राशी भविष्य – बारा राशी माहिती – Main Twelve Zodiac Information

राशी भविष्य / बारा राशी नावे / मराठी राशिभविष्य / राशिभविष्य ची माहिती / bara rashi / rashi bhavishya in marathi >>> आपल्या भारतीय संस्कृती मध्ये राशीला अनन्य साधारण असे महत्व आहे. एकूण बारा राशी आहेत त्या कोणत्या आहेत आणि त्या बद्दल इतर माहिती आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही हा लेख घेऊन येत आहोत. चला तर पाहूया अधिक माहिती या राशींविषयी “राशी भविष्य / बारा राशी नावे/ rashi bhavishya in marathi” या विशेष लेखात.

रास ही अतिशय महत्वाची समजली जाते. रास ही जन्म नावावरून तसेच नावाच्या शब्दावरून ठरवली जाते. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या राशिवरून आपल्या लक्षात येऊ शकतो. कारण बारा राशि त्यांच्या स्थानी असलेल्या गुरुवरून त्या-त्या व्यक्तीचा स्वभाव, गुण, अवगुण, दोष आणि त्यांचे भविष्य दर्शवीत असते. तसेच ज्या राशीत शनि चे आगमन होते तेव्हा त्या राशीच्या लोकांचे ग्रहमान बदलले असे आपण म्हणतो त्याच साठी आपल्याला आपली रास ही माहीत असावी. हे राशिभविष्य साप्ताहिक तसेच मासिक देखील सांगितले जाते, परंतु या लेखात आपण एकंदरीत या बारा राशी नावे आणि त्यांचे राशी भविष्य याची माहिती पाहणार आहोत.

राशी भविष्य / बारा राशी नावे / मराठी राशिभविष्य / राशिभविष्य ची माहिती / bara rashi / rashi bhavishya in marathi

या लेखाद्वारे तुम्हाला तुमच्या आणि घरातील इतर सदस्य आणि मित्र- परिवार यांच्या राशी, स्वभाव,गुण दोष या विषयी अधिक माहिती प्राप्त होऊन त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे या राशी भविष्य माहितीच्या आधारे, या लेखा द्वारे तुम्हाला तुमच्या राशी नुसार आवश्यक असणारे स्वभाव बादल करण्यास आणि तुमची भरभराट होण्यास मदत होईल. चला तर सुरू करूया माहिती राशी भविष्य याविषयी आणि रास व स्वभाव आणि बारा राशी नावे याविषयी ची विस्तृत माहिती, यामुळे तुम्हाला राशी वरुण व्यक्ति ओळखणे सोपे जाईल.

राशी भविष्य / बारा राशी नावे / राशिभविष्य ची माहिती मराठी / bara rashi / rashi bhavishya in marathi

आपल्या भारतीय शास्त्रानुसार बारा राशी नावे आहेत आणि त्या त्या राशीचे स्वतःचे असे एक विशिष्ट असे प्रतीक म्हणजे चिन्ह आहे . प्रत्येक रास स्वतःच्या प्रतीक ने दर्शवली जाते आणि त्या राशीच्या लोकाचे रास नुसार स्वभाव आणि गुण – अवगुण हे कोणते आहेत ते सांगितले जाते. या बारा राशी आणि राशी भविष्य यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर येते तर ती म्हणजे मेष रास

मेष राशीची माहिती – राशी भविष्य मेष

राशी भविष्य / बारा राशी नावे / मराठी राशिभविष्य / राशिभविष्य ची माहिती / bara rashi / rashi bhavishya in marathi
मेष

