उष्णता कमी करण्याचे उपाय – Best 15 Remedy for Reducing Heat

उष्णता कमी करण्याचे उपाय / तोंडातील उष्णता कमी करण्याचे उपाय / शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय / ushnata kami karnyache upay >>> उष्णता वाढणे हे बाहेरच्या वातावरणात देखील जाणवते आणि आपल्या शरीराच्या बाबतीत देखील जाणवते. आपण पाहतो की, आपल्याला कधी कधी काही कारणाने अचानक पणे एकदम गरम झाल्यासारखे वाटते, बाहेर एवढा उकाडा नसला तरी देखील आपल्या शरीराचे तापमान हे अगदीच वाढल्यासारखे वाटते, हा असा अनुभव तुम्हाला सुध्दा नक्कीच कधी न कधी आलाच असेल.

खरेतर हा अगदी कॉमन म्हणजेच सर्वसाधारण आणि सामान्य त्रास आहे. अशा प्रकारे अचानक आपली बॉडी म्हणजेच शरीर हे गरम होण्याला ‘हिट स्ट्रेस’ असे म्हणतात. सामान्यतः आपल्या शरीराचे तापमान 98.6 फरन्हाईत इतके असायला हवे पण; ते कधीतरी कमी जास्त होत असते, माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान 97.8 ते 99 फरन्हाईट इतके असावे जर 98.6 च्या वर गेले तर असे समजावे की, आपल्या शरीराची उष्णता वाढलेली आहे.

आपले शरीर हे बाहय वातावरणाशी समायोजन साधून, समन्वय करून आपल्या शरीराचे तापमान योग्य प्रमाणात राखत असते. परंतु कधी तरी काही कारणाने हे तापमान वाढु शकते. यालाच हिट स्टेस असे देखील म्हणतात. आपल्या शरीराचे तापमान वाढणे किंवा हिट स्ट्रेस वाढणे यामागे अनेक वेगवेगळी कारणे असु शकतात. वातावरणात उन्हाळा या ऋतु मध्ये उष्णता वाढणे, खुप प्रमाणात वाढणे हे एक कारण आहे पण ते एकमेव कारण मात्र नाही. तुम्हाला सुध्दा असे अनुभव आलेच असतील अशा वेळेला या उष्णतेचा त्रास होतोच पण त्या मागचे कारण न समजल्यामूळे परत परत हा त्रास होण्याची शक्यता असते. एखादी समस्या दुर करायची असल्यास त्या समस्या मागचे नेमके कारण मुळापासुन नष्ट करणे हे अतिशय जरूरी आहे.

म्हणूनच या लेखात, आपण पाहणार आहोत की, शरीरातील उष्णता कमी करण्याचे काही घरगुती उपाय आहेत. उष्ण आणि दमट वातावरणात दीर्घ काळ राहून शारीरीक कामे केल्याने देखील आपल्या शरीराचे तापमान तात्पुरते वाढु शकते. असे झाल्यावर थकवा जाणवतो.शरीरातील उष्णता कमी होऊन शरीराचे वाढलेले तापमान कमी होण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय आहेत.  हे उपाय केल्याने या त्रासापासुन आपल्याला आराम मिळेल.

उष्णता कमी करण्याचे उपाय / तोंडातील उष्णता कमी करण्याचे उपाय / शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय / ushnata kami karnyache upay

ताक

उष्णता कमी करण्याचे उपाय / तोंडातील उष्णता कमी करण्याचे उपाय / शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय / ushnata kami karnyache upay - ताक
ताक – उष्णता कमी करण्याचे उपाय / ushnata kami karnyache upay

ताक पिण्यामुळे शरीर थंड राहण्यास आणि उष्णता कमी होण्यास मदत होऊ शकते आणि चयापचय सुधारण्यास देखील याची मदत होते. ताक हे जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले आहे जे की ,आपल्याला उष्णतेमुळे कोरडे वाटत असल्यास आपल्या शरीराची नैसर्गिक ऊर्जा पुर्नसंचयित करण्यात मदत करेल. अशाप्रकारे दिवसातून एक ग्लास थंड ताक पिल्याने उष्णता कमी होण्यास मदत होते.

कांसा च्या वाटीने तळपाय घासणे – शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय

उष्णता कमी करण्याचे उपाय / तोंडातील उष्णता कमी करण्याचे उपाय / शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय / ushnata kami karnyache upay
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय

आपल्या शरीरातील उष्णता वाढत असेल तर आपण रोज रात्री झोपताना आपल्या तळपायाला हाताला तेल लावून, तळपाय हे काशाच्या वाटीनं घासावेत. यामूळे झोप शांत लागते हात पायाची उष्णता कमी होते आणि उष्णतेने होणारी जळजळ कमी होते.

