ढेकूण मारण्यासाठी औषध – Best 8 Medicine / Home Remedies to Kill Bugs

 ढेकूण मारण्यासाठी औषध /ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय/ढेकूण मारण्याचे औषध / ढेकूण होण्याची कारणे /dhekun marnyache gharguti upay >>> एकदा का घरामध्ये ढेकुण झाले तर त्यांचा खुप त्रास होतो तसेच घरात आजार देखील पसरतात . ही ढेकणं अशा ठिकाणी जाऊन बसतात की ते आपल्याला दिसत तर नाहीत पण आपल्याला चावतात मात्र नक्की. ढेकुण हे बेड, गादी, फर्निचर अशा ठिकाणी काना -कोप-यात जाऊन बसतात आणि अशा वेळेस त्यांना बाहेर काढणे अतिशय गरजेचे असतात , नाहीतर त्यांचा पादुर्भाव अतिशय वाढतो. ढेकुण जर चावले तर असंख्य आजार पसरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे घरात असलेल्या ढेकणांचा नायनाट करणे हे अतिशय आवश्यक आहे. याचसाठी आम्ही घेऊन आहोत ” ढेकूण मारण्यासाठी औषध /ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय ” यावर काही माहिती, जी आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल आणि आपला घरातील ढेकूण होण्याचा पादुर्भाव कमी होईल.

 मुंबई, पुणे यासांरख्या शहरात हवेशीर वातावरण नसते. जागेच्या अभावी अगदी जवळ-जवळ आणि कोंदट-कोंदट असे घरे असतात. यामुळे अशा ठिकाणी ढेकणांचा प्रचंड प्रमाणात भडिमार होतो.अशा ठिकाणी ढेकंणाना पोषक असे वातावरण मिळते कारण तिथे हवा खेळती असत नाही आणि सूर्य प्रकाश देखील कमी प्रमाणात येतो आणि त्यामुळे ढेकुण हे अतिशय प्रचंड प्रमाणात वाढतात. घरात ढेकूणचे प्रमाण वाढले तर आजाराचे प्रमाण देखील वाढते. आपल्याला प्रश्न पडला असेल की ढेकूण घरात येतात कुठून?

ढेकूण मारण्यासाठी औषध /ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय/ढेकूण मारण्याचे औषध / ढेकूण होण्याची कारणे /dhekun marnyache gharguti upay
ढेकूण

अनेकदा आपण बाहेर जातो, सिनेमागृह, तीर्थ क्षेत्र तसेच सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर ही ढेकणं आपल्या कपडयांवर चढतात आणि आपल्या घरात मग आपोआपच येतात आणि आपल्या घरातील विविध कोप-यात जाऊन बसतात. उंदीर आणि झुरळ यांच्या प्रमाणेच ढेकूण यांची देखील पैदास जास्त प्रमाणात होत असते आणि मग हे ढेकुण खुप जास्त प्रमाणात वाढतात . संध्याकाळ झाली की लगेचच हे ढेकुण आपल्या घरातील सद्यस्यांवर हमला करतात म्हणजेच चावतात आणि रात्री तर हे ढेकूण अगदी मेजवानी सारखेच आपल्या अंगावर तुटून पडतात आणि आपल्या शरीरातील रक्त शोषून घेतात त्यामुळे आपल्याला पुरेशी झोप देखील मिळत नाही आणि आपल्या काही खाल्लेले अंगी देखील लागत नाही.

हे ढेकूण चावल्याने हातांना पायांना किंवा आपल्या शरीराला खाज येते आणि अनेक आजार देखील मागे लागतात. ढेकुण चावल्याने अनेक आजार तोंड वर काढतात आणि हे आपल्या आरोग्याला हानिकारक असते. तर असाच आपला त्रास कमी होण्यासाठी व ढेकंणापासुन आपल्या घराला आणि आपल्याला त्रास न होण्यासाठी आपण काही ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय करू शकतो, ढेकूण मारण्यासाठी औषध म्हणून आपल्या घरातील काही गोष्टी आपण वापरू शकतो , तर ते ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय /ढेकूण मारण्यासाठी औषध कोणते ते आपण या लेखात पाहू.

ढेकूण होण्याची कारणे –

  • जर आपण आपल्या घरातील अडगळीची जागा महिण्यातून दोन वेळेस साफ नाही केली तर त्या जागी ढेकूण प्रचंड प्रमाणात होतात.
  • घरातील सांडपाणी घराच्या परिसरापासून बरेच दूर सोडले नाही तर घराच्या परिसरात ढेकूण होतील आणि तेच घरात शिरकाव करतील.
  • घरातील कचरा हा देखील आपल्या घराच्या परिसरा पासून बराच दूर टाकला जाईल किंवा घंटा गाडीतच दिला जाईल याची काळजी घ्यावी.
  • घरात किंवा घरच्या बाहेर कुठेही अनावश्यक सांडपाणी साचलेले असू नये.
  • घरात सतत साफसफाई आणि स्वच्छता ठेवावी.
  • घराचे काणे-कोपरे दर आठवड्याला साफ करावे.

ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय/ ढेकूण मारण्याचे औषध/ ढेकूण मारण्यासाठी औषध –

लवेंडर ची पाणे :-

ढेकणांना दुर करण्यासाठी लंवेडरच्या पानांचा वापर करावा. लंवेडर चे परफुय्म हे जिथे ढेकणं झाले आहेत, तिथे शिंपडल्यास देखील ढेकुण मरून जातात. तसेच लंवेडरची पाणे कपडयांवर घासा याने देखील ढेकणं नक्कीच मरून जातील.

ढेकूण मारण्यासाठी औषध /ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय/ढेकूण मारण्याचे औषध / ढेकूण होण्याची कारणे /dhekun marnyache gharguti upay

लंवेडरच्या तेलाचा वास ढेकणांना सहन होत नाही आणि लंवेडरच्या तेलाच्या वासाने घरात देखील प्रसन्न वाटते . त्याचबरोबर ढेकणांसह डास आणि इतर कीटाणु आपल्या पासून आणि आपल्या घरापासुन दुर होतात.

लाल मिरची :- ढेकूण मारण्यासाठी औषध

ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय / dhekun marnyache gharguti upay - लाल मिरची

 लाल मिरची खाण्यासाठी तर उपयोगी आहेच पण लाल मिरचीचा वापर ढेकुण मारण्यासाठी देखील केला जातो. लाल मिरची ही ढेकूण मारण्यासाठी अत्यंत उपयोगी अशी आहे. लाल मिरची तिखट असते. परंतु ती खुपच फायदेशीर आहे. ढेकुण मारण्यासाठी लाल मिरचीचा उपयोग एक चमचा लाल मिरची पावडर घ्यावी त्यात थेाडे आल्याचे तुकडे किवा पेस्ट टाकावी आणि त्यामध्ये ओव्याचे तेल एकत्र करावे आणि त्यामध्ये एक कप पाणी टाकावे.

हे सर्व पाणी एकत्र  मिक्स करावे आणि हे पुर्ण मिश्रण मिक्स केल्यावर ते सर्व एका चाळणीच्या साहाययाने गाळुन घ्यावे आणि ते पाणी एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरून ठेवावे आणि ज्या ठिकाणी ढेकुण आहेत. त्याठिकाणी रोज हा स्प्रे मारावा यामुळे घरातील ढेकणं कमी होऊन जातील आणि ढेकणापासुन आपली सुटका होईल.

पुदिना पाणे :- ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय

पुदीनादेखील ढेकुण मारण्यासाठी खुप उपयोगी आहे. पुदीन्याचा उग्र सुगंध हा ढेकणांसाठी खुप वाईट असतो. ढेकणांना पुदिन्याचा स्ट्राग सुगंध सहन होत नाही त्यामुळे जिथे ढेकुण झालेत तिथे पुदीन्याची पाणे ठेवावीत जसे की जर गादीमध्ये ढेकुण झाले असतील तर रोज आपल्या गादीमध्ये ताज्या पुदीन्याची पाणे ठेवावीत त्यामुळे पुदीन्याच्या पाणांच्या वासामुळे ढेकुण मरण्यास मदत होते.

ढेकूण मारण्यासाठी औषध /ढेकूण मारण्याचे औषध /dhekun marnyache gharguti upay - पुदिना पानांचा रस

अशाप्रकारे पुदीनाच्या पानांचा रस काढुन त्याचा स्प्रे सुध्दा बनवुन बाटलीत भरून ठेवुन जिथे ढेकुण झालेत अशाठिकाणी शिंपडावा यामुळे ढेकुण मरून जातात आणि ढेकणांचा त्रास कमी होतो.

कडूलिंबाचे पाणे आणि तेल :-

ढेकूण मारण्यासाठी औषध /ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय/ढेकूण मारण्याचे औषध / dhekun marnyache gharguti upay - कडूलिंबाच्या पाने आणि तेल

 कडुलिंबाच्या पानाचं तेल सुध्दा ढेकुंण मारण्यास उपयोगी होते. कडुलिंबामध्ये असणारे अॅटिबॅक्टेरीअल गुणधर्म किडयांना मारण्यास उपयोगी ठरतात. याचा वापर अशाप्रकारे करावा. एक कप पाणी घ्यावे. त्यामध्ये अर्धा चमचा कुठलाही निरमा टाकावा आणि त्यामध्ये दोन चमचे कडुनिंबाचे तेल टाकावे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि हे मिश्रण स्प्रे च्या बाटलीत भरावे आणि जिथे जिथे ढेकुण झालेत तिथे तिथे हा स्प्रे मारावा आणि जोपर्यंत ढेकणांचा पुर्णपणे नायनाट होत नाही तोपर्यंत हा स्प्रे मारावा याने ढेकुण मरून जातील आपले घर सोडतील.

