झुरळ घालवण्यासाठी घरगुती उपाय / झुरळ पळवण्यासाठी घरगुती उपाय / झुरळ वरील उपाय/ झुरळ मारण्याचे घरगुती उपाय / झुरळ मारण्याचे औषध / zural marnyache gharguti upay >> झुरळ हा अतिशय किळसवाना आणि जंतु पसरवणारा एक स्वयंपाक घरातील कीटक आहे. सर्वात जास्त काळजीची गोष्ट म्हणजे या झुरळांची पैदास ही खूप लवकर आणि जास्त संख्येने होत असते. स्वयंपाक घरात तर हमखास कीटक आणि झुरळ हे होतातच, त्यामुळे दर माहिन्यातून दोन वेळेस तर साफसफाई करावी. घरात झुरळ झाले की, प्रत्येकाला म्हणजेच हमखास घरातील महिलांना प्रश्न पडतो की, हे झुरळ कसे नाहीसे करावेत.
घरातील असणारे पदार्थ तुपकट, तेलकट, मसालेदार, अशा काही चवीष्ट पदार्थाच्या वासाने हे झुरळ घरात शिरकाव करतात आणि हे झुरळ दिसायला अतिशय लहान आणि घाणेरडे तसेच किळसवाणे असतात, त्यामुळे अनेकजण म्हणजे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजन ह्या कीटकला घाबरतात. त्याचबरोबर हे झुरळ अतिशय लवकर वाढतात आणि जास्तीत जास्त यांची पैदास असते .
घरात जर झुरळ असतील तर या झुरळांमुळे आपल्या घरात ब-याच रोगांना आमंत्रण दिल्यासारखे होते आणि आपल्या घरातील व्यक्तींचे स्वास्थ बिघडण्यास हे झुरळ आणि त्यांपासून झालेली घाण हे घटक कारणीभुत ठरतात. प्रत्येक घरातील महिला या आपल्या घराचे झुरळांपासून रक्षण करण्यास आटोकाट प्रयत्न करीत असतात, तर अशा सर्वांसाठी आमचा आजचा लेख अतिशय उपयुक्त आहे, ज्यांना झुरळांच्या अतिक्रमणाचा त्रास आहे ,आणि त्यासाठीच आम्ही आजच्या लेखात , झुरळ घालवण्यासाठी घरगुती उपाय विषयी माहिती देणार आहोत.
झुरळ आपल्या घरातील पदार्थ, डाळी, धान्य आणि इतरही साठवणीचे पदार्थ खराब करतात आणि घरातील जागा सुध्दा घाण करतात. पुस्तके, वायर, काही इलेक्ट्राॅनिक आयट्मस यांना सुध्दा खराब करून आपले नुकसान करतात आणि त्त्यांच्या पासून होणार्या घाणीचा घाण असा वास येतो. एकाने घरात शिरकाव केला तर त्यापासुन अनेक झुरळांची निर्मिती होते आणि हे एकदा घरात आपल्या येवुन बसले की यांना बाहेर काढणे खुप अवघड होऊन बसते.
बाजारात अनेक उत्पादन आहेत जे की झुरळ पळवण्यास मदत करतात पण या केमिकल रहीत उत्पादनामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची भिती वाढते त्याचबरोबर घरात जर लहान मुले असतील तर या औषध टाकलेल्या जागी लहान मुलांनी हात लावले तर, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. यांसर्व गोष्टीचा विचार करून आपण यावर काही घरगुती उपाय करू शकतो आणि हे उपाय कोणते ते आपण पाहूया॰
Table of Contents
झुरळ घालवण्यासाठी घरगुती उपाय/ झुरळ पळवण्यासाठी घरगुती उपाय/ झुरळ वरील उपाय/झुरळ मारण्याचे घरगुती उपाय (zural marnyache gharguti upay )
झुरळ हे जास्त प्रमाणात वाढले तर त्यांना नियंत्रणात आणणे अतिशय कठीण होते, त्यामुळे घरात जर थोडे जरी झुरळ दिसले तरी, त्यांना घरातून पळवून लावण्यासाठी आणि मारण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत, ते उपाय आहेत –
पुदिना :- झुरळ घालवण्यासाठी घरगुती उपाय
पुदीना हा जसा खाण्यासाठी स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी उपयोगी आहे तसाच पुदीना हा झुरळ घालविण्यासाठी देखील अतिशय उपयोगी आहे. झुरळसाठी पुदीना हा प्रतिरोधक म्हणुन उपयोगात आणला जाऊ शकतो. घरात झुरळे, किटक लपुन बसतात, त्यांना घराच्या बाहेर पळविण्यासाठी पुदिना प्रभावीपणे काम करतो. आपल्याला दिसत नाहीत तर पुदीनामध्ये असे घटक असतात. ते हया झुरळांना मारू शकतात.
