उचकी वर हे १५ घरगुती उपाय करा | तुमची उचकी नक्की थांबेल

उचकी (गुचकी)लागणे उपाय/उचकी वर घरगुती उपाय -उचकी लागण्याची कारणे-सतत उचकी लागल्याने होणारे दुष्परिणाम उचकी लागणे उपाय (uchaki var upay/uchaki sathi gharguti upay) >> उचकी लागणे म्हणजे एक खूप साधी व सामान्य गोष्ट आहे. उचकी लागणे याला काही लोक गुचकी लागणे असे देखील म्हणतात. या लेखामध्ये आपण ही गुचकी लागल्यावर काय करावे तेच जाणून घेणार आहोत. उचकी लागली की आपण पाणी पितो आपला असा समज आहे की उचकी लागली की पाणी दिल्यास ती थांबून जाते कोणाची पाणी पिल्यास लगेच थांबते, पण कोणा कोणाची पाणी पिऊन सुद्धा उसकी ही थांबत नाही.उचकी आपल्याला सर्वसाधारणपणे एका मिनिटात पाच ते सहा वेळा तर काहींना जास्त वेळा देखील येऊ शकते.

आपण लहान असताना आपली आजी आजोबा वगैरे जुने लोक सांगायचे की उचकी आली की कोणीतरी व्यक्तीने आपली आठवण केली आहे. परंतु तसे म्हणण्या मागे विनोदा व्यतिरिक्त दुसरे काही नव्हते. कारण उचकी लागण्याचे शास्त्रीय कारण पुढीलप्रमाणे आहे, छाती व पोट यामध्ये एक पडदा असतो, तो पडदा आणि बरगड्या मधील स्नायू यांचे आकुंचन होते व त्याच वेळेस स्वर यंत्रातील स्वरतंतू एकमेकांजवळ येतात या होणाऱ्या कार्याला उचकी येणे असे म्हणतात.

चला तर मग जाणून घेऊयात उचकी वर घरगुती उपाय /उचकी लागणे उपाय / उचकी थांबवण्यासाठी उपाय कोणते आहेत. तसेच उचकी कशामुळे लागते /उचकी लागण्याची कारणे / उचकी येण्याची कारणे बघूयात.

Table of Contents

उचकी वर घरगुती उपाय – उचकी लागणे कारणे – सतत उचकी लागल्यास होणारे परिणाम (uchaki var upay – uchaki lagane karane – satat chya uchakiche dushparinam)

सुरवातीला आपण उचकी वर घरगुती उपाय कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर उचकी कशामुळे लागते म्हणजेच उचकी लागण्याची कारणे जाणून घघेणार आहोत आणि लेखाच्या शेवटच्या भागात आपण सतत उचकी लागल्यास शरीरावर त्याचे काय दुष्परिणाम होतात ते देखील जाणून घेणार आहोत.

उचकी वर घरगुती उपाय / उचकी लागणे उपाय / उचकी बंद होण्याचे उपाय

उचकी लागल्यास जास्त उतावीळ होण्याची गरज नसते कारण उचकी येणे हा काही फार गंभीर स्वरूपाचा आजार नाही, त्यावर घरगुती उपचार केल्यास त्वरित आराम मिळवता येतो.चला तर मग जाणून घेऊयात उचकी लागल्यास कोणते घरगुती उपचार करावेत:-

थंडगार पाणी – उचकी थांबवण्यासाठी उत्तम उपाय

उचकी वर घरगुती उपाय - उचकी लागणे कारणे - सतत उचकी लागल्यास होणारे परिणाम (uchaki var upay - uchaki lagane karane - satat chya uchakiche dushparinam)
उचकी लागणे उपाय – थंडपाणी प्या

उचकी लागणे उपाय म्हणून सर्वत्र सहसा एक ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उचकी थांबवण्यासाठी हा सर्वात प्राथमिक आणि गुणकारी असा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही उचकी आल्यास थंडगार पाणी प्यावे आणि साधारणपणे एकावेळेस एक ग्लासभरच पाणी प्यावे.याने तुमची उचकी थांबण्यास नक्कीच मदत होईल आणि उचकी लागणण्याच्या या त्रासापासून तुम्हाला त्वरित आराम मिळेन.

श्वसनाचा व्यायाम – उचकी बंद होण्यासाठी गुणकारी घरगुती उपाय

बर्‍याचदा उचकी/गुचकी आल्यावर पाणी पिले तरी देखील उचकी थांबत नाही आणि उचकी सारखी सारखी येत असेल तर एकदा काही सेकंदासाठी श्वास थांबवावा व नंतर एक लांब म्हणजेच दीर्घ श्वास घ्यावा परत तसेच दोन ते तीन वेळा करावे म्हणजे उचकी थांबण्यास मदत होईल आणि तुमचा त्रास कमी होईल. श्वसनाचा हा व्यायाम केल्याने त्याचे इतर ही बरेच फायदे आहेत त्याचा देखील फायदा होईल.

