहिती घेऊन येत आहोत ती म्हणजे , ‘घराचे वास्तुशास्त्र/ वास्तुशास्त्र विषयी माहिती (Gharache vastushastra) .

आज आपण घराच्या वास्तुशस्त्रा विषयी जाणून घेणार आहोत . तर सुरूवातीला आपण जाणून घेऊया घराचे वास्तुशास्त्र म्हणजे काय? घराच्या वास्तुशास्त्राचे महत्त्व काय ? वास्तुशास्त्र नुसार घराचा नकाशा कसा असावा आणि वास्तु शास्त्र मराठी माहिती

            आपणा सर्वानाच माहिती आहे की, चारी पुरूषार्थांची म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारी पुरूषार्थांची पुर्तता करण्यासाठी, योग्य रितीने होण्यासाठी ‘घर‘ या सामाजिक संस्था आणि ‘कुटूंब‘ याची आवश्यकता असते. घर हे दैवी शक्तीला ,आपल्या सोबत वास्तव्यास ठेवण्यासाठी योग्य आणि रितसर असे घर असावे. घराचे बांधकाम आणि घर हे शास्त्रानुसार व्यवस्थित आणि योग्य असे असावे. त्यामुळे घरात सुख, शांती, समृध्दी, आरोग्य, लक्ष्मी नांदत असते. जरी आपले घर वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेले नसले तरी देखील ; आजच्या प्रगत शास्त्रात चुक वास्तुवरील तोडगे हे देखील बरेच सांगितलेले आहेत. त्यामुळे आपले घर योग्य आणि वास्तुशास्त्रात वैध असे आहे की नाही, याची शहानिशा जरूर करावी आणि नसेन तर जे तोडगे आणि उपाय सांगितलेले आहेत ते करावे .चला तर पाहूया , वास्तुशास्त्र नुसार घरचा नकाशा कसा असावा.

घराचे वास्तुशास्त्रः-

            वास्तु म्हणजे घर जरी असले तरी , या वास्तुंचे अनेक प्रकार आहे. जसे देवालये, सामाजिक कार्यक्रमाची वास्तु, महाल, शाळा, दवाखाने, प्रार्थनास्थळे, सभागृहे, कार्यालये , व्यवसाय स्थळ . या प्रत्येक गोष्टी वास्तुंमध्येच येतात. या प्रत्येक वास्तुचे प्रत्यक्ष असे योग्य वास्तुशास्त्र असते आणि योग्य वास्तुशास्त्र त्यांच्या कार्यावरून , दिशांवरून आणि हेतुसाध्यतेच्या दृष्टीकोनातुन बांधले जातात.

प्रत्येक वेळी दिशेचा यासाठी विचार केला जात असतो कारण प्रत्येक दिशेचा स्वतःचा स्वामी असतो. त्या-त्या दिशेनुसार देवांचा वास असतो. यासाठी कोणतीही वास्तु बांधत असताना त्याचे वास्तु- प्रारूप आणि ‘‘वास्तुशास्त्र‘‘ हे भिन्न असते. जसे की, आपण घरात राहतो. त्यासाठी आपण अन्न शिजवतो खातो. देवाची पुजा करतो. पाहुण्यांचे आदरा- -तिथ्य करतो. देवाची भक्ती करतो. अर्थाजनासाठी पैंशाची गुंतवणुक करतो, शिक्षणाचे आयोजन करतो आणि विसाव्यासाठी विश्रांती घेतो आणि घरात हे सर्व करण्यासाठी एक वास्तु जरी असली ; तरी खोल्या मात्र वेगवेगळया करतो.

घर लहान असो वा मोठे, फ्लॅट असो वा बंगला, स्वयंपाकाची, देवघराची, पाहुण्यांची, अभ्यासाची आरामाची खोली स्वतंत्रच असते ;पण ती कोणत्या दिशेस असावी, तेथे काय असावे? काय नसावे? हे सांगणारे शास्त्र म्हणजेच घराचे वास्तुशास्त्र, पाहुयात घराचे वास्तुशास्त्र हे आपले घर कसे असावे ते सांगते .

वास्तुशास्त्राचे महत्त्वः

            आजच्या काळात वास्तुशास्त्राचे महत्त्व हे अनन्यसाधारण वाढले आहे. वास्तुशास्त्र हे आपल्या घरात सकारात्मक उर्जा आणते तसेच सर्व योग्य गोष्टी योग्य होण्यास मदत करते. आपले घर आणि घरातील व्यक्ति यांचे हित , प्रगती , उत्कर्ष या सर्वात वास्तूचा बराच वाटा असतो . आपल्या वास्तुत सर्व काही योग्य करणारा वास्तुपुरूष असतो आणि तोच आपल्या घराचे सर्व वाईट गोष्टीपासुन संरक्षण करीत असतो.