रक्त चंदन लेप

उष्णता कमी करण्याचे उपाय / तोंडातील उष्णता कमी करण्याचे उपाय / शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय / ushnata kami karnyache upay - रक्त चंदन लेप
रक्त चंदन लेप – शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय / ushnata kami karnyache upay

आपल्याला जर सतत जळवात होत असेल तर रक्त चंदनाची लेप उगाळून लावावी . रक्त चंदन हे उगाळून पाण्यातुन घेतल्याने देखील उष्णता कमी होण्यास बराच फायदा होतो. रक्त चंदन हे शांत घटक असलेला असल्याने याचा शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यात मोठा हातभार लागतो. सतत उन्हाळी लागणे किंवा गरम पदार्थ, पेय घेतल्याने त्रास होत असल्यास याचे सेवन करावे.

सब्जा किंवा तुळशीचे बी

 सब्जा , गुलकंद आणि तुळशीचे बी, यात आपले शरीर थंड ठेवण्याचे बरेच गुणधर्म असतात.रोज शक्य असेल तर दुध, सरबत किंवा साध्या पाण्यातुन एक चमचा सब्जा अथवा तुळशीचे बी घ्यावे. यासोबतच रोज सकाळी गुलकंद खाल्ला तर याचा अधिक फायदा नक्कीच होतो. सब्जा हा अतिशय गुळगुळीत आणि पचनास तसेच उष्णता कमी करण्यास मदत करतो.

लिंबूपाणी

उष्णता कमी करण्याचे उपाय / तोंडातील उष्णता कमी करण्याचे उपाय / शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय / ushnata kami karnyache upay
लिंबू पाणी

रोज सकाळी नूसते लिंबूपाणी प्यायल्यानं देखील आपल्याला आणि शरीरातील नको असलेले टॉक्सिन्स हे निघुन जातात मात्र हे सुरू केल्यानंतर म्हणजे हा उपाय करत असताना आपण चहा – कॉफी घेणे शक्यतो टाळावे. पोटातील आणि शरीरातील उष्णता कमी करण्यास लिंबू पाणी, किंवा मग लिंबू सरबत हा अतिशय रामबाण असा उपाय आहे, यात शरीराची झीज भरून काढणारे घटक असतात.

फळे आणि पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा

 फळ,फळभाज्या यांचा आहारात जास्त वापर करावा याशिवाय उन्हाळयात जेवणाच्या वेळा पाळाव्यात. शक्यतो रात्री उशिरा जेवणे टाळावे. योग्य आणि अनुकूल वातावरणात मिळनारे फळे यांचे सेवन करावे, जसे उन्हाळ्यात टरबूज, द्रांक्ष टोमॅटो, यामुळे उन्हाळयात होणारा शरीरातील पाण्याचा अपव्यय कमी होतो आणि शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहते.

आहारात पेज चा समावेश

 पेज ही देखील उष्णता कमी करण्यास अतिशय उपयुक्त ठरत. त्यामुळे आपण उष्णता वाढत असेल तरआहारात पेज याचा समावेश करावा.किंवा शक्यतो हलका आहार घ्यावा. अति तेलकट, तिखट, फास्टफुडसारखे पदार्थ टाळावेत ज्यामुळे उष्णता कमी होईल. लहान मुलांना जशी पेज फायदेशीर आसते तसेच आपल्याला देखील उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

नारळ पाणी

उन्हाळयाच्या दिवसात दररोज एक ग्लास नारळाचे पाणी पिणे हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाईट हे भरपुर प्रमाणात असतात यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील सामील असतात. नारळाच्या पाण्यातील हे गूणधर्म शरीराला हायट्रेटेड  आणि उर्जावान बनवण्यात मदत करतात यामध्ये अनेक ऐटींऑक्सीडेंट देखील असतात जे उष्णता कमी करतात.

काकडी चा वापर करणे

पाण्याने भरपुर असलेली काकडी थंड गुणधर्माची असते. उन्हाळयाच्या दिवसात सर्वाधिक पसंतीचे खादयपदार्थांमध्ये सामील असलेल्या काकडीचा उपयोग तुम्ही ज्युस, सलाद, इत्यादी पदधतीने करू शकतात. यामुळे तुम्हाला कमालीचे फायदे हे मिळू शकतात. तुमचे आरोग्य उत्तम आणि निरोगी राहण्यासाठी आवश्यक ते सर्व घटक यांचा समावेश तुम्ही आहारात केलाच पाहिजे.

