मधुमेह म्हणजे काय / डायबिटीज म्हणजे काय (Madhumeh mhanje kay / What is diabetes in marathi >> मधुमेह म्हणजेच डायबिटीज (Diabetes), हा आजार आता सगळ्यांना माहित असलेला आजार झाला आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या भारत देशामध्ये खूप कमी कुटुंब अशी आहेत जिथे हा आजार दिसत नाही. मधुमेह म्हणलं कि पुर्वी लोकं घाबरून जायचे, आता ही लोक घाबरतातच पण आधीच्यामानाने आता बऱ्यापैकी जागरुकता निर्माण झालेली आहे. तरी ही काही गोष्टी अशा ही आहेत ज्या सामान्य लोकांना माहिती नसतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहे नेमका मधुमेहाचा आजार? काय आहेत मधुमेहाची लक्षणे? आणि त्यावर घरगुती उपचार कोणते आहेत आणि ते कसे करायचे?
Table of Contents
मधुमेह म्हणजे काय ? डायबिटीज म्हणजे काय ? – मधुमेहाची लक्षणे | मधुमेहावर घरगुती उपाय / मधुमेह उपचार मराठी
मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे. रक्तातील साखरेचे प्रमाण जेव्हा नियंत्रणाबाहेर जाते किंवा असंतुलित होते तेव्हा मधुमेह होतो. मधुमेह ही एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामधील साखरेचा स्तर म्हणजेच साखरेचे प्रमाण नियंत्रित राहत नाही आणि त्यामुळेचं मधुमेहाचा त्रास सुरु होतो. आपण जे काही खातो किंवा जेवण जेवतो, त्याचे शरीराला आवश्यक असणार्या ऊर्जेसाठी साखरेत रूपांतर होते.
आपल्या जठराजवळ असलेल्या पेंक्रियाझ या ग्रंथीतून पाझरणार्या इन्सुलिन या हार्मोनमुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशीमध्ये सामावली जाण्याची आणि साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याची प्रक्रिया घडत असते. ज्या व्यक्तींना मधुमेह झालेला असतो किंवा मधुमेहाचा त्रास जाणवतो त्या व्यक्तींमध्ये एकतर इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया थांबलेली किंवा मंदावलेली असते.आणि जर शरीराला जेवढ्या प्रमाणात इंसुलिन हवे आहे तेवढ्या प्रमाणात ते तयार नाही झाले की मग तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढाते. मधुमेहामुळे अंधत्व, हृदयविकार, किंवा मुत्राशयाचे विकार उद्भवण्याची देखील भिती असते.
चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊयात या मधुमेह आजाराची लक्षणे काय आहेत.
मधुमेह म्हणजे काय >> मधुमेहाची लक्षणे
- सातत्याने लघवीची आल्यासारखे जाणवणे.
- नेहमी तहान लागल्यासारखे वाटणे.
- अचानक वजन घटणे.
- सारखी प्रचंड भुक लागणे.
- दृष्टीमध्ये लक्षणीय बदल होणे.
- हात किंवा पाय सतत चमकल्यासारखे होणे.
- बरेचदा थकल्यासारखे होणे
- त्वचा एकदम कोरडी होणे.
- शरीरावर झालेल्या जखमा बर्या होण्यास वेळ लागणे.
वरील मधुमेहाची काही ठळक व महत्वाची लक्षणे आहेत. या लक्षणाबरोबरच मळमळल्यासारखे वाटणे, उलटी होणे किंवा पोटात अचानक दुखल्यासारखे वाटणे अशी ही लक्षणे जाणवण्याची शक्यता असते.
मधुमेहावर घरगुती उपाय / मधुमेह उपचार मराठी
आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये सारखे बदल होत असतात. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या वेळा आपल्याकडून साहजिकचं पाळल्या जातं नाहीत त्यामुळे मधुमेह होऊ शकतो.मधुमेहची लक्षणे आपण वर बघितली आहेतच परंतु या मधुमेहा ला रोखण्यासाठी घरगुती उपाय कोणते ते आपण आता जाणून घेऊयात. चला तर मग जाणून घेऊयात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय करून मधुमेहवर कसे नियंत्रण मिळवता येते.
आवळा रस व हळद
आवळा आणि हळद हे मानवी शरीरासाठी गुणकारी आहेत. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा रस आणि हळद यांचा उपयोग होतो. यासाठी १० मिलिलीटर आवळ्याचा रस किंवा ज्युस आणि दोन ग्रॅम हळद एकत्रित करून घ्यावे आणि हे केलेलं मिश्रण दिवसातुन दोन वेळा तरी घ्यावे. त्यामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.अनेक मधुमेह असलेले रुग्ण हा घरगुती उपाय करतात आणि त्यांची साखर नियंत्रणात येते.