घराचे वास्तुशास्त्र विषयी माहिती | वास्तुशास्त्र नुसार घराचा नकाशा | Gharache vastushastra
घराचे वास्तुशास्त्र

सर्व गोष्टी आणि दिशा योग्य असतील, वास्तुशास्त्रांच्या नियमाप्रमाणे असतील तर वास्तुपुरूष जागृत राहुन घरातील सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील , आपल्यासाठी अनुकूल अशा होतात. वास्तुशास्त्र प्रमाणे घर असेन तर मनोकामना पुर्ण होतात, कलह, मतभेद नाहीसे होतात, संततीसंबंधी, विवाहासंबंधीच्या समस्या सुटतात. आरोग्याच्या समस्या सुटतात, कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतात.

आपल्या घरात आर्थिक चणचण जाणवत नाही , व्यावसायिक नुकसान होत नाही , यासारख्या असंख्य समस्यांचे निराकरण वास्तुशास्त्रानुसार जर घर असेल तर होतात आणि आपल्या घरात सकारात्मक उर्जेचा आणि विचारांचा संचार होतो. वास्तुशास्त्रात जर दोष असेल , तर तो दुर करण्यासाठी आनंद पिंपळगावकर, निलेश परवर तसेच इतर वास्तुशास्त्रज्ञ यांनी काही तोडगे करण्यास आणि उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत. त्या अमलात आणुन आपण आपल्या वास्तुतील वास्तुदोष तुडवुन लावु शकतो , आपल्या घरातील वास्तूदोष निकामी करू शकतो . चला तर माह पाहूया , काय सांगते घराचे वास्तुशास्त्र ?

घरातील खोल्यांच्या दिशा:-

वास्तुशास्त्र नुसार घराचा नकाशा
वास्तुशास्त्र नुसार घराचा नकाशा

            आता आपण पाहणार आहोत , वास्तुशास्त्र नुसार घराचा नकाशा . घराचे वास्तुशास्त्र आणि वास्तुशास्त्र नुसार घराचा नकाशा हे जाणुन घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण त्यावरच आपल्या चालु आणि भावी आयुष्याची उभारणी होणार असते. घरांच्या वास्तुशांस्त्रात घरातील प्रत्येक खोल्याची दिशा कोणती असावी याची शास्त्रोक्त आणि सकारण माहिती ही घराच्या वास्तुशास्त्रात दिलेली आहे. त्यामुळे नवीन घर बांधत असताना वास्तुशास्त्राचा विचार करून घर बांधावे .

1. घराचे प्रवेशद्वार –

घराचे वास्तुशास्त्र विषयी माहिती | वास्तुशास्त्र नुसार घराचा नकाशा | Gharache vastushastra - घराचे मुख्य प्रवेशद्वार
घराचे मुख्य प्रवेशद्वार

वास्तुशास्त्र नुसार घराचा नकाशा बनवत असताना ,घराच्या वास्तुशास्त्रानुसार ,घराचा मुख्य दरवाजा म्हणजेच घराचे प्रवेशद्धार हे पुर्वेकडे तोंड करून असावे, त्यामुळे घरात सकारात्मक आणि सात्विक उर्जेचा प्रवेश होतो. पुर्व दिशेला मुख्य प्रवेशद्धार शुभ मानले जाते. तसेच इतर दरवाज्यांच्या तुलनेत मुख्य प्रवेशद्धार मोठे असावे .घराच्या प्रगतीसाठी पूर्व दिशेचे प्रवेशद्वार योग्य व शुभ मानले जाते .

2. घरातील स्वयंपाकघर

वास्तुशास्त्रा नुसार घरातील स्वयंपाक घर
स्वयंपाक घर

            घराच्या वास्तुशास्त्र नुसार घरातील स्वंयपाकघराची दिशा देखील निश्चित केलेली आहे. वास्तुशास़्त्रानुसार स्वयंपाक घराची दिशा ही आग्नेय असावी; कारण आग्नेय दिशा ही अग्निदेवताची दिशा आहे. त्यामुळे पोटातील अग्नी आग्नेय दिशेला स्वयंपाक बनवला गेला तरच अग्निदेवतांच्या आर्शिवादाने शमते . गॅस हा अशा दिशेने ठेवलेला असावा जेणेकरून स्वयंपाक करणा-या व्यक्तीचे तोंड हे पुर्वेस असावे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळेल .

