घराला कोणता रंग द्यावा / कुठे कोणता कलर द्यावा – संपुर्ण माहिती

घराला कोणता रंग द्यावा / घराला रंग देण्याची पद्धत / घराला कलर कोणता द्यावा / Gharala color konta dyava >> आजकाल आपण पाहतो की, जवळपास सगळयांचीच इच्छा असते की आपले घर हे आपल्या स्वप्नपुर्तीचे घर असावे . श्रीमंत असो वा गरीब,  बंगल्यात राहणारा असो वा वस्तीत सर्वांनाच असे वाटत असते की , आमच्या स्वप्नातले घर जसे आहे ,तसेच आमचे राहते घर असावे आणि त्या घरात आमच्या मनातले स्वप्न पुर्ण व्हावे ; पण काही वेळेस असे होते देखील आणि काही वेळेस असे होत ही नाही , तर असे का होते? याचा आपण कधी विचार केला का, तर नाही केला , चला तर मग आज याचा विचार आपण करूया आणि जाणून घेऊया अधिक माहिती घराला कोणता रंग द्यावा याविषयी , घराला रंग देण्याची पद्धत कशी असावी याविषयी .

आपण नेहमी आपल्या दैंनदीन जीवनात ब-याच छोटया गोष्टींना अती महत्त्व देतो , तर काही वेळा यापैकीच काही छोट्या – मोठ्या गोष्टींकडे अगदीच दुर्लक्ष करतो आणि त्याचाच आपल्या आणि आपल्या कुटूंबातल्या सदस्यांवर प्रतिकुल- अनुकूल परिणाम हा होत असतो.

आपल्याला घराबाबतचे वास्तुशास्त्र याविषयीचे सखोल ज्ञान प्राप्त झाल्यापासुन तर सर्वच जन जागृत झाले आहेत , म्हणुनच तर कित्येकांचा प्रश्न असतो की, “अहो आम्ही तर अमुक वास्तुशास्त्रज्ञांच्या मतानुसार घरात दोष होता तर असे केले पण काय करणार ,आता असे होत आहे ,तसे होत आहे……वैगेरे -वैगेरे” पण आपण कधी विचार केलात का ….की आपल्या घराला जो रंग आपण दिला आहे, तो रंग ती रंगरंगोटी योग्य आहे की नाही? वास्तुशास्त्रा नुरूप आणि शास्त्राला अनुसरून आहे की नाही ? कोणत्या रंगाचा कोणता परिणाम होतो ? कोणत्या रंगाचे काय महत्व आहे ? घराचे रंगकाम कसे करावे , कोणत्या दिशेला कोणता रंग शुभ आणि लाभदायक आहे , नाही ना….. तर मग घराच्या रंगाबाबत , घराला रंग देण्याच्या पद्धतीबाबत , या सर्व गोष्टीचा विचार करा…..

चला तर मग आज जाणुन घेऊया घराला देण्यात येणा-या रंगाचा प्रभाव आणि रंगांची निवड आणि पद्धत याबाबत अधिक माहिती …सुरू करूया माहिती घराला देण्यात येणार्‍या योग्य रंगा विषयी … ……

घराला कोणता रंग द्यावा / घराला रंग देण्याची पद्धत / घराला कलर कोणता द्यावा / Gharala color konta dyava
घराला कोणता रंग द्यावा

घराच्या बांधकामाच्या वेळी, घरातील वस्तूच्या मांडणी, त्यांची दिशा या सर्व बाबी करत असताना,आपण वास्तुशास्त्राला महत्त्व देतो. पण घराला रंग देताना मात्र सजावट आणि रंगरंगोटी, आपल्याला आवडणारा रंग आणि आपल्या दृष्टीकोनाला महत्त्व देऊन रंगाची निवड करतो. जर घराला देण्यात येणारा रंग हा अयोग्य असेल तर त्याचे विपरीत पडसाद हे आपल्या घरावर नक्कीच पडतात आणि जर तुम्ही योग्य रंगांची निवड केली तर केवळ घरच नाही तर नशीब देखील योग्य रंगाच्या वापरामुळे चमकते, आणि आपल्या घराच्या व भविष्याच्या स्वप्नपुर्तीला साजेसे असे आपले घर बनते .चला तर जाणून घेऊया घराला कोणता रंग द्यावा / घराला कोणता कलर द्यावा / घराचे रंगकाम कसे करावे /Gharala color konta dyava यासर्व गोष्टींबाबत .

घराला कोणता रंग द्यावा माहिती – घराला रंग देण्याची पद्धत / घराचे रंगकाम कसे करावे (Gharala color konta dyava)

घराला कोणता रंग द्यावा हा प्रश्न वाचण्यास तर अतिशय साधा आणि सोपा आहे परंतु ; त्याचा शास्त्रोक्त विचार केल्यास त्याची माहिती आणि घरावर होणारे परिणाम गहन आहेत . त्यामुळे घराच्या रंगाविषयीची ही अतिशय महत्वाची माहिती आपल्याला उपयोगी आणि लाभदायक आहे . पुढील लेखात आपल्याला माहिती मिळेल की , घराला कलर कोणता द्यावा , घराचे रंगकाम कसे करावे ,घराला रंग देण्याची पद्धत , आणि कोणत्या दिशेसाठी कोणता रंग योग्य आहे .

