बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय – 10 Best Home Remedies To Reduce BP

बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय / बीपी कमी करण्याचे उपाय / ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय / bp kami karnyasathi upay >> मानवी हृदय हे संपूर्ण शरीरातील सर्वात महत्वाचे अवयव आहे. आपले हृदय हे नसांच्या माध्यमातुन संपुर्ण शरीरात रक्त पाठवण्याचे काम करते आणि कार्य अविरतपणे चालूच असते. शरीरात वाहणारे रक्त सुरळीत कार्यरत राहण्यासाठी, प्रवाहात राहण्यासाठी त्यावर एक निश्चित दबाव असणे गरजेचे असते; परंतु जेव्हा काही कारणांमुळे नसांमध्ये रक्ताचा दबाव अधिक वाढतो तेव्हा उच्च रक्तदाबाची म्हणजेच हाय ब्लडप्रेशरची समस्या निर्माण होते आणि ही समस्या गंभीर स्वरूप देखील घेऊ शकते आणि म्हणूनच याला नियंत्रणात आणणे हे अतिशय महत्वाचे आणि गरजेचे आहे. या नसांमध्ये रक्ताचा, रक्तप्रवाहाचा दाब वाढला, त्यालाच आपण ब्लडप्रेशर {बी पी} वाढला किंवा रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढला असे आपण म्हणतो.

ब्लडप्रेशर वाढणे ही एक गंभीर समस्या आहे, यामुळे हृदयाचे कार्य थांबण्याची देखील शक्यता असते आणि आपल्या आरोग्याला धोका देखील निर्माण होऊ शकतो . आजकालच्या धावपळीच्या जीवनात आणि वाढता ताणतणाव यांमुळे रक्तदाब वाढणे तसे आजकाल बर्‍याच लोकांना त्रस्त करत आहे. आता सध्याच्या काळात आपण पाहतोय की आजकालच्या तरूणपिढीमध्ये देखील ब्लडप्रेशरची समस्या वाढताना दिसत आहे. अशावेळी आपण यांवर आपले ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी काही घरगुती सामन्य उपाय देखील करू शकता आणि आपले बी पी म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील या बाबत निर्धास्त राहू शकता तसेच त्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याचसाठी आम्ही आज घेऊन येत आहोत अतिशय महत्वाची माहिती “बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय”.

बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय / बीपी कमी करण्याचे उपाय / ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय / bp kami karnyasathi upay
बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

चला तर मग, पाहुया बी पी वाढण्याची कारणे काय आहेत, त्याची लक्षणे कोणती आहेत आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो, जेणेकरून आपला बी पी कमी होईल. सुरूवातीला आपण जाणून घेऊया की. उच्च रक्तदाब म्हणजे काय ?

उच्च रक्तदाब म्हणजे नेमके काय

एखादी व्यक्ती जेव्हा असंतुलित आहाराचे सेवन करते , तेव्हा शरीरात मेद आणि कफ { बॅड कोलेस्ट्रॉल } कोलेस्ट्रॉल यांचे प्रमाण वाढायला लागते . यामुळे नसांमध्ये रक्तप्रवाह सुरळित होण्यास अडथळा निर्माण होतो आणि रक्तदाब वाढतो. जर रक्तदाब 140/90 mm Hg पेक्षा जास्त झाला तर त्या स्थितीला उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लडप्रेशर आहे ,असे म्हणतात . साधारणपणे रक्तदाब हा 120/80 असावा आणि 140/90 mm Hg पेक्षा जास्त झाला तर मात्र आपल्याला हाय ब्लड प्रेशर आहे असे समजावे , आणि आधीच्या काळात याला नियंत्रणात ठेण्यासाठी काही उपाय करावेत , तरी देखील वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा .

ब्लडप्रेशर वाढण्याची कारणे

  • लठ्ठपणा असणे .
  • शारीरीक श्रम किंवा कष्ट न करणे.
  • जेवणात मीठाचे प्रमाण अधिक असणे.
  • बदललेली जीवनशैली, कामाचा ताण, मानसिक ताणतणाव, कमी झोप.
  • धुम्रपान, दारू यासारखी व्यसने करणे.
  • आहारात तेलाचा अति वापर .
  • फास्टफुड, जंकफुड, मैद्याचे पदार्थ, चरबीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे.
  • थायरॉइड, मधुमेह, हृदयरोग आणि किडनी संबधीचे आजार
  • अनुवंशिकता, वाढते वय.

वरील सर्व बी पी वाढण्याची काही कारणे आहेत . जी कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो .आपले ब्लड प्रेशर वाढल्याची काही लक्षणे आहेत त्यावरून बी पी वाढला , हे आपल्या लक्षात येऊ शकते .

ब्लडप्रेशर वाढल्याची लक्षणे

सहसा खालील लक्षणे दिसली तर तुमचा बी पी हा वाढलेला असू शकतो .

बी पी वाढण्याचे लक्षण - बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय / बीपी कमी करण्याचे उपाय / ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय / bp kami karnyasathi upay
चक्कर येणे – बी पी वाढण्याचे लक्षण
  • चक्कर येणे.
  • सतत डोके दुखणे.
  • भिती वाटणे, छातीत दुखणे किंवा धडधड होणे .
  • श्वास घेण्यास त्रास होणे.
  • थकावट जाणवणे .
  • पाय सुन्न होणे .
  • अंधारी आल्यासारखी वाटणे .

ही काही सामान्य बी पी वाढल्याची लक्षणे असू शकतात. जर ही लक्षणे जाणवायला लागली तर आपला बी पी वाढला आहे असे समजायचे आणि पुढच्या गोष्टी टाळण्यासाठी आपला बी पी ताबडतोप तपासून घ्यावा आणि त्यावर काही घरगुती उपचार करावे आणि जर अति उच्च बी पी असेन तर लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा .

ब्लडप्रेशर कमी करण्याचे उपाय / बीपी कमी करण्याचे उपाय /ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय / bp kami karnyasathi upay

आम्ही सांगितलेले खालील उपाय वापरुन तुम्ही तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात आणू शकता आणि त्याचा तुम्हाला नकीच फायदा होईल .

लसुण : बी पी कमी करण्यासाठी उपाय

बी पी कमी करण्यासाठी तसेच बी पी नियंत्रणात ठेवण्यासाठी लसुण एक प्रभावी उपाय आहे. लसुण रक्त शुद्ध करण्याचे आणि रक्त पातळ करण्याचे कार्य करतो. बी पी नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ दोन लसणाच्या पाकळ्या कच्च्या चावुन खाव्यात.

बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय / बीपी कमी करण्याचे उपाय / ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय / bp kami karnyasathi upay - लसूण आणि मध
लसूण आणि मध – ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय

जर लसणाचा स्वाद आवडत नसेल तर दुधासोबत किंवा मधासोबत लसुण घेवू शकता. लसूण कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करतो .

कांदा :ब्लड प्रेशर कमी करण्याचा घरगुती उपाय

बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय / बीपी कमी करण्याचे उपाय / ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय / bp kami karnyasathi upay - कांदा / कांदा रस
कांदा / कांदा रस – बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

कांद्यामध्ये क्वेरसेटिन नामक अँटिऑक्सिडंट असते. याला बी पी नियंत्रणात आणण्यासाठी फारचं उपयोगी मानलं जातं. कांद्याच्या रसामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळा त्याचे सेवन केल्याने बी पी नियंत्रणात येते. कांद्याचा रस हा बी पी कमी करण्यासाठीचा अतिशय प्रभावी उपाय आहे. कांद्याच्या सेवनामुळे तुमचं बी पी नक्कीच नियंत्रणात येईल .

लिंबु : ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी उपयुक्त

बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय / बीपी कमी करण्याचे उपाय / ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय / bp kami karnyasathi upay - कोमट पाणी आणि लिंबू रस
कोमट पाणी आणि लिंबू रस – बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

भारतासह अनेक देशात लिंबाचा रस हा बी पी नियंत्रणात आणण्यासाठीचा प्रभावी उपाय मानला जातो. बी पी कमी करण्यासाठी दिवसातुन दोन वेळा एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून प्यावे. किंवा सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबुरस मिसळून यावा, यामुळे रक्तवाहिन्या लवचिक बनतात आणि रकप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते व आपला बी पी कमी होतो तसेच बी पी वाढण्याचे प्रमाण देखील कमी होते .

आलं : बीपी कमी करण्याचे उपाय म्हणून गुणकारी

आले - घरगुती उपाय
आले / अद्रक – बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

हाय बी पी नियंत्रणात आणण्यासाठी म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठीआले म्हणजे अद्रक देखील भरपूर प्रमाणात उपयोगी येते . आल्याचा छोटा तुकडा दररोज जर चावून खाल्ला तर वाढलेली बी पी कमी होते. त्यामुळे नियमित आपल्या आहारात आल्याचा समावेश करावा .

बदाम : बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

    बी पी कमी करण्यासाठी रात्रभर बदाम पाण्यात भिजवत ठेवावेत आणि सकाळी भिजवलेले बदाम सोलुन खावेत . यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हाय बी पी नियंत्रणात येते. बदामाच्या जागी पिस्ता वापरला तरी चालेल, पिस्त्याचा वापर करून देखील ही बी पी कमी करता येते. बदाम हा फॅट वाढवणारा पदार्थ नसल्याने त्याचा अतिशय अनुकूल परिणाम होतो आणि बी पी नियंत्रणात येतो.

ब्लड प्रेशर कमी करण्याचे इतर उपाय

आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, दुध यांचा समावेश जास्तीत जास्त प्रमाणात करावा .

जर हाय बीपीचा त्रास असेल , तर आहारातील मीठाचे प्रमाण कमी करावे. लोणचे , पापड हे पदार्थ खाऊ नयेत कारण यात मीठाचे प्रमाण जास्त असते .

दिवसभरात भरपुर पाणी प्यावे. यामुळे रक्तप्रवाह सुरळित होतो, रक्तातील अशुद्धी दुर होते , रक्त पातळ राहण्यास मदत होते आणि बी पी ही आटोक्यात राहते.

जास्त वजन जर असेल तर बी पी वाढत असते म्हणुन रोज व्यायाम आणि योगासने करून वजन आटोक्यात ठेवावे . मेदयुक्त पदार्थ कमी खावेत .

बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय / बीपी कमी करण्याचे उपाय / ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय / bp kami karnyasathi upay
वजन आटोक्यात ठेवा

मानसिक ताण हे अनेक रोगांचे कारण आहे. त्यामुळे विनाकारण चिंता करणे, काळजी करणे , भविष्याचा विचार करणे कमी करावे . मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित ध्यान-धारणा करावी, तसेच पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.

रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ वातावरणात फिरावयास जावे . याने देखील बराच फायदा होतो .

सारांश – बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय /ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय /bp kami karnyasathi upay / बीपी कमी करण्याचे उपाय

बी पी वाढण्याचा त्रास असेन तर तुम्ही आमच्या “बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय” या लेखात सांगितलेले सर्व “बी पी कमी करण्याचे घरगुती उपाय ” वापरुन तुम्ही तुमचं बी पी वाढलेला असेन तर ,ते नियंत्रणात आणू शकता आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल .

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले, बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय/ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय/बीपी कमी करण्याचे उपाय /(bp kami karnyache upay)  ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top