सुज कमी होण्यासाठी उपाय – 12 Best Remedies For Inflammation

सुज कमी होण्यासाठी उपाय /सुज कमी होण्यासाठी/ suj kami karnyasathi upay/ suj kami honyasathi gharguti upay >>> सुज ही शरीरावर कुठेही येऊ शकते. काही वेळेस शरीराच्या आतल्या भागावर किंवा काही वेळेस शरीरा वरूनही सुज येऊ शकते. सुज हे एक लक्षण आहे आतून किंवा बाहेरून लागलेल्या माराचे. काही वेळेस इतर कुठल्याही कारणांमुळे देखील शरीरावर सुज आल्यावर ती सुज कशामुळे आली आहे हे माहिती करून घेणे जरूरी आहे, जेणेकरून त्याचे वेळीच निदान करता येईल आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत. आपल्या शरीराच्या आतील किंवा बाहेरील जागेवर जास्त दिवस सुज राहणे हे आरोग्याच्या बाबतीत योग्य नाही त्यामुळे त्यावर लगेचच उपाय करावेत आणि सुज का येतीय त्याचे कारण समजून घ्यावे.

सुज कमी होण्यासाठी उपाय /सुज कमी होण्यासाठी/ suj kami karnyasathi upay/ suj kami honyasathi gharguti upay
हातांची सुज कमी होण्यासाठी उपाय

मधमाशी किंवा गांधील माशी किंवा एखादा किडा चावला तरी देखील त्या जागेवर सुज येते. बाळंतपणामध्ये किंवा प्रेगनंन्सी मध्ये देखील पाय जड पडुन पाय सुजतात. जर बराच वेळ एका जागेवर बसण्यात आले किंवा खुप लांबचा प्रवास झाला तरी देखील पायांवर सुज येते. मुत्रपिंड, यकृत, फुप्फुसे, हृदय , वैगरे महत्त्वाच्या अवयवाच्या कार्यात बिघाड झालेला असला तरी देखील अंगावर सुज येऊ शकते . काही वेळेस बी पी जरी वाढलेला असला तरी देखील तुमच्या पायावर किंवा चेहर्‍यावर सूज येऊ शकते. शरीरातील कुठल्याही भागाची नस जरी आखाडली गेली तरी देखील त्या भागावर सुज येऊ शकते, ही झाली साधारणपणे आपल्या शरीरा वर अथवा शरीराच्या आत सुज येण्याची कारणे.

सुज कमी होण्यासाठी उपाय /सुज कमी होण्यासाठी/ suj kami karnyasathi upay/ suj kami honyasathi gharguti upay - पायांची सुज कमी होण्यासाठी उपाय
पायांची सुज कमी होण्यासाठी उपाय

 बोटातली अंगठी , बांगडया किंवा पायातली चप्पल अचानकच घट्ट झालेली जाणवले तरी देखील रक्त गोठून सुज आल्याचे लगेच समजते. संपूर्ण अंगावर जर सुज असली तर स्वतःचा स्वतःला जडपणा जाणवतो . थकवा येतो , उत्साह कमी होतो. अशाप्रकारची लक्षणे दिसुन येतात. काही साधा मुकामार लागला तरी सुज येते. वात आला असेल व त्याची सुज असेल तर त्याठिकाणी होत असलेली संवेदना कमी होते. तेथील त्वचा काळपट होते. जर पित्त झाल्यावर जी सुज येते ती असेल तर सुज आलेल्या जागेवर वेदना होतात. त्वचा लालसर होते, वेदना होतात, तलवार किंवा चाकुने किंवा इतर कुठल्याही शस्त्राने शरीर कापले गेले व यावर लवकरात – लवकर उपाय नाही केले तर अभिघातज याप्रकारची सुज येते. कधी कधी रात्री बरोबर जर झोप झाली नाही तरी देखील चेहर्‍यावर सूज येऊ शकते .

तर याचसाठी अश्या साधारण अंगावरची सुज येण्याच्या समस्येवर उपाय म्हणून आम्ही “सुज कमी होण्यासाठी उपाय / suj kami honyasathi gharguti upay” हा लेख घेऊन येत आहोत आणि यातील माहिती ही नक्कीच तुम्हाला बरीच उपयोगी येणारी आहे त्याच साठी हा लेख तुम्ही जरूर वाचा . चला तर पाहूया ,सुज कमी होण्यासाठी उपाय कोणकोणते आहेत.