टरबूज खावे

टरबुज हे उन्हयाळयात येणारे फळ आहे. प्रत्येकाला टरबुज खायला आवडते. टरबुज मध्ये भरपुर प्रमाणात पाणी आणि पोषक तत्व असतात. जे शरीराला हायड्रेटेड करण्याचे कार्य करतात सोबतच टरबुज हे आरोग्यदायी फळ आहे म्हणुन उन्हाळयाच्या दिवसात उष्णता कमी करण्यासाठी आठवडयातुन तीन वेळा तरी थंड टरबुजचा आस्वाद घ्यावा.

तळलेले व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे

 ज्या लोंकाना शरीरातील उष्णता वाढण्याचा त्रास असेल आणि शरीरातील वाढलेली उष्णता कमी करायची इच्छा असेल, त्यांनी तळलेले व मसालेदार पदार्थ खाणे हे पुर्णपणे टाळावे. हे पदार्थ सेवन केल्याने आपल्या शरीरातील तेलाचे प्रमाण वाढते आणि शरीरातील उष्णता देखील वाढते, तसेच बॅड कोलेस्ट्रॉल आणि रक्दाब देखील वाढतो त्यामुळे या पदार्थाचे सेवन टाळावे.

बडीशेप

शरीरातील उष्णता घालविण्यासाठी तुम्ही दोन ते तीन ग्रॅम बडीशेप घ्या आणि ती बडीशेप एकदम चांगली बारीक कुटून एक ग्लास पाणी घ्यावे. आणि त्या पाण्यामध्ये मिक्स करा त्यानंतर तुम्ही दिवसातुन दोन ते तीन वेळा हे पाणी प्या नक्कीच तुमची उष्णता कमी होईल आणि याने तुमची डोकेदुखी थांबेल आणि त्यासोबतच तुम्हाला जर चक्कर येत असेल तर ते देखील बंद होईल.

संत्री

संत्री - शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय / ushnata kami karnyache upay
संत्री

शरीरातील आणि तोंडातील उष्णता वाढत असेल तर आपण किमान दिवसातुन एक ते दोन संत्री नक्की खावी. यामुळे उष्णतेचा त्रास कधीही जाणवणार नाही. कारण संत्री हे देखील जास्त पाण्याचे प्रमाण असणारे फळ आहे, त्यामुळे याच्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढते आणि त्याचबरोबर आपला शरीरातील आणि तोंडातील उष्णता वाढण्याचा त्रास देखील कमी होईल.

टोमॅटो आणि टोमॅटो सलाड

जर आपण फळ भाज्यांमध्ये पाहिले तर शरीरातील आपली उष्णता योग्य प्रमाणात ठेवण्याचे काम टोमॅटो करते. टोमॅटो तुम्ही दिवसातुन एकदा तरी नक्की खा म्हणजे तुम्ही हे जेवणासोबत खाल्ले तरी तुम्हाला तुमची उष्णता योग्य प्रमाणात राहिलेले पहावयाला मिळेल आणि तुम्हाला उष्णतेचा त्रास कधीही होणार नाही.  त्यामुळे तुम्ही नक्कीच जेवणात किंवा कोणत्याही भाजीत टोमॅटाचा वापर नक्की करावा तसेच टोमॅटो चे सलाड खावे॰

उसाचा रस

उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीराचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी उसाचा रस हा नेहमी शरीराला फायदेशीर आहे. उसामध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्स संख्या ही खूप मोठया प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात ताजेतवाने पणा निर्माण होतो आणि उष्णता देखील नाहीशी होते. अशा प्रकारे वरील सर्व उपाया सोबत हा उपाय देखील फायदेशीर ठरू शकतो

सारांश – उष्णता कमी करण्याचे उपाय / तोंडातील उष्णता कमी करण्याचे उपाय / शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय / ushnata kami karnyache upay

आपल्याला देखील कधी कधी अचानक असे राहून राहून अंग गरम होणे किंवा शरीरातील उष्णता वाढणे हा त्रास होत असेल तर आपण आमच्या आजच्या “उष्णता कमी करण्याचे उपाय” या लेखातील उपाय करावेत याने आपल्या शरीरातील उष्णता नक्कीच कमी होईल आणि हा त्रास देखील नाहीसा होईल.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले “उष्णता कमी करण्याचे उपाय / शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय / ushnata kami karnyache upay कसे वाटले, हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीसीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top