चिकनगुनिया उपचार मराठी | चिकनगुनिया वर औषध (chikanguniya upchar)

चिकनगुनिया उपचार मराठी/ चिकनगुनिया लक्षणे मराठी / चिकनगुनिया वर औषध / chikanguniya upchar marathi >> आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ,चिकनगुनिया , डेंग्यु, मलेरिया यासारख्या आजारांचे नाव ऐकताच सर्वच लोकांच्या मनात अगदी भीतीचं वातावरण निर्माण होत असतं कारण या सर्व आजारांचा रुग्णास अतिशय त्रास होत असतो , आणि त्याचे परिणाम देखील दूरगामी राहतात म्हणजेच जास्त काळ राहतात . त्यामध्येच चिकनगुनिया म्हणलं तर लोक अजुनचं घाबरतात कारण चिकनगुनिया झाल्यावर त्याचा त्रास आणि दुष्परिणाम हे एक ते दोन वर्ष होतात असे म्हंटले जाते. चिकनगुनिया जर झाला असेल तर ,विचित्र अंगदुखी आणि भयंकर ताप यामुळे आजारी व्यक्ति अगदी हैराण व बेचैन होतो . चिकनगुनिया या विषाणूजन्य आजाराने 2016 साली अगदी  महामारीसारखे गंभीर रूप धारण केलं होते . त्या स्मृति जाग्या जरी झाल्या तरी तो त्रास डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभा राहतो .

चिकनगुनिया होण्याचे कारण हे ,वैद्यकीय चिकित्सक याच्या सांगण्यानुसार ,CHIKV हा व्हायरस संक्रमित असलेला डास चावल्यामुळे चिकनगुनिया हा आजार रूग्णाला होतो. चिकनगुनिया हा जरी विषाणूजन्य आजार असला तरी तो संसर्गजन्य नक्कीच नाही, असे संशोधनात जाहीर झाले आहे ; पण जर या आजारापासून सुटका हवी असेल तर  याचा सामना आपण न घाबरता सामना आणि चिकनगुनिया वर उपचार करायला हवा , यात मात्र काही शंका नाही . शिवाय चिकनगुनिया आजाराची लक्षणे नेमकी कोणती आहेत हे ओळखुन आपण वेळीच त्यावर जर योग्य उपचार घेतले तर यातून लवकर बरे देखील होता येते. चिकनगुनिया चे कारण समजल्यानंतर , चिकनगुनिया लक्षणे , हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे .

चिकनगुनिया उपचार मराठी/ चिकनगुनिया लक्षणे मराठी / चिकनगुनिया वर औषध / chikanguniya upchar marathi
चिकनगुनिया

चिकनगुनिया लक्षणे ,दिसू लागली की लगेच ‘चिकनगुनिया वर घरगुती औषध ‘ घ्यावे , आमच्या लेखात आम्ही ‘चिकनगुनिया घरगुती औषध’ सांगत आहोत , याच्या उपयोगाने या त्रासापासून मुक्त देखील होता येते .या आजाराला आपल्यापासून दूर ठेवायचं असेल किंवा आजारपणातून पूर्ण बरे व्हायचे असेल तर आपल्याला त्या आजाराची महिती व्हावी , त्याचसाठी आम्ही येत आहोत एका आगळ्या वेगळ्या अशा माहितीसोबत जी आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना अतिशय उपयोगी येऊ शकते . चला तर मग , जाणुन घेवुया चिकनगुनियाबद्दल आणि घेण्यात येणार्‍या उपचार वर अधिक माहिती .

म्हणजेच चिकनगुनियाची लक्षणे कोणती, त्यावर कोणते घरगुती उपाय करता येतात जेणे करून आपल्याला आणि कुटुंबीयांना चिकनगुनिया होणार नाही आणि झालाच असेन तर रूग्णाला कसा आराम मिळेल , यांसाठी कोणते उपचार करावेत ,लक्षणे कोणती यांसारखी इतर माहिती जी आपल्याला उपयोगी यईल व या माहितीचा तुम्हाला फायदा होईल .

सर्वप्रथम आपण पाहूया की , चिकनगुनिया लक्षणे कोणती आहेत :

चिकनगुनिया लक्षणे मराठी ( chikanguniya chi lakshane) :

चिकनगुनिया जरी अतिशय गंभीर अशा स्वरूपाचा आजार नसला तरी देखील , चिकनगुनिया लक्षणे ही वेळीच ओळखता आली तर त्यातून पूर्ण आणि लवकर बरे होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच या लेखात आपण सर्वप्रथम जाणून घेऊया , ‘चिकनगुनिया लक्षणे ‘ कोणती आहेत ते . व्यक्तिला संक्रमित डास चावल्यानंतर जवळपास एक ते दोन दिवसात या आजाराची सर्वसामान्य लक्षणे दिसण्यास सुरवात होते. यासाठी जाणुन घेऊया चिकनगुनियाची कोणती लक्षणे आहेत ….यावरुन आपल्याला चिकनगुनिया जर झाला असेन तर त्यावर लवकर उपचार, चिकनगुनिया वर घरगुती औषध घेता येतील . चिकनगुनियाची काही सामान्य आणि प्रखर लक्षणे (चिकनगुनिया लक्षणे /chikanguniya chi lakshane ) खालीलप्रमाणे सांगता येतील :