3. घराचे देवघर –

Gharache vastushastra - घरातील देवघर दिशा / वास्तुशास्त्र
देवघर

            वास्तुशास्त्रानुसार देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे कारण ईशान्य ही ईश्वराची दिशा आहे, तसेच ईश्वरीय शक्ती ही ईशान्य कोप-यातुन घरात प्रवेश करते. ईशान्या दिशेला परमेश्वराचा वास असतो तसेच ही दिशा पुजनीय आहे. त्यामुळे वास्तुशास़्त्रानुसार ईशान्य दिशेला देवघर फलदायी ठरते आणि याच दिशेत परमेश्वर वास करत असतो .

4. घराचा लिविंगरूम / हॉल –

घराचे वास्तुशास्त्र विषयी माहिती - लिविंग रूम / हॉल
लिविंग रूम / हॉल

            घराच्या वास्तुशास्त्र मराठी महितीनुसार घराचा हॉल/ लिविंग रूम ही घराच्या मध्यभागी असावी. वास्तुशास्त्रानुसार पुर्व, उत्तर तोंड असावे. हॉल हा आपल्या घराचा आरसा असतो . त्यामुळे स्वच्छ, सुंदर आणि मनमोहक असा हॉल असावा , जेणेकरून आलेल्या पाहुण्यांना सकारात्मक उर्जेचा आभास होईल. घराच्या वास्तुशास्त्र नुसार लिविंग रूममध्ये युध्द, जनावरे, वाहते पाणी, महाभारतातील प्रसंग यांचे चित्र लावु नये . हॉल हा इतर खोल्यांच्या तुलनेत आकाराने मोठा आणि हवेशीर असावा .

5. घरातील शयनकक्ष / बेड रूम –

घराचे वास्तुशास्त्र विषयी माहिती | वास्तुशास्त्र नुसार घराचा नकाशा | Gharache vastushastra - शयनकक्ष
घरातील शयनकक्ष

दिवसभर थकुन आल्यानंतर विश्रांतीची जागा असते ती म्हणजे बेडरूम, बेडरूमचे तोंड हे दक्षिण- पुर्वे दिशेकडे तोंड असु नये. वास्तुशास्त्रानुसार आपल्या बेडरूमचे तोंड हे दक्षिण- पश्चिम दिशेला असावे. तसेच बेडरूम मधील मुख्य कपाट जेथे आपण आपल्या कमाईची साठवण करतो, ते उत्तर दिशेला तोंड करून असावे अथवा दक्षिण दिशेला असावे कारण दक्षिण दिशा ही कुबेराची दिशा आहे. त्यामुळे आपल्या घरातील धन -धान्य- समृध्दी यांची नेहमीच वृदधी होत राहील. आपल्या बेडरूममधील बेड हे पुर्व-पश्चिम दिशेने असावे किंवा दक्षिणेकडे डोके आणि उत्तरेकडे पाय करावे. पुर्वेकडे डोके आणि पश्चिमेकडे पाय ही उत्तम दिशा समजली जाते.

6. घरातील संडास-बाथरूम

घराचे वास्तुशास्त्र विषयी माहिती | वास्तुशास्त्र नुसार घराचा नकाशा | Gharache vastushastra
घरातील संडास-बाथरूम

            घराच्या वास्तुशास़्त्रानुसार संडास- बाथरूमची दिशा ही उत्तर दिशा असावी, उत्तर – पश्चिम दिशा ही कचरा निर्मुलनाची दिशा समजली जाते. त्यामुळे संडास- बाथरूम हे नेहमी उत्तर दिशेला असावे . अशा प्रकारे सर्व दिशांचा विचार करून आपल्या घरास आपण वास्तुशास़्त्रास अनुकूल असे करावे , त्याने आपल्याला भविष्यात कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत तसेच काही समस्या निर्माण झाल्या असतील तर योग्य वास्तुशास्त्र नुसार घराचा नकाशा बनविल्यास त्याचे निराकरण देखील होईल .

सारांश -घराचे वास्तुशास्त्र / वास्तुशास्त्र विषयी मराठी माहिती / Gharache vastushastra

            वर सांगितल्याप्रमाणे ,वास्तुशास्त्रा नुसार घराचा नकाशा , बनवला ,तर निश्चितच आपल्याला याचा बर्‍याच प्रमाणात फायदा होईल . आपले घर हे ‘घराच्या वास्तुशास्त्राप्रमाणे ‘ असावे असे प्रत्येकालाच वाटते , आणि जरी आपले घर वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तरीही , आपण वास्तुशास्त्रज्ञांनी सांगितलेली तोडगे आणि उपाय वापरावेत त्याचा आपल्याला नक्कीच अनुकूल परिणाम जाणवेल .आम्ही सांगितलेली वास्तुशास्त्र विषयी माहिती आपल्याला निश्चितच उपयोगी येईल .

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेली ” घराचे वास्तुशास्त्र ” ही घरगुती माहिती  कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य आमच्या पर्यन्त पोहचवा .

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि आम्हाला  इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top