पुदीनाच्या तेलामध्ये देखील प्रभावशाली गुण असतात जे किटकांना मारून टाकतात. पुदीन्याची काही पाणे घेऊन ती एका पिशवीत टाकावीत आणि ही पिशवी अशा जागेवर ठेवा जिथे तुम्हाला झुरळ जास्त दृष्टीस पडतात आणि ही पाणे सलग दोन तीन दिवसाला बदलत रहावीत. यानं झुरळांचा नायनाट होण्यास मदत होते.
झुरळ घालविण्यासाठी पुदीन्याची काही पाणे उकळुन घ्यावीत पाण्यात आणि नंतर ते पाणी थंड झाल्यावर हे पाणी झुरळ येत असलेल्या जागेवर आणि स्वयंपाकघरातील बेसीन मध्ये किंवा अस्वच्छ जागी शिंपडावे याने झुरळीचा शिरकाव बंद होईल, आणि झुरळ आपल्या घराच्या बाहेर जातील. अशाप्रकारे आपण झुरळ घालवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून हा उपाय वापरुन झुरळांपासून सुटकाव मिळवि शकतो .
कडुनिंबः- झुरळ पळवण्यासाठी घरगुती उपाय
कडुनिंब हा सर्वात उपयोगी असे वृक्ष आहे तसेच कडूलिंब सुद्धा आयुर्वेदिक वनस्पति म्हणून ओळखली जाते. कडुनिंबाचे अनेक फायदे आहेत जे की किंटकाना मारू शकतात आणि आपल्या घरात शिरकाव करण्यापासुन थांबवु शकतात. कडुनिंब हा एक बायोलॉजिकल असा घटक आहे जोकी झुरळापासुन आपल्या घरापासून लांब ठेवु शकतो. यामध्ये जास्त प्रमाणात वोलेटाईल तत्व असतात जेकी किटक कमी करण्यास महत्त्वाचे असे ठरतात आणि कडुनिंबाचे पावडर आणि तेल बाजारात तर भेटतेच पण आपण ते घरात देखील तयार करू शकतो. कडुनिंबाची पावडर रात्री झोपायच्या आधी जिथे झुरळ जास्त प्रमाणात दिसतात त्याजागी टाकावी याने झुरळ कमी होण्यास मदत होते.
एक छोटया आकाराच्या स्प्रेच्या बाटलीमध्ये कडुनिंबाचे तेल टाकावे आणि त्यामध्ये थोडे पाणी टाकावे आणि ही बाटली चांगली शेक करावी आणि मिसळुन घ्यावी आणि जिथे जास्त झुरळ आहेत तिथे हया स्प्रे च्या बाटलीमधुन कडुनिंबाच्या तेलाचा स्प्रे शिंपडावा आणि इतर ठिकाणी सुध्दा जिथुन झुरळ येतात तिथे मारावा याने झुरळ कमी होतात आणि असलेले झुरळ मरतात.
कॉफी :-झुरळ मारण्याचे घरगुती उपाय
झुरळांपासुन सुटका करण्यासाठी कॉफी हा देखील सोपा आणि सोयीस्कर असा घरगुती उपाय आहे. झुरळ कुठेही आणि कुठल्याही कानाकोप-यातुन बाहेर पडतात. त्यामुळे कॉफी खुप चांगला असा उपाय आहे. एक पाण्याचा जार घ्यावा त्यात जास्त पाणी घ्यावे आणि कुठलीही कॉफी थोडीशी पेपरवर घ्यावी आणि ती कॉफी जारमध्ये टाकावी. झुरळ जिथुन येत आहे त्या ठिकाणी हा जार ठेवुन दयावा. या जारमधील कॉफीचा वास सर्वत्र पसरून झुरळाला मिळताच हे झुरळ जारकडे आकर्षित होऊन जारमध्ये येतात आणि एकदा का त्या जारमध्ये आल्यास त्या झुरळांना बाहेर पडणे अवघड हेाऊन जाते आणि घराबाहेर काढु शकतो. हा प्रयोग नियमितपणे सलग केल्यास घरात झुरळ येण्याचे प्रमाण कमी होते किंवा बंदच होते.