चिकनगुनिया लक्षणे मराठी
चिकनगुनिया लक्षणे मराठी
  • चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीस अचानक तिव्र ताप येणे, हे चिकनगुनिया चे प्राथमिक लक्षण आहे
  • सांधे दुखायला लागणे ,. चिकनगुनिया झाल्यानंतर साधारण चार ते पाच दिवसात हे लक्षण दिसते .
  • डोकं दुखायला लागणे.
  • स्नायुंमध्ये वेदना जाणवणे.
  • शरीरावर पुरळ उठू लागणे.
  • तापासोबत मळमळ आणि पित्त यांचा त्रास जाणवणे.

साधारणपणे वरील सर्व लक्षणे ही चिकगुणिया झाला असल्याची आहेत, ही लक्षणे जाणवल्यास किंवा आठळल्यास खालील उपाय आणि औषध घ्यावे.

आता आपण चिकनगुनिया वर घरगुती औषध / चिकनगुनिया उपचार कोणते करू शकतो हे पाहूया –

चिकनगुनिया वर औषध ( chikanguniya upchar marathi) =

चिकनगुनिया हा आजार खासकरून संक्रमित डास चावल्यामुळे होतो. त्यामुळे चिकनगुनिया पासून रक्षण हवे असेन किंवा चिकनगुनिया होऊ नये यासाठी घरात आपण डासांचा प्रादुर्भाव होणार नाही याची प्रथम काळजी किंवा दक्षता आवर्जून घ्यावी . घरात स्वच्छता राखावी. घरात किंवा घराबाहेर पाणी साचू देऊ नये . घरात संध्याकाळी कडूलिंबाचे वाळलेली पाणे जळावी . आपले शरीर जास्तीतजास्त झाकून ठेवावे . कचरा , ओला कचरा आपले घर आणि परिसर यांच्या पासून दूर टाकावा . मात्र असं करूनही जर चिकनगुनिया झालाचं तर काही उपचार करुन आपला त्रास कमी करावा , आणि त्याच सोबत लगेचचं त्या व्यक्तिने डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यावा. आता आपण पाहूया की ,चिकनगुनिया झाल्यानंतर कोणते कोणते घरगुती उपचार आपण करू शकतो , ज्याने आपला त्रास कमी होईल , आपल्याला आराम मिळेन .

1. भरपूर पाणी पिणे : चिकनगुनिया उपचार

चिकनगुनिया उपचार मराठी/ चिकनगुनिया लक्षणे मराठी / चिकनगुनिया वर औषध / chikanguniya upchar marathi
चिकनगुनिया उपाय – जास्त पाणी प्या

चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीच्या शरीरात पाण्याची पातळी ही ताप आल्याने मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला लागते. यासाठी चिकनगुनिया झालेल्या रुग्ण ,लोकांनी वारंवार पाणी प्यायला हवे. जेणेकरून शरीरातील पाणी वाढेल आणि पाणी पातळी कमी होण्यास रोखले जाईल . शिवाय जलयुक्त पदार्थ आणि फळांचा रस प्यायला हवा त्यामुळे देखील बराच फायदा होतो , आणि शरीरातील पाणी व प्रतिकार शक्ति वाढेल . आपण पाणी जास्त पिल्याने लघवी जास्त होईल आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. जर चिकनगुनिया झालेल्या लोकांनी पाण्याचे सेवन कमी प्रमाणात केले तर त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.म्हणून भरपूर पाणी पिणे हा चिकनगुनिया उपचार म्हणून सांगितले जाते .

2. दुधाचे पदार्थ खाणे : चिकनगुनिया वर औषध

चिकनगुनिया उपचार मराठी/ चिकनगुनिया लक्षणे मराठी / चिकनगुनिया वर औषध / chikanguniya upchar marathi
दुधाचे पदार्थ

चिकनगुनिया झालेल्या लोकांनी दूध आणि दुधापासुन बनलेले पदार्थ देखील जास्त प्रमाणात खायला हवेत ,कारण दुधाच्या पदार्थांमुळे चिकनगुनिया मुळे येणार्‍या तापावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. शिवाय दुधाच्या पदार्थांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते त्यामुळे सांधे , हाडांच्या संवेदनेचा त्रास फारसा जाणवत नाही . याचा चांगला परिणाम शरीरातील हाडांच्या आरोग्यावर देखील होतो आणि त्रास फारसा जाणवत नाही . हाडांची झीज भरून काढण्यासाठी देखील दुधाचे पदार्थ अशा रुग्णांच्या आहारात असणे आवश्यक असते कारण दुधात भरपूर प्रमाणात कॅल्शिअमचे प्रमाण उपलब्ध असते .

