टाचा भेगा उपाय / पायाच्या भेगा उपाय – 8 Best Remedies On Heel Splits

टाचा भेगा उपाय / टाचांच्या भेगा / पायाच्या भेगा उपाय / पायांच्या भेगा >>> सौंदर्य म्हणलं कि, प्रत्येक तरुणीच लक्ष हे फक्त चेहरा आणि केस याकडेच राहिले जाते. आपल्या चेहर्‍याची, त्वचेची ,हाताची, मानेची आपण काळजी घेतो परंतु; त्याचसोबत पायांची आणि तळपायाची काळजी घेणे हे देखील तेव्हडेच महत्वाचे आहे. जसे आपल्या चेहर्‍यावर किंवा हातावर स्किन च्या काही समस्या निर्माण होऊ शकतात तसेच आपल्या तळपायाच्या देखील समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणजेच तळपायाला म्हणजेच टाचाला भेगा पडू शकतात त्यामुळे आपल्या शरीराच्या काळजी सोबतच तळपायाच्या सौंदर्याची देखील काळजी घ्यावी. कोमल ,मुलायम आणि स्वच्छ पाय हे एक सुंदरतेच लक्षण आहे परंतु आपण पाहतो की बर्‍याच लोकांना पायांना पडणाऱ्या भेगा अतिशय परेशान करत असतात अगदी त्यांना चालताना देखील त्रास होतो आणि त्यांच्या पायाच्या सौंदर्याचे अगदी तीन तेरा वाजतात.

टाचा भेगा उपाय / टाचांच्या भेगा / पायाच्या भेगा उपाय / पायांच्या भेगा / payachya bhega upay
टाचा भेगा वर उपाय / payachya bhega upay

पायांना, टाचांना पडणार्‍या भेगा हे अनेक लोकांच्या समस्येचे कारण बनत आहे. सुंदर टाचा असाव्यात अशी अनेकांची इच्छा असते यासाठी स्त्री आणि पुरुष असा अपवाद नाही. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हे टाचांचे दुखणं जास्त प्रमाणात जाणवून येते, कारण यावेळी तळपायांवर पडणाऱ्या , टाचांना पडणार्‍या भेगा याची दाट शक्यता असते. यामागे धूळ, वातावरण, बदलते हवामान यासारखी अनेक कारणे आहेत.

काही वेळेस हिवळ्याच्या दिवसात आपण पाणी कमी प्रमाणात पितो त्यामुळे आपल्या पायांच्या टाचांनांना भेगा पडण्याची शक्यता जास्त असते कारण आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर पायाच्या टाचाणा निश्चितच भेगा पडतात परंतु; थोडी अधिक काळजी घेवून आपण पायांवरील भेगांपासून मुक्तता मिळवू शकतो. त्याचसाठी आम्ही येत आहोत एका अनोख्या माहिती सोबत. पायांना पडणार्‍या भेगा , टाचा भेगा यावर उपाय , ही माहिती नक्कीच आपल्याला अतिशय उपयोगी येईल.

टाचांना भेगा/पायांच्या भेगा / टाचांच्या भेगा पडण्याची कारणे

पायांची योग्य ती काळजी न घेणं हे पाय फुटण्याचे , त्यांना भेगा पाडण्याचे महत्त्वाचे कारण आहे. थंडीच्या दिवसात हि समस्या जरा जास्त जाणवते कारण हिवाळ्यामध्ये त्वचेचा मुलायमपणा नाहीसा होऊन त्वचा रुक्ष बनते. थंडीत खूप वेळ पाय पाण्यात राहिल्यामुळे टाचांना भेगा पडतात . 

बाहेरून आल्यानंतर जर पाय स्वच्छ धुतले नाहीत तर आपल्या तळ पायांना लागलेली माती, धूळ यात असणाऱ्या जंतूंमुळे पायाची त्वचा ही कोरडी राहते व पायाच्या टाचांना भेगा पडू शकतात. 

दिवसभर तासन तास उभं राहून काम करणं, टाचा  उघड्या असणाऱ्या चप्पल किंव्हा बूट वापरणं, शरीरात अति उष्णता असणे, सतत पाण्यात पाय असणं हे देखील टाचांच्या भेगाचे कारण असू शकतात.

सतत थंड पाण्याशी येणारा संपर्क, कोरडी त्वचा, जीवनसत्त्वांची कमतरता, चालण्याची चुकीची पद्धत, अति उंच टाचाच्या चप्पल वापरणे यासारख्या अनेक कारणांमुळे टाचांना भेगा पडतात. 