टोमॅटो, काकडी आणि कारले
एक टोमॅटो, एक काकडी आणि एक कारलं जो ज्यूस बनवला जातो, तो मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास बरीच मदत करतो त्यासाठी काकडी, कारले, टोमॅटो घेवुन याचं ज्युस बनवुन घ्या, हे तीन ही ज्यूस एकत्र करून प्यावेत. मात्र हे बनवलेलं मिश्रण / ज्युस रोज सकाळी रिकाम्या म्हणजेच अनुषा पोटी पिलं पाहिजे, यामुळे मधुमेहाचा त्रास कमी होतो आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हा उपाय गुणकारी ठरतो.
बडीशेप
रोज जेवण झाल्यानंतर बडीशोप खायची सवय अनेक जणांना असते, तशी ही एक चांगली सवय आहे यामुळे खाल्लेले अन्न पचन होते आणि मधुमेह असेल तर साखर वाढण्यास देखील आळा बसतो. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने रोज बडीशोप खायला हवी या सवयीमुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास फार फायदा होतो.त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी जेवणानंतर बडीशेप खाल्ली पाहिजे याने देखील मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
जांभूळ
ज्या व्यक्तींना मधुमेह झालेला आहे, त्या व्यक्तींना गोड पदार्थ खाण्यापासून अडवलं जातं. त्यामुळे अनेकांना इच्छा असुन ही फळांचा आस्वाद घेता येत नाही. परंतु मधुमेह असणार्या व्यक्तींने जांभुळ हे फळ खावं. जांभूळ खाल्याने शरीरात शुगर वाढल्याचे प्रमाण हे बर्याच प्रमाणात कमी होते मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी जांभूळ हे गुणकारी ठरते, त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी होतं आणि मधुमेह कमी होतो.
भेंडी
खुप लोकांना भेंडीची भाजी आवडत नाही, पण भेंडीची भाजी खाल्ल्याने किंवा भेंडी रात्री पाण्यात भिजतं ठेवुन सकाळी उठल्यावर ते भिजवलेलं पाणी प्यायल्याने ही मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.मधुमेह वर भेंडी ही अत्यंत गुणकारी मानली जाते, त्यामुळे मधुमेह झालेल्या व्यक्तींना भेंडी खाण्याचा सल्ला दिला जातो.
दालचीनी व लवंग
दालचीनी आणि लवंग चे महत्व आयुर्वेदामध्ये संगितले आहेच, त्याप्रमाणेच दालचीनी व लवंग ही मानवी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. डायबिटीज झालेल्या रुग्णांसाठी देखील दालचीनी व लवंग गुणकारी ठरते. दालचिनीचे छोटे तुकडे करून घ्या आणि त्या बरोबर एक ते दोन लवंग घ्या हे दोन्हीही पाण्यात उकळून घ्यावे. पंधरा मिनिटांनी ते पाणी थोडे कोमट झाल्यावर प्यावे. दिवसातुन दोनवेळा जरी हे पाणी पिलं तरी ही चालेलं.हा घरगुती उपाय केल्याने तुमची शुगर नियंत्रणात राहील.
योगा व पथ्य
मधुमेह हा आजार झालेल्या व्यक्तीने पथ्यं पाळणे, योगा करणे, दररोज फिरायला जणे व शुद्ध हवा घेणे, गवतावर उघड्या पायाने चालणे हे सर्व उपाय आणि खाण्या-पिण्याचे पथ्य पाळणे म्हणजे जेवणात नेहमी गोड पदार्थ खाणे, शरीरातील साखर वाढणारे पदार्थ खाणे आणि अतिरिक्त चरबी , वजन वाढू देणे यासारख्या गोष्टी करणे बंद करणे हे फार गरजेचं असतं. हया सर्व बाबींचा विचार केल्याने त्यामुळे देखील मधुमेह नियंत्रणात राहतो.
सारांश – मधुमेह म्हणजे काय ? मधुमेह लक्षणे व मधुमेह वर घरगुती उपाय
मधुमेह म्हणजे काय ? हे आपण वरील लेखामध्ये विस्तृत स्वरुपात बघितले आहेच, तसेच त्याची काय काय लक्षणे आहेत हे देखील आपण पहिले. त्याचबरोबर मधुमेह झालेल्या व्यक्तींची शुगर नियंत्रणात राहण्यासाठी काय काय घरगुती उपाय करता येऊ शकतात ते देखील आपण पहिले, हे उपाय आपण घरगुती करून बघू शकता परंतु तुमची शुगर जर खूप जास्त प्रमाणात वाढत अथवा कमी होत असेन आणि अजिबात नियंत्रणात येत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
डायबिटीज म्हणजे काय?
डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे. रक्तातील साखरेचे प्रमाण जेव्हा नियंत्रणाबाहेर जाते किंवा असंतुलित होते तेव्हा मधुमेह / डायबिटीज होतो. डायबिटीज ही एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामधील साखरेचा स्तर म्हणजेच साखरेचे प्रमाण नियंत्रित राहत नाही आणि त्यामुळेचं डायबिटीजचा त्रास सुरु होतो.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले मधुमेह म्हणजे काय व मधुमेह वर घरगुती उपाय ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)