1 . रंग आणि गुण यांचा संबंध – यावरून घराला रंग देण्याची पद्धत

घराला रंग देण्याची पद्धत / घराला कलर - रंग आणि गुण यांचा संबंध
रंग आणि गुण यांचा संबंध

            ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्हींच्या दृष्टीकोनातुन पाहिले , तर आपल्या घराच्या रंगाचा आपल्या शारीरीक आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. आपले शरीर आणि वृत्ती ही तीन गुणांनी प्रेरीत होणारी असते आणि ते तीन गुण म्हणजे सत्त्व, रज आणि तामसिक गुण ; पण हया तीनही गुणांचा आणि घराच्या रंगांचा अतिशय घनिष्ठ असा संबंध असतो, त्यामुळे घरातील खोल्यांना देण्यात येणा-या रंगांची निवड ही कधीही विचार करूनच करावी. कारण त्या रंगाचा परिणाम हा आपल्या जीवनावर आणि उत्कर्षावर पडत असतो .

2 . घराला कोणता रंग कुठे दयावाः-

            घराच्या रंगांची निवड ही अनेक बाबींचा विचार करून करावी लागते , जसे की – वास्तुशास्त्रानुसार दिशा त्या दिशेला असणारी रंगाची उपयुक्तता/ लाभदायक आहे की नाही याचा विचार , तसेच जो घराचा मालक आहे त्याची जन्मदिनांक . यावरुण त्या रंगाचा लाभदायक परिणाम हा होत असतो . आपल्या घरातील खोल्यांना त्यांच्या दिशेनुसार रंग दयावा . सुरूवातीला आपण पाहुया की , कोणत्या दिशेला कोणता रंग ग्राहय आहे किंवा त्या रंगांचा अनुकूल परिणाम कोणत्या दिशेला होईल . आपण देखील आपल्या घराला रंग देताना याचा विचार नक्की करावा .

3 . दिशा आणि त्या दिशेस योग्य रंग :-

प्रत्येक दिशेला स्वतःचा स्वामी ( देव )असतो आणि त्या स्वामीचा म्हणजे देवतेचा विशिष्ट असा रंग असतो . त्यामुळे दिशा आणि रंग याचा विचार अवश्य करावा . आता आपण जाणून घेऊया की कोणत्या दिशेला कोणता रंग द्यावा . ईशान्य दिशेला फिकट निळा रंग दयावा . वायव्य दिशेला लाल किंवा पिवळा रंग दयावा . नैऋत्य दिशेला हलका तपकिरी रंग दयावा . उत्तर दिशेला हिरवा किंवा पिस्ता रंग दयावा .आग्नेय दिशेला गुलाबी, भगवा रंग दयावा . पुर्व दिशेला पांढरा किंवा फिकट निळा रंग दयावा . पश्चिम दिशेला निळा आणि पांढरा रंग दयावा . अशाप्रकारे दिशांचा विचार करून त्या रंगांचा प्रभाव आणि त्यावर होणारा परिणाम विचारात घेऊन , घराची खोली ज्या दिशेला आहे त्या दिशेला , दिशानुरूप योग्य रंग द्यावा .

4 . घराच्या छताला कोणता रंग दयावा:-

            घराचे छत हे नेहमी पांढ-या रंगाचे असावे. पांढरा रंग हा शांति चे प्रतीक मानला जातो . पांढरा रंग संपूर्ण छताला असेल तर , घरात शांति नांदते . तसेच पांढरा रंग हा प्रकाश परावर्तित करत असतो. त्यामुळे लाइट प्रकाश छतावर पडेल आणि छतावरून परत जमिनीवर पडेल आणि घर प्रकाशमान दिसेल . त्याचबरोबर घराचा आकार देखील मोठा वाटेल . त्यामुळे घराच्या छताला [ स्लाप ] ला नेहमी पांढरा रंग दयावा.

5 . स्वयंपाक घराला कोणता रंग दयावाः-

            स्वयंपाक घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे आग्नेय दिशेला असते . तसेच ते अग्निदेवतेची दिशा आणि स्थान समजले जाते , त्यामुळे स्वयंपाक घराला नांरगी किंवा लाल तसेच गुलाबी छटांनी रंग दयावा. ओटा साठी लाल ग्रॅनाइट वापरावे . अग्नि देवतेसाठीचा लाल किवा नारंगी रंग मानला जातो . या रंगाने अग्नि देवता प्रभावीत होते . आणि आपल्या स्वयंपाक घरात अन्नपुर्णे चा आणि अग्नि देवतेचा वास राहतो. त्यामुळे हा रंग शुभ समजला जातो.