मेष ही राशी भविष्यातील सर्वात पहिली रास आहे. मेष या राशीचे प्रतीक मेंढा आहे. मेष या राशीचे लोक सहसा इतर राशीच्या तुलनेत जास्त धाडशी असतात. कदाचित त्यांच्या मध्ये असणार्‍या धाडसी गुणामुळेच या राशीचे लोक हे अन्न्यया विरुद्ध आवाज उठविणारे असतात. तर मेष राशीच्या लोकांमध्ये शौर्यता देखिल असते. या राशीच्या लोकांना आपल्या स्वभावाचे खोटे प्रदर्शन करण्यास आवडत नाही. या सर्व गूणासोबत मेष राशीचे काही अवगुण देखील आहेत, ते म्हणजे या राशीचे लोक मे जे बोलेल तेच खरे असे म्हणणारे असतात, अहंकार, अविचरीपणा, मनमानीपणा. मेष ही राशी मंगळ या ग्रहाच्या आधिपत्या खाली येणारी राशी आहे. मेष ही राशी वरील सर्व गुण आणि दोष दर्शविते.

वृषभ राशीची माहिती मराठी

राशी भविष्य / बारा राशी नावे / मराठी राशिभविष्य / राशिभविष्य ची माहिती / bara rashi / rashi bhavishya in marathi
वृषभ

वृषभ ही राशी भविष्यातील दुसर्‍या स्थानी येणारी राशी आहे. या राशीचे प्रतीक हे बैल आहे. मुख्यतः या राशीमद्धे शुक्र या ग्रहाचे गुण असतात त्यामुळे वृषभ या राशीचे लोक हे प्रेमळ आणि सौन्दर्यवाणी असतात. तसेच या राशीचे लोक हे आनंदी आणि मुळातच रसिक असतात, आणि त्यामुळेच या राशीचे लोक कामात गडबड आणि धांद्रटपणा करतात. मेष या राशीप्रमाणेच वृषभ या राशीचे देखील काही अवगुण आहेत, ते म्हणजे आळशीपणा, हेकेखोर पणा, लालचीपणा, आडमुठेपणा आणि या स्वभावामुळे काही वेळेस वृषभ राशींच्या लोकांचे नुकसान होते.

मिथुन राशीची माहिती – मराठी राशी भविष्य

मिथुन ही तिसर्‍या क्रमांकावर येणारी रास आहे, या राशीचे प्रतीक हे गदाधारी पुरुष आहे आणि विनाधारी स्त्री असलेले हसतमुख जोडपे आहे. या राशीचे लोक हे कुशाग्र बुद्धी असणारे असे हुशार असतात. मिथुन राशीच्या लोकांची स्मरण शक्ति ही खूप चांगली असते. या राशीचे लोक हे समयसूचक अशा विचारसरणीचे असतात. समयसूचकता हा गुण प्रभावी असतो. इतर राशी प्रमाणे या राशीचे देखील काही अवगुण असतात, मानसिक संताप, अनावश्यक बडबड, अस्थिरता यांसारखे दोष या राशीत असतात.

कर्क राशीची माहिती

राशी भविष्य / बारा राशी नावे / मराठी राशिभविष्य / राशिभविष्य ची माहिती / bara rashi / rashi bhavishya in marathi
कर्क रास

कर्क या राशीचे चिन्ह हे खेकडा आहे. या राशीमध्ये संवेदनक्षमता असते. तसेच या राशीचे लोक हे भावनिक म्हणजेच भावनाशील आणि कोमल असतात. या राशिमध्ये परिस्थिति नुसार बदलण्याची क्षमता असते, डोक्याने बोलण्या पेक्षा र्हुदयाने बोलणे हे लोक जास्त पसंद करतात. कर्क राशीचे अवगुण म्हणजे अति हळवेपणा, भावनांच्या आहारी जाणे, मानसिक चंचलता, कल्पना साम्राज्यात रामाने, यांसारखे दुर्गुण असतात, म्हणजे ही रास काही प्रमाणात सोशीक असल्याने यांचे सहिष्णुतेचे पारडे जड असते.

