चकली कशी बनवायची / चकली चे प्रकार (chakli kashi banvaychi / chakli recipe in marathi) >> चकली हा बर्याच जणांचा आवडीचा पदार्थ आहे. दिवाळी मध्ये चकली आवडीने खाल्ली जाते आणि घरातील महिला देखील आवडीने आपआपल्या परीने विविध प्रकारच्या चकली बनवत असतात. तसेच बर्याच घरगुती काम करून उदरनिर्वाह करणार्या महिला किंवा महिलांचे बचत गत देखील विविध प्रकारच्या चकली बनवतात व त्यांचे पॅकेट तयार करून त्याची विक्री करतात.
चकली आपण खुप विविध पध्दतीने बनवली जाते. या लेखामध्ये आपण अशाच विविध प्रकारची चकली कशी बनवायची / चकली कशी बनवतात ते बघणार आहोत. यातील माहिती म्हणजेच साहित्य आणि कृती वापरुन तुम्ही घरच्या घरी अगदी कुरकुरीत आणि खूशखुशीत अशी चकली बनवू शकतात.
Table of Contents
चकली कशी बनवायची / चकली कशी बनवतात / चकली चे प्रकार (chakli kashi banvaychi / chakli recipe in marathi / types of chakli)
आपल्याला माहीतच आहे, चकली ही बनवण्याचे प्रकार आणि साहित्य हे वेगवेगळे आहे, जसे की, भाजणीच्या पीठाची चकली, तांदुळच्या पीठाची चकली, ज्वारीचे पीठ उकडून बनवलेली चकली, तर या लेखामध्ये आपण चार विविध प्रकारची चकली कशी बनवतात ते बघणार आहोत.चला तर मग जाणून घेऊयात चकली कशी बनवायची आणि काय साहित्य व कृती करायची;
तांदळाची चकली कशी बनवायची (tandalachi chakli kashi banvaychi)
तांदुळा पासून चकली बनवण्यासाठी लागणारी सामग्री
- तांदळाचे पीठ जवळपास दोन वाटी
- चनाडाळ पीठ अर्धी वाटी
- स्वादानुसार मीठ व जीरे पावडर
- मिरची पावडर आणि हळद
- मोहन साठी आणि तळणासाठी तेल
तांदळाची चकली बनवण्याची कृती
वरील सर्व साहित्य घेऊन यापासून रुचकर अशी चकली बनवण्याची कृती खालील प्रमाणे -एका मोठया ताटात किंवा पराती मध्ये तांदळाचे व चनाडाळीचे पीठ मिक्स करून त्यामध्ये पाणी, मीठ, जिरे, मिरची पावडर आणि हळद टाकून घ्यावी आणि मोहन म्हणून अर्धी वाटीला थोडे कमी तेल टाकावे . त्या नंतर चांगले पीठ मळून घ्यावे आणि एका चांगल्या सुती कपडयाला पीठ गुंडाळून ठेवा. नंतर चकली काढण्याच्या मशीनला आतल्या बाजूने तेल लावा व त्यात पीठाचे गोळे टाका.
त्यानंतर गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर मशीनीने चकली गोल अशी काढून तेलात सोडा. मंद आचे वर चकली चांगली लाल आणि खरफुस अशी तळून घ्या. अशाप्रकारे आपली खुशखुशीत चकली तयार होईल. आपण आधी एका पेपर वर किंवा सूती कपडावर सगळ्या चकल्या आधीच करून घ्याव्या आणि नंतर हळुवार उचलून तळाव्या.
टिप्स
- गॅसवर तेल गरम झाल्यानंतर कमी गॅस करून त्यात मशीनने चकली सोडाव्यात.
- खुसखुशीत चकली बनवण्यासाठी आधी मोठ्या आणि नंतर कमी आचेवरच चकली तळून घ्या म्हणजे चांगली तळल्या जाईल आणि कुरकुरीत देखील होईल.
गव्हाच्या पिठाची चकली कशी बनवतात (gavhachya pithachi chakli kashi banvaychi)
गव्हाच्या पिठाची चकली बनविण्यासाठी लागणारी साधन सामग्री
- गव्हाचे पीठ
- उडदाचे पीठ
- स्वादानुसार मीठ व तिळ
- पाणी व तेल
- मिरची पावडर व हळद
- ओवा
गव्हाच्या पिठाची चकली बनविण्याची कृती
एका मोठया ताटात किंवा पराती मध्ये गव्हाचे व उडदाचे पीठ एकत्र करून घ्यावे. त्यात मीठ, तिळ, मिरची पावडर, हळद आणि आवडत असल्यास ओवा देखील टाकावा. व पाणी एकत्र करून पीठ मळून घ्यावे व पीठाचा गोळा करा. पीठ मळताना ते पीठ जास्त चिकट नसावे म्हणजेच पाणी व्यवस्थित टाकून पीठ मळा. नंतर पीठ एका चांगल्या सुती कपडयात गुडांळून ठेवा.
चकलीच्या मशीन मध्ये पिठाचा गोळा टाका व गॅसवर गरम केलेल्या तेलात हळूवार चकली सोडा. चांगली खरपूस तळून चकली तेलामधून काढून घ्या, अशाप्रकारे तुमची गव्हाच्या पिठाची चकली तयार होईल ही चकली भाजणीच्या पीठा पेक्षा करण्यास सोपी असते, आणि खाण्यास देखील चविष्ट लागते.