पायांची काळजी घेण्यासाठी  बाजारामध्ये अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु यावर घरच्या घरी ही उपचार करता येऊ शकतात आणि आपल्या टाचणा पडणार्‍या भेगा याचे निराकरण करता येते. चला तर मग बघूया ,टाचांच्या भेगांवरील उपाय कोणते आहेत …… 

टाचा भेगा उपाय/ पायाच्या भेगा उपाय / payachya bhega upay

आपल्या पायाला जर भेगा पडल्या असतील तर, आपण खालील उपाय करावे या मुळे आपला त्रास नक्की कमी होईल, आणि पायाचे सौंदर्य वाढेल. पहिले काळजी घ्यावी ती अशी की, कुठेही बाहेर जावून आल्यावर पाय स्वच्छ धुवा. पायावर धूळ, माती राहणार नाही याची काळजी घ्या. पायावर धूळ किंवा माती राहिली तर पायांच्या भेगा कमीच होणार नाही. त्यामुळे कोणतेही उपाय करण्याआधी आपण वरील काळजी घ्यावी जेणे करून आपण करत असलेल्या उपायांचा फायदा होईल.

कोमट पाणी: टाचा भेगा वर उत्तम घरगुती उपाय

टाचा भेगा उपाय / टाचांच्या भेगा / पायाच्या भेगा उपाय / पायांच्या भेगा - कोमट पाणी
कोमट पाणी – टाचा भेगा घरगुती उपाय

रोज बादलीभर कोमट पाण्यात मूठभर मीठ टाकून १५-२० मिनिटे त्यात पाय ठेवून बसावे. नंतर तेल लावून मसाज करावे. यामुळे पायावरची मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. पाय मऊ होतात. रात्री झोपताना असे केल्यास दिवसभर पडलेल्या कामाचा थकवाही दूर होतो आणि टाचांना भेगा पडल्या असतील तर त्याही कमी होतात. शिवाय टाचांच्या भागात रक्ताभिसरण छान होते मसाज केल्यामुळे आराम मिळतो . 

शरीरातील उष्णता कमी करावी

शरीरात असणारी उष्णता हे एक महत्वाचे आणि सर्वात जास्त प्रमाणात असणारे कारण समजले जाते टाचेच्या भेगांचे. ज्या व्यक्तींचे शरीर उष्ण असते म्हणजेच ज्यांच्या शरीरात उष्णता जास्त असते त्यांना टाचांना भेगा पडण्याची दाट शक्यता असते .त्यामुळे शरीरातील उष्णता कमी कशी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी प्रकृतीला थंड असणारे पदार्थ खावेत.

खोबरेल तेल: टाचांच्या भेगा कमी करण्यास मदत

टाचा भेगा उपाय / टाचांच्या भेगा / पायाच्या भेगा उपाय / पायांच्या भेगा
खोबरेल तेल

आठवड्यातून २-३ वेळा झोपताना पायांना खोबरेल तेलाने मसाज करावा. जर पायातून रक्त येत असेल किंव्हा पायाला सूज असेल तर खोबरेल तेल यावर गुणकारी औषध मानलं जात. यामुळे कोरडी पडलेली त्वचा मुलायम बनते. पायाच्या त्वचेला खोबरेल तेलामुळे पोशक घटक मिळतात त्यामुळे परत परत पायांना भेगा येत नाही आणि पायाचे सौंदर्य देखील वाढते.  

कोरफड: टाचा भेगा घरगुती उपाय

कोरफड - टाचा भेगा उपाय / टाचांच्या भेगा / पायाच्या भेगा उपाय / पायांच्या भेगा
कोरफड

कोरफड ही सुद्धा अत्यंत गुणकारी असते. कोरफडीचा गर जर पायांना लावला तर पायांना थंडावा मिळतो व पायाच्या त्वचेतील रुक्षपणा, खरखरीतपणा कमी होतो.

टाचा भेगा उपाय / टाचांच्या भेगा / पायाच्या भेगा उपाय / पायांच्या भेगा

 कोरफड ही शरीरातील उष्णता आणि रुक्षपणा कमी करण्यास मदत करते . कोरफड मुळे पायाच्या टाचांची त्वचा मुलायम राहते . त्यामुळे खोबरेल तेल यासोबत कोरफड ही देखील यावर प्रभावी काम करते.

