कोथिंबीर लागवड विषयी संपुर्ण माहिती – Complete Information

कोथिंबीर लागवड/ कोथिंबीर लागवड कोणत्या महिन्यात करावी/ कोथिंबीर फवारणी औषध/kothimbir lagwad>>>आपल्याला माहितच आहे की, कोथिंबीर ही वर्षभर लागणारी पालेभाजी आहे. सकाळी नाश्त्याचा पदार्थ तयार करायचा असो किंवा दुपारी जेवण बनवायचे असो, चॅट पदार्थ असो किंवा आजारी व्यक्तिला एखादा पदार्थ बनवायचा असो कोथिंबीरचा वापर केल्याशिवाय हे पदार्थ बनतच नाही यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की, कोथिंबीर ला किती मागणी असते आणि घरोघरी वापरली जाते.

कोथिंबीर लागवड करून त्यातून उत्पन्न काढून तुम्ही बराच नफा मिळवू शकता. त्यामुळे कोथिंबीर लागवड याविषयी संपूर्ण आणि परिपूर्ण आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी हा ‘कोंथिंबीर लागवड/ कोथिंबीर लागवड कोणत्या महिण्यात करावी’ हा लेख या सदरात सादर करित आहोत. कोथिंबीर लागवड हा शेतीशी निगडीत व्यवसाय असला तरी देखील आपण तो ग्रामीण भागातील व्यवसाय म्हणून तसेच शहरी भागात देखील करू शकतो.

कोथिंबीर लागवड/ कोथिंबीर लागवड कोणत्या महिन्यात करावी/ कोथिंबीर फवारणी औषध/kothimbir lagwad

कोथिंबीरला वर्षानुवर्षे मागणी असते. त्यामुळे व्यवस्थित नियोजन करून कोथिंबीरीची लागवड करून हमखास असा आपल्याला नफा मिळवता येतो. कोथिंबीरचा वापर हा हॉटेल्स मध्ये, घरात रोजच्या स्वयंपाक साठी, लग्न समारंभात आणि प्रत्येक भाजी, नवीन पदार्थ मध्ये आवर्जून केला जातो. त्यामुळे कोथिंबीर ही महिणोंमहिने लागणारी अशी आहे, कोथिंबीरीची मागणी ही कधी ही कमी होत नाही. त्यामुळे हा लेख वाचून तुम्ही कोथिंबीर लागवड करावी. यासाठी तुम्हाला हा लेख नक्कीच उपयोगी पडेल. चला तर मग पाहूया माहिती कोथिंबीर लागवड या विषयी….

कोथिंबीरीची लागवड कोणत्या महिन्यात करावी आणि लागवडीसाठी उपयुक्त जमीन कशी असावी

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा व्यवसाय तर करायचाच पण ही कोथिंबीरीची लागवड नेमकी कोणत्या महिन्यात करायची, कशी करायची जेणे करून यातून उत्पन्न मिळेल आणि नुकसान होणार नाही. वनस्पति शास्त्रानुसार कोथिंबीर लागवडीसाठी प्रामुख्याने हिवाळी म्हणजेच (रब्बी ) आणि पावसाळी (खरीप ) हंगाम हा योग्य आणि कोथिंबीर वाढीसाठी पूरक असा समजला जातो. त्यामुळे या हंगामात, या महिन्यात कोथिंबीर लागवड करावी.

उन्हाळयात कोथिंबीरचे उत्पन्न हे कमी प्रमाणात निघत असेल तरी देखील या महिन्यात कोथिंबीरला मागणी ही प्रचंड असते. उन्हाळ्यात उत्पादन कमी निघत असल्याने आणि जास्त मागणी मुळे या पिकातून बराच फायदा होतो आणि चांगला नफा प्राप्त होतो. त्यामुळे बरेच शेतकरी उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करतात. आता आपण जाणून घेऊया कोथिंबीरीची लागवड करण्यासाठी हवामान, जमीन कशी असावी

कोथिंबीर लागवडसाठी हवामान

कोथिंबीर लागवड/ कोथिंबीर लागवड कोणत्या महिन्यात करावी/ कोथिंबीर फवारणी औषध/kothimbir lagwad
कोथिंबीरीची लागवड कोणत्या महिन्यात करावी

आपण कोथिंबीरची लागवड ही कोणत्याही हवामानात करू शकतो. परंतु योग्य आणि अतिशय चांगले उत्पादन काढायचे असेल तर, अगदी पावसाळ्यात किंवा एकदम उन्हाळ्यात कोथिंबीरीची लागवड करू नये. जर अति ऊन किंवा अति पाऊस असेल तर कोथिंबीरची वाढ ही हवी तशी होत नाही, त्यामुळे हा अतिवृष्टी आणि कडक ऊण हा धोका पत्कारुन तुम्ही नियोजन करून कोथिंबीरीची लागवड करू शकता. उन्हाळ्यात कोथिंबीरला जास्त पाणी लागते त्याचे नियोजन करावे तसेच शेड नेट देखील करू शकता तसेच उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता होईल याची काळजी घ्यावी.