3. ओवा खाणे : चिकनगुनियाचा त्रास कमी करते

 चिकनगुनिया झालेल्या लोकांना ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो कारण ओव्यामध्ये थायमोल नावाचे तेल असते जे चिकनगुणिया च्या रुग्णास अतिशय फायदेशीर असते , त्यामुळे त्यांना गुडघे , सांधे दुखीचा त्रास फारसा जाणवत नाही . ओवा हा तीव्र स्वादाचा पदार्थ आहे त्यामुळे ओव्याच्या तीव्र स्वाद्युक्त घटकामुळे रुग्णाला काहीकाळ तरी असह्य वेदना जाणवत नाहीत . ओवा खाल्ल्याने काही काळासाठी तरी या वेदना कमी होतात आणि रुग्णाला आराम मिळतो. ओवा हा अनेक विकारांसाठी गुणकारी म्हणून वापरला जातो . त्यामुळे चिकनगुनिया वर ओवा खाणे हा उपचार हमखास वापरला जातो .

4. हळदीचे दुध : चिकनगुनिया वर उपचार

हळदीचे दूध - चिकनगुनिया उपचार मराठी
हळदीचे दूध

आपण पाहतो की , कोणत्याही आजारात हळदीचे दूध हा एक रामबाण उपाय आहे असं मानलं जात कारण हळदीच्या दुधामुळे शरीर आतुन अगदी निरोगी होते. यासाठीच अंगदुखीतून आराम मिळण्यासाठी अथवा शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी हळदीचे दूध चिकनगुनिया झालेल्या लोकांना द्यावे , यामुळे त्यांना आराम मिळेल आणि होणारा त्रास कमी होईल .दुधामुळे कल्शियम मिळेन आणि हळदीमुळे जंतु आणि बक्टेरियल इन्फेकशन कमी होण्यास मदत होईल .

5. पपई : चिकनगुनिया वर औषध म्हणून उपयुक्त

पपई - chikanguniya upchar marathi
पपई

चिकनगुनियावर जरी ठराविक असे कोणतेचं औषध प्रभाव पडत नसले तरी अनेक नैसर्गिक उपचार त्यावर नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. चिकनगुनियाच्या तापामुळे शरीरातील पेशी मोठ्या प्रमाणावर कमी होतात यावेळी रुग्णाच्या शरीरातील पेशी वाढण्यासाठी त्यांना पपईच्या कोवळ्या पानांचा  रस पिण्यास द्यावा, कारण त्यामुळे रुग्णाच्या पेशी वाढण्यास मदत होते ,त्यामुळे चिकनगुनिया झालेला असल्यास पपई तसेच त्यांच्या पानांचा रस देणे हे अतिशय फायद्याचे ठरते. यासाठी रुग्णास नियमित पपईच्या पानांचा रस पिण्यासाठी दिला जातो . 

6 . लसुण : चिकनगुनिया उपाय म्हणून लसूण फायदेशीर

लसुण : चिकनगुनिया उपाय म्हणून लसूण फायदेशीर
लसूण

लसुण हा अंगदुखी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे . लसूण मध्ये बरेच काही औषधी गुणधर्म असतात . चिकनगुनियामुळे सांध्यावर आलेल्या सूजेवर लसणाचा रस किंवा पेस्ट आपण लावावी . लसणाची पेस्ट अथवा रस लावण्यामुळे स्नायूंमधील रक्त प्रवाह सुधारण्यास सुरुवात होते आणि सांध्यांवर आलेली सूज देखील नक्की कमी होते आणि त्यामुळे वेदनेतून ही हळहळू आराम मिळतो .अशाप्रकारे लसूण हा जास्तीत जास्त प्रमाणात रुग्णास खावयास द्यावा आणि त्याची पेस्ट देखील लावावी , त्याचा चांगलाच फायदा होतो आणि वेदनेपासून आराम मिळतो .

वरील सर्व , चिकनगुनिया वर घरगुती औषध / चिकनगुनिया उपचार ,करून आपला त्रास कमी होत नसेन तर , असे करत असताना देखील डॉक्टरांचा सल्ला आणि डॉक्टरांची भेट अवश्य घ्यावी. आपल्याला चिकनगुनिया होऊ नये यासाठी आजूबाजूचा परिसर आणि घर स्वच्छ ठेवावे , कुठेही सांडपाणी साचू देऊ नये , आपल्या परिसरात आणि घरात डास होऊ देऊ नये .

सारांश -चिकनगुनिया उपचार मराठी / चिकनगुनिया वर औषध / चिकनगुनिया लक्षणे मराठी chikanguniya upchar marathi / chikanguniya chi lakshane

आपल्याला जर चिकनगुनिया झाला असेन आणि त्याच्या त्रासापासून आपण त्रस्त असाल तर आम्ही वर सांगितलेले ” चिकनगुनियावर घरगुती उपाय ” या लेखातील माहिती आणि उपचार तुम्ही जरूर करून बघा , त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि हा लेख तुम्हाला फायदेशीर ठरेल .

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले ,चिकनगुनिया उपचार मराठी /चिकनगुनिया लक्षणे /चिकनगुनिया वर घरगुती औषध (chikanguniya upchar marathi / chikanguniya chi lakshane )कसे वाटले , हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top