टिप्स
- तेलात चकली सोडताना जर गोल चकली येत नसेल तर पहिल्यांदा चकली पेपरवर काढा आणि मग ती हाताने हळुवार गरम तेलात सोडावी.
- चकली बनवताना आपण त्यामध्ये कोथंबीर सुध्दा टाकू शकता परंतु जास्त वेळ झाल्यानंतर चकली मऊ पडू शकते.
रव्याच्या पिठापासून चकली कशी बनवायची (ravyachya pithachi chakli kashi banvaychi)
रव्याच्या पिठाची चकली बनविण्यासाठी लागणारी साधन सामग्री
- रवा एक ग्लास
- तुप अर्धी वाटी
- स्वादानुसार मीठ व जीरे
- मिरची /मिरची पावडर
- तेल तळणासाठी
- पाणी पीठ मळण्यासाठी
रव्याच्या पिठाची चकली बनविण्याची कृती
एका कढईत पाणी गरम करून त्यात तुप टाका. नंतर उकळल्या नंतर त्यामध्ये रवा टाका व चांगले मिश्रण करून घ्या. त्यानंतर तयार झालेला रवा एका ताटात काढून त्यामध्ये मीठ, जीरे, हळद व बारीक चिरलेली मिरची हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता गॅसवर तेल गरम करायला ठेवा. नंतर रव्याचे जे मिश्रण बनवले आहे त्याचा गोळा करून चकलीच्या मशीन मध्ये टाकून त्याच्या सहाहयाने गरम झालेल्या तेलात चकली सोडा. चकली चांगली लालसर व खुसखूशीत तळून घ्या. आशारीतीने रव्याच्या पिठापासून चकली बनवावी. ही चकली चवीला देखील खूप छान लागते आणि जरा वेगळे काही तरी बनवल्याचा आनंद काही औरच असतो.
टिप्स
- चकलीच्या मशीन ला आतून नेहमी तेल लावा. जेणेकरून चकलीचे पिठ मशीनला आतून चिटकत नाही.
- रव्याच्या पिठाची चकली बनवताना रवा भाजून न घेता तसाच पाण्यात टाकावा.
साबुदाणा चकली कशी बनवायची (sabudana chakli kashi banvaychi)
साबुदाणा चकली बनवण्यासाठी लागणारी साधन सामग्री
- साबुदाणा
- बटाटे
- मीठ स्वादानुसार
- बारीक चिरलेल्या मिरच्या
- तेल
साबुदाणा चकली बनविण्याची कृती
सर्वात पहिल्यांदा साबुदाणा चांगला पाण्यात भिजवुन घ्या. व त्यानंतर बटाटे उकडून घ्या. बटाटे उकडल्यानंतर ते गार होऊद्या आणि गार झाल्यानंतर बटाटे खिसून घ्या. भिजलेला साबूदाणा व किसलेला बटाटा चांगला मिक्स करून घ्या. आता त्या मिश्रणात मिठ व बारीक चिरलेल्या मिरच्या टाका. परत एकदा हे सर्व चांगले मिक्स करून ते मळून घ्या. आता मळलेल्या त्या मिश्रणाचा गोळा करून तो चकली मशीन मध्ये घालून त्यापासून गोलाकार चकली पेपरवर काढून घ्या. आणि त्या काढलेल्या चकल्या चांगल्या वाळून ध्या नंतर गॅसवर गरम तेल करून कमी आचेवर चकली तळून घ्या.
तुम्ही ही साबुदाणा चकली चांगली वाळवून तशीच साठवून ठेवा आणि उपवासाच्या दिवशी तळून खा. चांगली वाळवलेली साबुदाणा चकली बरेच दिवस चांगली राहते त्यामुळे अनेक महिला या प्रकारची चकली उन्हाळ्यात कुरडया,पापड्या व सांडगे बनवताना बनवून साठवून ठेवतात आणि वर्षभर वापरतात. साबुदाणा चकली बनवून ठेवली तर तुमच्या उपवासाच्या दिवशी तुम्हाला छान रुचकर चकली खाता येईल.
टिप्स
- तुम्ही साबुदाणा चकली करताना मिरच्यां ऐवजी मिरची पावडर म्हणजेच लाल तिखट देखील वापरू शकता.
- ही साबुदाणा चकली बनवताना साबुदाणा चांगला भिजलेला असेन तर चकली अधिक चांगली बनते त्यामुळे साबुदाणा एक पूर्ण रात्र चांगला भिजवून घ्या.
सारांश – चकली कशी बनवायची / चकली कशी बनवतात (chakli recipe in marathi)
वरील लेखामध्ये आपण चार विविध प्रकारच्या चकली कशी बनवायची ते पाहिले यातील तुम्हाला जी चकली बनवायची आहे ती तुम्ही बनवू शकता आणि यांखेरीस देखील अजून वेगळ्या प्रकारच्या चकली देखील बनवल्या जातात त्या देखील बनवू शकता.उपवासासाठी तुम्ही खास साबुदाणा चकली देखील बनवू शकता.
आपल्याला ही चकली बनवायची घरगुती रेसिपी विषयी माहिती कशी वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)