निलगिरी तेल व रोजमेरी चे तेल :-

ढेकूण मारण्यासाठी औषध /ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय/ढेकूण मारण्याचे औषध /dhekun marnyache gharguti upay - निलगिरी तेल
रोजमेरी आणि निलगिरी तेल

निलगिरीचा वास देखील ढेकणांना सहन होत नाही. त्यामुळे जिथे तिथे ढेकुण दिसेल तिथे निलगिरीचे तेल याचे काही थेंब टाकावेत यामुळे ढेकुण मरून जातात. रोजमेरीच्या तेलात निलगिरीचे तेल मिसळुन याचा वापर ढेकुण मारण्यासाठी केला तर ढेकणं मरून जातात. तसेच लंवेडर तेलामध्ये सुध्दा निलगिरीचे तेल मिसळुन जिथे ढेकणं झालेत तिथे टाकल्यास ढेकणांचा त्रास कमी होईल आणि आपल्या घरापासून ढेकूण दूर जातील .

टी ट्री ऑईल :-

ढेकूण मारण्यासाठी औषध /ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय/ढेकूण मारण्याचे औषध / ढेकूण होण्याची कारणे /dhekun marnyache gharguti upay

टी ट्री ऑईल बाजारात कुठेही सहज उपलब्ध होते. आणि टी ट्रि तेलामध्ये मायक्रोवियल गुणधर्म असतात. त्यामुळे ढेकणं मरण्यास मदत होते. ते ऑईल पाण्यात मिक्स करून त्याचा स्प्रे तयार करावा आणि हा स्प्रे बाटलीत भरून ठेवावा. आणि हा स्प्रे पंलगाच्या मध्ये कपाटाच्या मागच्या बाजुस पडदयांवर, भिंतीवर फर्निचरवर आणि गादयांवर शिपंडावा आणि असे सलग आठ ते पंधरा दिवस रोज करावे यामुळे ढेकणं मरून जातात आणि या त्याशिवाय जिथे जिथे ढेकणं आढळुन येतात तिथे सुध्दा ते ऑईल शिंपडावे यामुळे ढेकणांचा नायनाट होतो. घराच्या सगळ्या कानाकोपर्‍यात हे ऑइल शिंपडावे .

काळे आक्रोड :-

ढेकूण मारण्यासाठी औषध /ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय/ढेकूण मारण्याचे औषध /dhekun marnyache gharguti upay - काळे अक्रोड
काळे अक्रोड

काळया आक्रोडचा वापर हा चहा बनविण्यासाठी केला जातो. काळया आक्रोडमध्ये बुरशी घालविण्याचे गुणधर्म असतात आणि म्हणुनच याचा वापर ढेकुण मारण्यासाठी सुध्दा केला जातो. काळ्या आक्रोड च्या छोटया छोटया पिशव्या बनवाव्यात आणि हया पिशव्या घरातील प्रत्येक कोप-यात ठेवाव्या . यामुळे ढेकुण घराबाहेर जाण्यास आणि मारण्यास बर्‍याच प्रमाणात मदत होते. अशा प्रकारे काळे आक्रोड ठेकून बाहेर काढण्यास फायदेशीर ठरतात.

चहाचे झाड :-

ढेकणांचा मुळांपासुन नायनाट करण्यासाठी चहाच्या झाडांचा उपयोग अतिशय प्रभावशाली ठरतो. चहाच्या झाडांची पाणे ठेवल्यांनी देखील ढेकुण मरतात. तसेच एका बाटलीमध्ये पाणी आणि चहाच्या झाडांचे तेल मिसळुन घ्यावे. आणि ते एका बाटलीमध्ये भरून शेक करावे. आणि जिथे जिथ ढेकणं झाले आहेत. तिथे तिथे हा स्प्रे शिंपडावा याने ढेकणं मरून जातात. एक आठवडाभर या स्प्रे चा वापर ढेकुण मारण्यासाठी करावा. याने ढेकुण मरून जातात आणि आपल्या घरातून ढेकणांचा नायनाट आणि अतिरिक्त शिरकाव कमी होईल .

सारांश – ढेकूण मारण्यासाठी औषध /ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय/ ढेकूण होण्याची कारणे / dhekun marnyache gharguti upay

आपण जर ढेकूण जास्त होणे, यामुळे त्रस्त असाल तर आमच्या ” ढेकूण मारण्यासाठी औषध / ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय” या लेखात सांगितलेली माहिती, उपाय आणि औषध वापरुन आपण ढेकूण पासून होणारा त्रास आणि ढेकूण होणे रोखू शकता. ही माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी येईल.

आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, “ढेकूण मारण्यासाठी औषध /ढेकूण मारण्याचे घरगुती उपाय / ढेकूण होण्याची कारणे / dhekun marnyache gharguti upay कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top