लिंबू – उचकी वर सहज उपलब्ध होणारा घरगुती उपाय

उचकी वर घरगुती उपाय - उचकी लागणे कारणे - सतत उचकी लागल्यास होणारे परिणाम (uchaki var upay - uchaki lagane karane - satat chya uchakiche dushparinam)
लिंबु – उचकी वर गुणकारी उपाय

लिंबू हे आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. आपल्याला लिंबू हे सहज उपलब्ध होणारे फळ आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरात लिंबू हे असतेच तर या लिंबाचा तुम्ही उचकी थांबवण्यासाठी देखील उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्हाला साधारणपणे 1 चमचा लिंबाचा रस व त्यामध्ये एक चमचा मध घ्यावा लागेल आणि हे चांगले मिक्स करावे लागेल, आता हे तयार झालेले मिश्रण एकदा चाटण म्हणून घ्यावे, असे केल्याने तुमची उचकी येणे हळूहळू बंद होईल.

काळी मिरी व खडीसाखर – उचकी वर सर्वोत्तम उपाय

उचकी वर घरगुती उपाय - उचकी (गुचकी) लागणे कारणे - सतत उचकी लागल्यास होणारे परिणाम (uchaki var upay - uchaki lagane karane - satat chya uchakiche dushparinam)
काळी मिरी आणि खडीसाखर – उचकी थांबवण्यासाठी उपयोगी

पाणी पिऊन देखील जर उचकी थांबत नसेल, याउलट सतत उचकी येत असेल तर तुम्ही तीन ते चार काळी मिरी व खडीसाखर तोंडामध्ये धरून चावत राहिल्यास देखील उचकी थांबण्यास मदत होते. खडीसाखर चघल्यास तोंडातील लाळ जास्त प्रमाणात निर्माण होऊन उचकी थांबण्यास मदत होते, त्यामुळे उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय, म्हणून हा सर्वोत्तम उपाय म्हणून ओळखला जातो.

त्वरित उचकी थांबवण्यासाठी कान दाबा

उचकी थांबवण्यासाठी आणखी एक घरगुती उपाय म्हणजे उचकी लागल्यावर कानाच्या खालचा भाग दाबल्याने देखील उचकी थांबते. आपल्या घरातील जुनी प्रौढ / लोक असे करण्याचा सल्ला देतात तुम्हाला जर उचकी लागत असेल आणि ती काय थांबायचे नाव घेत नसेल तर हा घरगुती साधा आणि सोपा उपाय करून बघायला काय हरकत आहे, या उपायाचा देखील बराच फायदा होतो.

मीठ -गुचकी थांबवण्यासाठी उपाय

मीठ - उचकी (गुचकी) लागणे उपाय
मीठ – उचकी लागणे उपाय

तुम्ही जर सततच्या उचकीने हैराण झाला असाल तर मीठाचा उपयोग करावा, कारण मीठ हे उचकी थांबवण्यासाठी गुणकारी ठरते. साधारणपणे एक चमचा मीठ तोंडात ठेवा आणि जर ठेवण्यास अशक्य असेल किंवा ठेवले जात नसेल तर मिठाचे पाणी सुद्धा घेऊ शकता.हा अत्यंत सोपा घरगुती उपाय करून तुम्ही तुमची उचकी येणे घालवू शकता.

साखर / गूळ

अनेकदा काहींची उचकी ही थंड पाणी पिऊन देखील थांबत नाही अशा वेळी आपली आई आपल्याला साखर किंवा गूळ खाण्याचा सल्ला देते,कारण गोड पदार्थ खाल्याने देखील उचकी थांबू शकते. तर मग सततच्या उचकी येण्याने जर तुम्ही हैराण झाले असाल तर एक चमचा साखर किंवा गूळ खावा त्याने अन्ननलिकेवर प्रभाव पडतो व उचकी थांबते.

आंबट पदार्थ

आंबट पदार्थ हे उचकीवर उपाय म्हणून गुणकारी ठरतात, सततच्या उचकीने असह्य होत असेल तर तुम्ही लिंबू अथवा इतर आंबट पदार्थ खाल्याने देखील उचकी थांबते उदाहरणार्थ:- कैरी किंवा टोमॅटोच्या फोडी किंवा चिंच चघळत राहणे, काही केल्या उचकी जर थांबत नसेल तर हा घरगुती उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की फरक दिसेल.