सुज कमी होण्यासाठी उपाय/suj kami karnyasathi upay/suj kami honyasathi gharguti upay

1.हळद आणि दूध –

सुज कमी होण्यासाठी उपाय /सुज कमी होण्यासाठी/ suj kami karnyasathi upay/ suj kami honyasathi gharguti upay - हळद आणि दूध
हळद आणि दूध

 एक ग्लास गरम दुध घ्यायचे आणि त्यामध्ये एक चमचा हळद पावडर आणि वाटलेली खडीसाखर टाकून हे दुध रोज प्यायचे याने दोन -तीन दिवसात शरीरावरील सुज कमी होते .

2.गाजरचे बी – सुज कमी होण्यासाठी गुणकारी

एक ग्लास पाणी घ्यायचे त्यामध्ये दोन चमचे गाजराचे बी घ्यायचे व ते गाजराचे बी त्या एक ग्लास पाण्यात उकळायला ठेवायचे ते छान उकळल्यावर ते थोडे थंड झाल्यावर पिऊन घ्यायचे नियमित हा उपाय याचप्रमाणे केल्यास आलेली सुज लवकर कमी होते.

3. लोणी आणि मिरे पावडर -सुज कमी होण्यासाठी उत्तम घरगुती उपाय

आपण घरात साय जमा करून तुप बनवतो तर तसेच त्यामधली प्रोसेस म्हणजे सायीपासुन आधी लोणी निघाले तर तेच लोणी निघाले तर तेच लोणी घ्यायचे त्यामध्ये काळी मि-याची पावडर टाकायची आणि ते छान असे मिसळून घ्यायचे आणि ते खाऊन घ्यायचे हे मिश्रण खाल्ल्याने कमी दिवसांमध्येच आलेली सूज कमी होईल.

4.बटाट्याची वाफ आणि लेप

 एक ग्लास पाणी घ्यायचे त्यामध्ये 2 ते 3 बटाटे कच्चे कापून घ्यायचे व त्याला पाण्यात उकळायचे ते उकळत असलेल्या पाण्याच्या वाफेचा शेक सुज आलेल्या जागेवर दयावा तसेच त्या पाण्यात उकळलेल्या बटाटयाचा तुकडयाचा लेप करायचा व सुज  आलेल्या जागेवर तो लेप लावायचा . याने कुठेही आलेली सुज नक्की कमी होते आणि सुज आली आहे ती जागा ठणकत देखील नाही आणि दुखत देखील नाही.

5. टरबूज च्या बिया आणि साल

उन्हाळयाच्या सिजनमध्ये भरपुर प्रमाणात थंडावा मिळावा यासाठी आपण टरबुज खातो तसेच त्या टरबुजच्या साली फेकून देतो पण तसे न करता त्या बीया टरबुजच्या साली ह्या सावलीत वाळवून घ्यायच्या आणि त्या वाटून ठेवायच्या. त्यानंतर एक कप पाण्यामध्ये तीन ते चार चमचे टरबुजच्या बियांचे वाटण त्या पाण्यामध्ये टाकून अर्धा एक तास भिजत ठेवावे व याचे दिवसातुन दोन ते तीन वेळा सेवन करावे असे नियमित केल्यास आलेली सुज कमी होईल.

6. बार्ली चे सेवन – सुज कमी करण्यासाठी घरगुती उपाय

बार्ली देखील सूज कमी करण्यात बरीच उपयोगी येते . बार्लीमध्ये असे गुण असतात जे की शरीरासाठी आवश्यक असे असतात. एक लीटर पाणी घ्यायचे त्यामध्ये बार्ली टाकायची आणि ते उकळून घ्यायचे आणि थंड करायचे आणि नियमित पित राहायचे याने सुज आलेली कमी होईल.

7. ऑलिव्ह ऑईल आणि लसूण – सुज कमी होण्यासाठी फायदेशीर

ऑलिव्ह ऑईल घ्यायचे आणि लसणाच्या पाकळया घ्यायच्या दोन चमचे ऑलिव्ह ऑईल घ्यायचे आणि चार लसणाच्या पाकळया घ्यायच्या त्या कापायच्या आणि तेलात भाजायच्या आणि चांगले भाजून झाल्यावर त्यामधील पाकळया काढुन टाकायच्या आणि त्या तेलाने दोन ते तीन वेळा हलक्या हाताने मालिश करायची याने सुज लवकर कमी होईल .