सिंह राशीची माहिती – सिंह रास आणि स्वभाव

राशी भविष्य / बारा राशी नावे / मराठी राशिभविष्य / राशिभविष्य ची माहिती / bara rashi / rashi bhavishya in marathi
सिंह रास

ही रास सिंह या चिन्हाणे दर्शविली जाते, या राशी मध्ये धैर्यवाद, आशावाद, समजूतदारपणा हे गुण असल्याने या राशींच्या लोकांचे बोलणे. वागणे, संभाषण हे रुबाबदार असते आणि सर्वांना आवडते. या राशी मध्ये पुढारीपनाचे गुण असतात. या राशींच्या लोकांमध्ये अहंकार आणि स्वाभिमान हे गुण असतात. सिंह राशीच्या लोकांचे अवगुण म्हणजे या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणती गोष्ट झाली नाही तर राग येतो.

कन्या राशीची माहिती – कन्या रास आणि स्वभाव

कन्या या राशीचे प्रतीक नौकेत बसलेली स्त्री हे आहे आणि तिच्या एका हातात अग्नि आणि दुसर्‍या हातात धाण्याची ओंबी आहे. या राशीच्या लोकांमध्ये हाजिर जवाबीपणा असतो. या राशीच्या लोकांची बुद्धिमत्ता देखील खूप चांगली असते तसेच हे लोक संशोधक अशा वृत्तीचे असतात. या राशी मध्ये संशयीपणा आणि चिडचिडेपणा यांसारखे अवगुण असतात. प्रत्येक गोष्टी मध्ये अति चिकित्सा करण्याच्या सवयीमुळे यांना कोणतेही निर्णय घेताना त्रास होतो.

तूळ राशीची माहिती – तूळ राशींच्या लोकांचा स्वभाव

तूळ या राशीचे चिन्ह हे तराजू आहे. ही रास प्रेमल आणि भावना प्रधान रस आहे, तसेच या राशीच्या लोकांना आपली कला जोपासायला आवडते. जीवनात आलेली कितीही दुःख आणि संकटे सहन करण्याची ताकद या राशीतल्या लोकांना असते या राशीमध्ये डामडौलपणा अधिक प्रमाणात असतो.त्यामुळे त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे असते. या राशीचे अवगुण म्हणजे आपले शौक पुरविण्यावर त्याच्या खर्चावर याचे नियंत्रण नसते.

वृश्चिक राशीची माहिती

या राशीचे चिन्ह हे विंचू आहे. ही रास कळण्यास अतिशय अवघड आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांच्या मनामध्ये काय चाललय आणि प्रत्यक्ष कृती मदये हे लोक काय करतील हे सांगता येत नाही. गुप्तता हा एक चांगला गुणधर्म आहे त्यामुळे त्यांना या राशीच्या लोकांना योग्य त्या वेळी त्यांच्या भावनावर आवर घालता येते. यांच्या मध्ये इच्छाशक्ति, धडाडी असते. सर्वात विषारी आणि मनाला टोचेल असे बोलणारी ही रास आहे.

धनू राशीची माहिती

राशी भविष्य / बारा राशी नावे / मराठी राशिभविष्य / राशिभविष्य ची माहिती / bara rashi / rashi bhavishya in marathi

या राशीचे चिन्ह अर्धा भाग धंनुर्धारी पुरुष आणि अर्धा भाग घोडा असे आहे. महत्वकांक्षा, परोपकार अशी वृत्ती असणारी ही रस आहे. प्रेमलपणा, दिलदारपणा, हे या राशीचे महत्वाचे गुण आहेत. या राशीच्या व्यक्तींना मर्दानी खेळांची आवड असते. ही लोक कायम उत्साही, आनंदी असतात. यांना नवनवीन काही करण्याची आवडा असते. साहत्यिक क्षेत्रातील व्यक्ति शक्यतो या राशींच्या असतात.कारण या राशिला पुस्तकांची अधिक आवड असते. तसेच या लोकांना काहीवेळेस आपल्या बुद्धिमत्तेचा अहंकार चढतो तसेच महत्वाचे निर्णय घेतणा त्यांची द्विधा मन होते. हा या राशीचा दोष आहे.