दुधाचे पदार्थ

बटर - उचकी लागणे उपाय
बटर – उचकी लागणे उपाय

उचकी थांबवण्यासाठी उपाय म्हणून तुम्ही पनीर किंवा बटर देखील खाऊ शकता. हे खाल्याने देखील उचकी थांबते कारण हे पदार्थ खाताना तुमच्या दात व जीभ यांचा उपयोग होत असतो व तेव्हा श्‍वसन प्रक्रियेत अडथळा येऊन उचकी थांबते.उचकी थांबत नसेल तर हा उपाय करा याचा तुमची उचकी थांबवण्यास नक्की फायदा होईल.

व्यायाम

उचकी ने परेशान आहात आणि जर कोणी तुम्हाला संगितले की एक व्यायाम आहे तो केल्याने तुमची उचकी थांबेल तर तुम्ही म्हणाल काहीतरीच सांगतोय, परंतु एखाद्या वेळी असे करून तर बघा उचकी थांबवण्यासाठी बसल्याबसल्या तुम्ही एक व्यायाम देखील करू शकता तो म्हणजे एका हाताच्या अंगठ्याने दुसऱ्या हाताच्या अंगठ्याला जोरात दाबणे असे केल्याने देखील उचकी थांबते.

योगा – प्राणायाम

काही व्यक्तींना सतत उचकी चा त्रास होत असेल तर अशांनी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी नियमितपणे श्‍वसनाचे व्यायाम किंवा प्राणायाम करावे लवकरच फरक पडेल.किमान महिनाभर असा दैनंदिन व्यायाम केल्याने सतत उचकी लागणेचा त्रास कमी होतो.

आले (अद्रक) – उचकी वर घरच्या घरी करता येणारा उपाय

आले उचकी (गुचकी) थांबवण्यासाठी गुणकारी
आले उचकी थांबवण्यासाठी गुणकारी

आले म्हणजेच अद्रक हे अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेदा मध्ये आल्याचे महत्व दिलेच आहे,उचकी वर देखील आले गुणकारी ठरते. तुमच्या घरात आले असल्यास त्याचे लहान तुकडे करावेत व ते चघळल्यास देखील उचकी थांबण्यास मदत होते. पाणी पिऊन देखील जर उचकी थांबली नाही तर तुम्ही हा घरगुती उपाय करून बघा नक्की फरक दिसेल.

कापुर

तुमच्या घरात देवाजवळ असलेला कापूर हा देखील असह्य करणारी उचकी थांबवण्यास मदत करतो. हा उचकी वरील घरगुती उपाय जरा कठीण आहे परंतु हा केल्याने तुमची उचकी खात्रीशीर थांबेल. प्रथम तुम्ही तुमच्या देवघरातील कापूर घ्या व तो कोळशावर जाळा आणि त्याचा धुर तुम्हाला सोसेल एवढ्याच प्रमाणात घ्या त्याने देखील तुमची उचकी थांबण्यास मदत होते.

जिरे व मध – उचकी लागणे गुणकारी उपाय

उचकी वर घरगुती उपाय - उचकी लागणे कारणे - सतत उचकी लागल्यास होणारे परिणाम (uchaki var upay - uchaki lagane karane - satat chya uchakiche dushparinam)
मध

आयुर्वेदमध्ये जिरे हे अत्यंत गुणकारी म्हंटले आहेच तर हे जिरे तुमची उचकी थांबवण्यास देखील मदत करते. तुम्ही जिरे बारीक करून त्याची पावडर करा आणि साधारण अर्धा चमचा ही जिरे पावडर घ्या त्यामध्ये एक चमचा मध चांगले एकत्र करा. हे मिश्रण घेतल्याने देखील तुमची उचकी बंद होण्यास मदत होईल.

मोहरीची डाळ

तुमच्या घरात जर मोहरीची डाळ उपलब्ध असेल तर, एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्यावे व त्यात दोन चमचे मोहरीची डाळ टाकावी आता हे मिश्रण गॅसवर उकळण्यास ठेवावे. हे 1 ग्लास चे मिश्रण चांगले अर्धा ग्लास होईपर्यंत उकळून द्यावे. त्यानंतर हे मिश्रण चाळणीने चाळून घ्यावे व खाली राहिलेले पाणी प्यावे, यामुळे उचकी थांबण्यास मदत होते.