कडूलिंबाची पाने

टाचा भेगा उपाय / टाचांच्या भेगा / पायाच्या भेगा उपाय / पायांच्या भेगा - कडूलिंबाची पाने
कडूलिंबाची पाने

कडूलिंबाच्या पानांचा उपयोग पायाच्या भेगा दूर करण्यासाठी होतो. कडिलिंबाच्या पानांमध्ये हळद व थोडेसे पाणी  घालून त्याची पेस्ट करावी. पाय स्वच्छ धुवून त्यावर ही पेस्ट लावावी. पेस्ट पूर्ण वाळल्यानंतर मग पाय साफ करावेत. कडूलिंबामध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सिडंट्स गुणधर्मामुळे पायांवरील भेगा लगेच भरण्यास मदत होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये जर पायाला भेगा पडल्या असतील तर नक्की कडूलिंब याचा उपयोग करावा. आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल ॰

लिंबाचा रस: पायाच्या भेगा उपाय

पायाच्या भेगा उपाय - लिंबाचा रस
लिंबाचा रस

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडासा लिंबाचा रस मिसळून त्यात १०-१५ मिनिटे पाय सोडून बसावे.त्यानंतर पायांना स्क्रब करून पाय धुवावेत. लिंबाच्या रसामुळे त्वचा मऊ आणि मुलायम बनते. तसेच मृत झालेली त्वचा निघून जाते . लिंबू हे अॅंटीबक्टेरियल गुण परिपूर्ण असल्यामुळे कुठलेही इन्फेकशन असेल तर ते देखिल नाहीसे होते . म्हणून लिंबू चा रस अतिशय फायदेशीर ठरू शकतो .

मध : टाचा भेगा उपाय

टाचा भेगा उपाय / टाचांच्या भेगा / पायाच्या भेगा उपाय / पायांच्या भेगा - मध
मध

एक बादलीभर थोडे गरम म्हणजेच कोमट पानी घ्यावे आणि त्यामध्ये पाच ते सात चमचे मध मिसळावा . आणि आता या पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट पाय बुडवून बसावे . त्यानंतर पायांना स्क्रब करावे . पाय कोमट मधच्या पाण्यात असल्याने अतिशय मऊ मृदु आणि मुलायम होतील . स्क्रब केल्याने डेड स्कीन देखील निघून जाईल . हा उपाय एका आठवड्यातून जवळपास तीन ते चार वेळा करावा , याने नक्कीच टाचणा भेगा पडण्याच्या समस्ये पासून आपल्याला नक्कीच आराम मिळेल आणि आपल्याला या त्रासापासून मुक्तता मिळेन .

व्हॅसलिन: टाचा भेगा रोखते

टाचा भेगा उपाय / टाचांच्या भेगा / पायाच्या भेगा उपाय / पायांच्या भेगा - व्हॅसलिन
व्हॅसलिन

व्हॅसलिनमध्ये त्वचा मुलायम करणारे सर्व ते गुणधर्म असतात. त्यामुळेच थंडीच्या दिवसात व्हॅसलिन जास्त प्रमाणात वापरले जाते. जर पायांच्या भेगा दूर करायच्या असतील तर पाय स्वच्छ धुवून घ्यावेत. पाय कोरडे करावेत व त्यावर मग व्हॅसलिन लावून पायांना मोजे घालावेत. व्हॅसलिन लावल्यानंतर जर त्यावर धूळ किंवा माती बसली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, त्यामुळे यावर सॉक्स म्हणजे मोजे घालावे

सारांश – टाचा भेगा उपाय/ टाचांच्या भेगा/ पायाच्या भेगा उपाय/ payachya bhega upay in marathi

आपल्याला जर पायाच्या भेगा/ टाचा भेगा ही समस्या असेन तर, त्यावर हे सर्व घरगुती उपाय आहेत जे तुमच्या टाचांच्या भेगा कमी करण्यास मदत करतील. या सगळ्या उपायांमुळे तुम्ही घर बसल्या पायांच्या भेगांपासून होणाऱ्या समस्येपासून मुक्तता मिळवू शकता. नक्की हे उपाय अंमलात आणून बघा तुम्हाला फरक नक्की जाणवेल आणि तुमच्या पायाच्या टाचाच्या भेगा कमी होतील.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले “टाचा भेगा उपाय /पायाच्या भेगा उपाय “वर घरगुती उपाय कसे वाटले , हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top