मकर राशीची माहिती

राशी भविष्य / बारा राशी नावे / मराठी राशिभविष्य / राशिभविष्य ची माहिती / bara rashi / rashi bhavishya in marathi

या राशीचे चिन्ह हे मगर आहे. या राशीचे लोक अधिकतर उच्च असतात. या राशीच्या लोकास शनीच्या वरदहस्तामुळे सोशीकपणा, गंभीरपणा आणि चिकाटी हे गुण भरभरून असतात. यांना लहानपणा पासूनच कष्ट करण्याची सवय असते. कितीही संकटे आली तरी या राशीचे लोक चिकाटीने काम पूर्ण करतात. काटकसरी स्वभाव असल्याने शिळे अन्न संपविणे याकडे यांचा कल असतो. तसेच ‘कोणावरही अवलंबून न राहणे’ हा यांचा एक विशेष गुण आहे. जरा काही मनाविरुद्ध झाले की मकर राशीचे लोक निराश होतात, हा या राशीचा अवगुण आहे.

कुंभ राशीची माहिती

राशी भविष्य / बारा राशी नावे / मराठी राशिभविष्य / राशिभविष्य ची माहिती / bara rashi / rashi bhavishya in marathi

या राशीचे चिन्ह हातात घट घेतलेला पुरुष आहे. कुंभ ही रास प्रगत आणि उत्तम दर्जाची रास समजली जाते. या राशीमध्ये कुशाग्र बुद्धिमत्ता, अफाट स्मरणशक्ती असल्याने चिंतन व वचन यांची कुंभ राशीच्या लोकांना आवड असते. सिद्धीचा वरदहस्त, उत्कृष्ठ चिकाटी असल्यामुळे ही रास मानवी जीवनाचा आविष्कार आहे. या राशीचा अवगुण म्हणजे ही लोक काटकसरी असतात.

मीन राशीची माहिती

राशी भविष्य / बारा राशी नावे / मराठी राशिभविष्य / राशिभविष्य ची माहिती / bara rashi / rashi bhavishya in marathi
मीन रास (Photo from टीव्ही9 network)

मीन ही रास बाराव्या स्थानी येते आणि ही राशीतील सर्वात शेवटची रास आहे या राशीचे चिन्ह एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड केलेले दोन मासे आहे. ही रास भावना प्रधान आहे. त्यामुळे ही लोक कृती पेक्षा त्या कृती मागील भावनेला जास्त महत्व देतात. ही रास गुंतागुंतीची रास असल्याने यांच्या मनात कायम वैचारिक गोंधळ चालू असतो तसेच मीन राशीचे लोक हळव्या स्वभावाचे असतात. सत्वगुण, स्वार्थत्याग हे यांचे चांगले गुणधर्म आहेत. माफक खर्च व आनंदी वृत्ती यांच्या झगमगाटापासून हे लोक दूर असतात.

सारांश – राशी भविष्य / बारा राशी नावे/ मराठी राशिभविष्य /raashi bhavishya / rashi bhavishya in marathi

वरील लेखाद्वारे, बारा राशी नावे त्यांचे प्रतीक/चिन्ह , स्वभाव, गुण-अवगुण, राशी भविष्य , याविषयी माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि या माहीतीचा तुम्हाला नक्कीच फायदा देखील होईल. तुम्हाला जर तुमच्या किंवा घरतीक इतर सदस्याच्या राशी आणि राशिभविष्य याविषयी जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख तुम्हाला नक्कीच खूप उपयोगी येईल.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले ,राशी भविष्य/ बारा राशी नावे , ही घरगुती माहिती /( rashi bhavishya/rashi bhavishya in marathi ) हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top