6 . लिविंग रूमला दयावयाचा रंग –

घराला कोणता रंग द्यावा - लिविंग रूमला दयावयाचा रंग
लिविंग रूमला दयावयाचा रंग

            लिविंग रूम हे आपल्या घराचा आरसा समजला जातो . आपल्या घरात आलेल्या अतिथीच्या मनावर आपल्या घराची छाप पाडण्याचे काम लिविंग रूम करते त्यामुळे लिविंग रूम ही योग्य रंगाने रंगवावी . या रूम साठी पिवळा किंवा ऑफ व्हाईट रंग दयावा. हे रंग मन शांत आणि प्रसन्न ठेवतात तसेच पिळवा आणि ऑफ व्हाइट हे रंग नजरेस देखील सौम्य वाटतात त्यामुळे हेच रंग आपल्या घराच्या लिविंग रूमला द्यावे .

7 . बेडरूमला दयावयाचा रंग –

घराला कलर कोणता द्यावा - बेडरूमला दयावयाचा रंग
बेडरूमला दयावयाचा रंग

            बेडरूम ही वास्तुशास्त्र नुसार नैऋत्य दिशेला येते . नैऋत्य दिशेचा स्वामी हा फिकट निळया रंगांस लवकर प्रभावित होतो त्यामुळे बेडरूम ला फिकट नीळा रंग द्यावा . आपण दिवसभरच्या धावपळीनंतर रात्री विश्रांती साठी बेडरूम चा वापर करतो ,आणि येथूनच आपल्याला दिवसभर काम करण्याचे ऊर्जा मिळत असते त्यामुळे मनाला आणि नजरेला प्रसन्न करेल असा रंग असावा . असे रंग बेडरूमला दिल्यास ते आपल्या डोळयांना सुखदायक वाटेल. आपल्या घराला अगदी गडद , भडक आणि डोळ्यांना त्रासदायक असे रंग देवु नये .

8 . स्नानगृहः-

            स्नानगृहे हे वायव्येस येत असल्याने या जागी पांढरा रंग दयावा . स्नानगृह हे आकाराने छोटे असल्याने जर ते हलक्या छटाच्या रंगाने म्हणजेच कमी गडद रंग असा रंग दिल्याने आपले स्ंनांगृह हे आकाराने थोडे मोठे आणि मोकळे तसेच हवेशीर वाटतात . त्यामुळे स्नानगृहा ला फिकट बदामी , पांढरा किंवा ऑफ व्हाईट रंग यापैकी कोणताही रंग द्यावा .

9 . घराचा बाहय रंग

घराला बाहय रंग कोणता द्यावा
घराचा बाहय रंग

            घराचा बाहयरंग हा त्या घराच्या घरमालकाच्या जन्मदिनांकावरुन आणि राशीवरून विचार करून दयावा . त्यामुळे त्या घरमालकास अनुकूल अशा गोष्टी त्यांच्या सोबत घडतात . सहसा पिवळसर पांढरा,  फिकट जांभळा किंवा फिकट नांरगी यांसारखे रंग हे सर्व राशीच्या लोकांना लाभदायक असतात . घराच्या बाह्य भागाला गडद रंग दिले तरी चालतात कारण बाहेरचे रंग हे उन्हाणे उडण्याची शक्यता जास्त असते . आपल्या घराला आतून- बाहेरून वर्षातून एकदा तरी रंग द्यावा . त्यामुळे वास्तु आणि आपण दोघेही प्रसन्न राहतो आणि घरातील वातावरण आनंदी राहते .

अशाप्रकारे आजच्या लेखातील , घराला रंग देण्याची पद्धत आणि घराला कोणता रंग द्यावा / घराचे रंगकाम कसे करावे (Gharala color konta dyava )ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल . वरील सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या घराला रंग द्यावा .

सारांश -घराला कोणता रंग द्यावा / घराला कोणता कलर द्यावा / घराला रंग देण्याची पद्धत

अशाप्रकारे आजच्या लेखात सांगितलेली ” घराला कोणता रंग द्यावा / घराला कोणता कलर द्यावा (Gharala color konta dyava)” ही माहिती आपल्याला नक्कीच अतिशय उपयोगी येईल आणि आम्ही वर सांगितलेली ‘घराला रंग देण्याची पद्धत ‘ वापरुन आपल्या घरास रंग -रंगोटी केली तर ,आपले बरेच प्रश्न सुटतील आणि आपल्या घराच्या रंगासोबतच आपले नशीब देखील नक्कीच चमकेल .

आपल्याला वरील लेखामध्ये , सांगितलेली ” घराला कोणता रंग द्यावा ” घराचे रंगकाम कसे करावे , या विषयीची माहिती आणि घरगुती उपाय कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो .

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

           

Scroll to Top