केरोसिन / रॉकेल :-झुरळ वरील उपाय
केरोसिन म्हणजे रॉकेलच्या मदतीने सुध्दा झुरळ नाहीसे होतात . झुरळ येण्याच्या जागी किंवा अडगळीच्या जागी रॉकेल शिंपडावे. त्यामुळे हे झुरळ घरातून पळवुन लावण्यास बर्याच प्रमाणात मदत होते. रॉकेल / केरोसिन च्या वासाने झुरळ त्या जागी नक्कीच परत येत नाहीत; पण हा उपाय वापरत असताना लहान मुले यापासुन दुर राहतील याची काळजी घ्यावी॰
लवंग :- झुरळ पळवण्यासाठी घरगुती उपाय
झुरळाला घरातुन नाहीसे करण्यासाठी लवंग सुध्दा उपयोगी ठरते. लवंगाच्या कठीण सुगंधामुळे झुरळ पळुन जातात. जिथे जिथे झुरळ दिसतात. त्याठिकाणी एक एक लवंग ठेवुन दयावी याने झुरळांपासुन सुटका मिळेल याशिवाय लवंगाची पावडर करून देखील ती अडगळीच्या जागी, ज्या ठिकाणी झुरळ जास्त दिसतात त्या ठिकाणी , तसेच घरात न वापरण्यात येणार्या कोपर्यात शिंपडावी .
बेकिंग पावडर :- झुरळ मारण्याचा प्रभावी उपाय
झुरळ घालविण्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे साखर आणि दोन चमचे बेकींग पावडर घ्यावी आणि हे मिक्स करून जिथे झुरळ येतात तिथे टाकावे. याने काय होते की साखरमध्ये असलेल्या गोडव्यामुळे झुरळ आकर्षित होतात आणि बेकींग पावडरमुळे ते मरण्यास मदत होते. अशाप्रकारे बेकिंग पावडर वापरुन आपण झुरळ मारू शकतो. बेकिंग पावडर पोटात गेल्यास झुरळ अजिबात जीवंत राहू शकत नाहीत.
तेजपत्ता :- झुरळना ठेवते घरापासून दूर
तेजपत्ता हा सर्वत्र उपलब्ध असतो तेजपत्त्याच्या वासामुळे झुरळ घरातुन बाहेर पडण्यास मदत होते. घरातील ज्या ज्या कोप-यामध्ये झुरळ दिसतात. त्या त्या ठिकाणी तेजपत्त्याची पाणे बारीक करून ठेवावीत. तेजपत्त्याचा जो वास असतेा त्याने झुरळ घराबाहेर पडण्यास मदत होते आणि आपल्या घरातील झुरळांचा प्रादुर्भाव कमी होतो .
बोरिक पावडर :- झुरळ मारण्याचा हमखास उपाय / झुरळ मारण्याचे औषध
बोरीक पावडर हे देखील झुरळांना पळविण्याचे आणि मारण्याचे प्रभावी साधन आहे. बोरिक पावडरमुळे सुध्दा झुरळांचा नायनाट होवु शकतो जिथे जिथे झुरळ येतात त्या त्या जागी बोरीक पावडर टाकावी याने झुरळ पळुन जातात. पण बोरीक पावडरपासुन लहान मुलांना लांबच ठेवावे. किंवा ज्यांच्या घरात अधिक लहान मुले आहेत त्यांनी हा उपाय न केलेला बरा, अथवा लहान मूल ज्या जागी पोहचू शकत नाही त्याच जागी बोरिक पावडर टाकावी.
अशा प्रकारे वरील पैकी जे तुम्हाला शक्य होतील ते उपाय तुम्ही करावे, यामुळे तुम्हाला नक्कीच या झुरळ च्या त्रासापासून सुटका मिळेन व घर देखील स्वच्छ राहील, जंतु, रोगराई पसरणार नाही॰
सारांश -झुरळ घालवण्यासाठी घरगुती उपाय/झुरळ पळवण्यासाठी घरगुती उपाय/ झुरळ वरील उपाय /झुरळ मारण्याचे घरगुती उपाय (zural marnyache gharguti upay )
आपल्या घरात जर झुरळांचा उपद्रव झाला असेन, आणि घरात झालेल्या झुरळांमुळे आपण परेशान झाला असाल, तर आपल्या “झुरळ घालवण्यासाठी घरगुती उपाय/zural marnyache gharguti upay” या लेखातील आम्ही सांगितलेले उपाय आपण करावेत त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि आपल्या घरातून झुरळ पुर्णपणे नाहीसे होतील.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , झुरळ घालवण्यासाठी घरगुती उपाय/झुरळ पळवण्यासाठी घरगुती उपाय /झुरळ मारण्याचे घरगुती उपाय (zural marnyache gharguti upay) हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)