8. जवस आणि जवसाचे तेल

 जवस हे देखील सूज कमी करण्यास फायदेशीर आहे .जवसाच्या तेलाने मालिश केल्यास देखील आलेली सुज कमी होईल आणि वेदना व त्रास कमी होईल. हा उपाय करण्यासाठी जवस चे कोमट करून त्याने मालीश करावे याचा जास्त फायदा होईल. त्याचबरोबर कल्शियम हे कमी असेल तर जवस चा आहारात समावेश करावा, त्यामुळे शरीरातील कल्शियम चे प्रमाण वाढते.

9. कोथिंबीर बी (धने) आणि मध – सुज कमी होण्यासाठी उपाय

सुज कमी होण्यासाठी उपाय /सुज कमी होण्यासाठी/ suj kami karnyasathi upay/ suj kami honyasathi gharguti upay - धने
धने

कोथंबीरीचे बी आणि ताजी पाणे या दोन्हीमध्ये सुज कमी करण्याचे गुणधर्म उपलब्ध असतात. पायांवर जर सुज आली असल्यास एक कप पाणी उकळायचे आणि त्यांमध्ये चार चमचे साबुत धने टाकायचे आणि हे पाणी उकळून निम्मे होऊ दयायचे आणि नंतर ते एका चाळणीने गाळून घ्यायचे व हे पाणी कोमट झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मध टाकायचा आणि दिवसातुन दोन वेळा प्यायचे याने सुज कमी होण्यास मदत होते .

10.मोहरीचे तेल ,ओवा आणि लसूण

मोहरी तेल - सूज कमी करण्यासाठी घरगुती उपाय
मोहरीचे तेल – सुज कमी होण्यासाठी उपाय

मोहरीच्या तेलामध्ये ओवा आणि सोललेल्या लसुण पाकळ्या या जास्त तळून घ्यायच्या अगदी लालसर रंग येई पर्यंत आणि घरपूस तळल्या वर हे तेल थंड झाल्यावर ज्या ठिकाणी सूज आली आहे त्या ठिकाणी लावावे त्याने सुज आलेल्या जागेवर मालिश करायची याने त्रास कमी होईल आणि सूज उतरेल . मोहरी ही सूज करण्यास अतिशय मदत होते.

11. बेलाच्या पानांचा काढा

बेलाची पाणे घ्यायची आणि ती पाणे एका पातेल्यामध्ये पाणी टाकून उकळून घ्यायचे आणि आता ते साधारण एक ग्लास होई पर्यंत उकळून घ्यायचे . आता ते पाणी शेवटी हिरवे दिसते म्हणजे आपला काढा तयार झाला असे समजावं . हा काढा दिवसातून दोन वेळा घेतल्यास आलेली सूज लवकरात लवकर कमी होईल. बी पी मुळे जर सूज येत असेन तर ती येणार नाही .

12. खडे मीठ आणि गरम पाणी

खडे मीठ असते त्यामध्ये स्नायू बळकट करण्याचे गुणधर्म असतात. जे की, वेदनांपासून आराम देतात. अर्धी वाटी खडे मीठ घ्यावे गरम पाण्याने असलेला एक टोब दयावा किवा एखादी बादली घ्यावी त्यामध्ये अर्धी वाटी खडे मीठ टाकावे आणि त्या पाण्यात पाय बुडवून पंधरा मिनिट बसावे .  असे केल्याने आपल्या पायांवर आलेली सूज कमी हेाते आणि पाय देखील दुखत नाहीत.

सारांश -सुज कमी होण्यासाठी उपाय /suj kami honyasathi upay/suj kami honyasathi gharguti upay

आपल्याला जर आपल्या शरीरावर कुठे सुज आली असेल तर आपण आमच्या वरील लेख “सुज कमी होण्यासाठी उपाय/ suj kami karnyasathi upay” या महितीचा उपयोग करून बघवा, ही माहिती वाचून तुम्ही तुमच्या समस्येपासून आराम मिळवू शकता आणि आलेली सुज कमी करू शकता.

आपल्याला वरील लेखामध्ये सांगितलेल्या ,सुज कमी होण्यासाठी उपाय /(suj kami honyasathi upay/ suj kami honyasathi gharguti upay)ही घरगुती माहिती या विषयी माहिती, तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top