उचकी येण्याची कारणे/ उचकी लागण्याची कारणे (uchaki yenyachi karane)

उचकी येण्याची कारणे ही प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळी असू शकतात. पण जर बर्‍याच दिवसांपासून तुम्हाला उचकी चा त्रास जाणवत असेल तर त्याची कारणे खालील प्रमाणे असू शकतात :-

१) सततचा तणाव आणि चिंता या गोष्टी देखील उचकी येण्यास कारणीभूत असू शकतात.

२) तुम्हाला हल्लीच न्युमोनिया झालेला असेल तरी असा त्रास जाणवू शकतो.

उचकी वर घरगुती उपाय - उचकी लागणे कारणे - सतत उचकी लागल्यास होणारे परिणाम (uchaki var upay - uchaki lagane karane - satat chya uchakiche dushparinam)
गरोदरपणा हे देखील सततच्या उचकीचे कारण असू शकते

३) गरोदर असल्याने देखील बहुदा सतत उचकी लागते.

४) अलीकडच्या काळात तुमच्या पोटाची शस्त्रक्रिया झाली असल्यास किंवा तुम्हाला भूल दिलेली असल्यास देखील उचकी लागण्याचा त्रास जाणवू शकतो.

५) कर्करोग (कॅन्सर) हे देखील सततच्या उचकीचे कारण असू शकते.

६) तुम्हाला जर यकृत,डायफ्राम किंवा पोटाची काही समस्या असेल तर ते देखील उचकी येण्याचे कारण असू शकते.

७) उचकी येणाची कारणे मध्ये मज्जासंस्थेच्या इतर समस्यां किंवा मज्जातंतूची विकृती यांचा देखील समावेश होतो,त्यामुळे देखील उचकी लागण्याचा त्रास जाणवू शकतो.

८) सततचे मद्यपान हे देखील उचकी येण्यामागचे कारण असू शकते.

दीर्घकाळ सतत उचकी लागल्याने उद्भवणारे दुष्परिणाम (uchkiche dushparinam)

तुम्हाला जर उचकी लागणे हा त्रास नेहमी होत असेल तर सततच्या उचकी मुळे तुम्हाच्या शरीरावर खालील परिणाम होऊ शकतात :-

१) सततच्या उचकी मुळे तुमचे वजन काही दिवसात कमी होऊ शकते.

सततच्या उचकी (गुचकी) मुळे तुमचे वजन कमी होते
सततच्या उचकी मुळे तुमचे वजन कमी होते

२) दिवसेंदिवस जर हा त्रास अंगावर काढला तर तुम्हाला थकवा जाणवेल, त्यामुळे याच्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.

३) सतत उचकी येत असल्यास तुमची भूक मोड देखील होऊ शकते.

४) निद्रानाश हा देखील सतत येणार्‍या उचकीचा दुष्परिणाम आहे.

५) सारख्या येणार्‍या उचकी मुळे तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते व त्यामुळे तुमच्या शरीरावर विविध दुष्परिणाम होऊ शकतात.

सारांश – उचकी वर घरगुती उपाय,कारणे व परिणाम

उचकी वर घरगुती उपाय आपण या लेखामध्ये बघितले,त्यांची अंमलबजावणी कशी करायची ते देखील आपण समजून घेतले आहे. हे घरच्या घरी करता येणारे उचकी वर उपाय करून उचकी थांबली तर उत्तमच आहे, परंतु तरी देखील जर उचकी थांबत नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

उचकी कशामुळे लागते

उचकी वर घरगुती उपाय - उचकी लागणे कारणे

आपण लहान असताना आपली आजी आजोबा वगैरे जुने लोक सांगायचे की उचकी आली की कोणीतरी व्यक्तीने आपली आठवण केली आहे. परंतु तसे म्हणण्या मागे विनोदा व्यतिरिक्त दुसरे काही नव्हते. कारण उचकी लागण्याचे शास्त्रीय कारण पुढीलप्रमाणे आहे, छाती व पोट यामध्ये एक पडदा असतो, तो पडदा आणि बरगड्या मधील स्नायू यांचे आकुंचन होते व त्याच वेळेस स्वर यंत्रातील स्वरतंतू एकमेकांजवळ येतात या होणाऱ्या कार्याला उचकी येणे असे म्हणतात. उचकी वर घरगुती उपाय केल्याने देखील तुमची उचकी लगेच थांबेल.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

2 thoughts on “उचकी वर हे १५ घरगुती उपाय करा | तुमची उचकी नक्की थांबेल”

  1. यातील एकही उपाय गुणकारी नाही….बहुतेक ayurvedic औषध पुस्तकांमध्ये हे उपाय आहेत . मी आजच प्रत्येक उपाय करून बघितले पण उचकी थांबलीच नाही ….. काहीही उपयोग नाही असल्या उपायांचा ..

Comments are closed.

Scroll to Top