जमीन कशी असावी

कोथिंबीर लागवड/ कोथिंबीर लागवड कोणत्या महिन्यात करावी/ कोथिंबीर फवारणी औषध/kothimbir lagwad
लागवडीसाठी उपयुक्त जमीन

कोथिंबीरच्या लागवडी साठी मध्यम खोलीची जमीन ही योग्य असते. मध्यम आणि कसदार असलेल्या जमिनीत कोथिंबीर चे भरघोस आणि जोरदार पीक येते आणि नफा होतो. सेंद्रिय खते जमिनीत असतील तर हलक्या किंवा कमी कसदार जमिनीमध्ये देखील कोथिंबीर चे चांगले उत्पन्न मिळू शकते. साधारण आकारमानाप्रमाणे पावसाळ्या मध्ये आणि हिवाळ्यामध्ये एकरी 5 ते 6 टन उत्पन्न मिळते व उन्हाळी हंगाममध्ये 3 ते 4 टन उत्पन्न मिळते. कोणत्याही महिण्यात कोथिंबीर पेरली तरी त्याला योग्य आणि नियमित पाणी देणे हे अतिशय महत्वाचे आहे.  

कोथिंबीर लागवड(kothimbir lagwad) कशी करावी – माहिती

कोथिंबीरची लागवड करण्यासाठी जमीन नांगरून आणि कूळवून चांगली भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीत एकरी 6 ते 8 टन चांगले कुजलेले शेणखत घालावे, हे शेणखत सेंद्रिय खत म्हणून चांगले काम करते. त्यानंतर जमिनीवर जवळपास 3×2 मीटर आकाराचे सपाट असे वाफे तयार करावेत. आता या तयार वाफ्यात आपण 2 प्रकारे कोथिंबीर लागवड करू शकतो एक म्हणजे बी फेकून कोथिंबीरीची लागवड आणि दुसरी म्हणजे बी रोवून कोथिंबीर लागवड. या दोन पैकी कोणतीही आपल्याला सोईस्कर वाटेल त्या पद्धतीने आपण लागवड करू शकतो

बी फेकून लागवड करणे

कोथिंबीर लागवड/ कोथिंबीर लागवड कोणत्या महिन्यात करावी/ कोथिंबीर फवारणी औषध/kothimbir lagwad
बी फेकून लागवड

बी फेकून लागवड करत असताना बी एक सारखे पडेल याची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात जर लागवड करायची असेल तरी पेरणी म्हणजेच लागवड करण्याआधीच वाफे भिजवून घ्यावे आणि मग बी फेकून कोथिंबीरीची लागवड करावी.

वाफे तयार करून बी रोवणे

कोथिंबीर लागवड/ कोथिंबीर लागवड कोणत्या महिन्यात करावी/ कोथिंबीर फवारणी औषध/kothimbir lagwad
ओळी पाडून कोथिंबीर लागवड

आपल्याला जर बी फेकून लागवड करायची नसेल तर आपण वाफ्यामध्ये 15 सेमी अंतरावर खुरप्याने ओळी पाडून घ्याव्या आणि त्यात देखील बी पेरु शकता परंतु त्या आधी उन्हाळ्यात कोथिंबीरीची लागवड करायची असेल तर पेरणी करण्याआधीच वाफे भिजवावे आणि वाफसा झाल्यानंतर त्यात बी टाकून म्हणजेच रोवून पेरणी करावी.

कोथिंबीरीची लागवड करण्यासाठी एकरी 25 ते 35 किलो बियाणे लागते. लागवडी आधी बियाणे म्हणजेच धणे आधी थोडे रगडून घ्यावे तसेच धण्याचे बी भिजवून मग गोणपाटात गुंडाळून ठेवावे. त्या कारणाने उगवण 8 ते 10 दिवसात होते व कोथिंबीर च्या उत्पादनात देखील वाढ होते. कोथिंबीर बी फोडून टाकल्याने त्याला लवकर मोड फुटतात आणि लवकर येते व त्याची काढणी देखील लवकर होते.

कोथिंबीर लागवड/ कोथिंबीर लागवड कोणत्या महिन्यात करावी/ कोथिंबीर फवारणी औषध/kothimbir lagwad
धने

कोथिंबीर लागवड केल्यानंतर देखील त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कोथिंबीर च्या वाफ्यात जर तण झाले तर, आपल्याला भरपूर नुकसानाला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे पाणी आणि खाते व्यवस्थापण करणे हे देखील चांगल्या पद्धतीने वाढ होण्यास मदत करते. कोथिंबीरीची लागवड कुठल्याही हवामानात करता येते परंतु, पाण्याचा स्त्रोत चांगला असेल तर उन्हाळ्यात कोथिंबीरीची लागवड भरघोस उत्पन्न देऊन जाते आणि यातून चांगलाच नफा मिळतो.

कोंथिंबीरीच्या योग्य जातीची निवड देखील महत्वाची आहे. शक्यतो स्थानिक आणि सुधारित जात निवडावी. व्ही 1, व्ही2 तसेच डी 91, को 1, लाम सी एस, जळगाव धना , वाई धना या जाती कोंथिंबीर लागवडी साठी प्रसिद्ध आहेत.

कोथिंबीर फवारणी औषध आणि खत व्यवस्थापन

आता आपण पाहूया कोथिंबीरच्या फवारणी आणि खत व्यवस्थापन कसे करावे त्यासाठी कोणते खत वापरावे, कसे वापरावे या विषयी सविस्तर पुढील माहिती काय सांगते ते चला सुरुवात करूया

कोथिंबीर लागवड/ कोथिंबीर लागवड कोणत्या महिन्यात करावी/ कोथिंबीर फवारणी औषध/kothimbir lagwad
कोथिंबीर फवारणी औषध

कोथिंबीरीची लागवड ज्या जमिनीमध्ये करावयाची आहे त्या जमिनीमध्ये लागवडी आधी 5ते7 टन चांगले कुजलेले शेणखत हे व्यवस्थित टाकून घ्यावे. कोथिंबीर उगवल्यानंतर साधारणतः 35 ते 40 किलो नत्र खताची मात्रा घेतल्यानंतर तिच्यासोबत 25 दिवसांनंतर 100 लीटर पाण्यात 800 ग्राम युरिया मिसळून त्याने दोन फवारण्या करून घ्याव्यात. हे केल्याने कोथिंबीरीची वाढ योग्यरीत्या होऊन कोथिंबीरीचे उत्तम पीक येते आणि त्यावर रोग पडण्याची शक्यता देखील राहत नाही. कोथिंबीरीचे कोवळे पीक असल्याने उन्हाळ्यामध्ये 7 ते 9 वेळेस टप्प्या-टप्प्याने पाणी देत राहावे त्यामुळे अजून जोमाने पीक वाढू लागते.

कोथिंबीर लागवड/ कोथिंबीर लागवड कोणत्या महिन्यात करावी/ कोथिंबीर फवारणी औषध/kothimbir lagwad
कोथिंबीर कीड आणि रोग नियंत्रण

योग्य प्रमाणात फवारणी औषध आणि कीटकनाशक फवारल्यास कोथिंबीर पिकावर रोग आणि कीड जास्त प्रमाणात दिसून येत नाही. तरी देखील काही वेळेस मर किंवा भुरी हा रोग पडू शकतो त्यासाठी या रोगाच्या नियंत्रणास योग्य औषध फवारणी करून त्यास रोखू शकतो. लाम C S -6 सारख्या तसेच भुरी प्रतिबंधक जातीच्या औषधाची फवारणी करावी तसेच पाण्यात विरघळणार्‍या गंधक चा वापर आवश्यक आहे. अशा प्रकारे कोथिंबीर फवारणी औषध रोगाच्या नियंत्रणासाठी वापरावे.

या लेखात आम्ही कोथिंबीरीची लागवड विषयी विस्तृत माहिती तुमच्या पर्यंत पोहचवली आहे, त्याचा योग्य वापर आणि उपयोग करून तुम्ही तुमच्या उत्पन्नात आणि नफ्यात फायदा करून घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला शेती करणे आवडत असेल आणि तुम्हाला योग्य पीक आणि पीक व्यवस्थापन कसे करावे याविषयी माहिती हवी असेल तर हा लेख तुम्हाला मोलाची मदत करणारा ठरू शकतो.

कोथिंबीर काढणी कशी करावी

कोथिंबीर लागवड/ कोथिंबीर लागवड कोणत्या महिन्यात करावी/ कोथिंबीर फवारणी औषध/kothimbir lagwad
कोथिंबीर काढणी

आता सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे काढणी. तर कोथिंबीर काढणी ही पेरणी नंतर 30 ते 35 दिवसात करावी लागते. यावेळी कोथिंबीर जवळपास 15 ते 20 सेमी उंचीची होते. कोथिंबीर काढणी सुद्धा पेरणी प्रमाणेच दोन पद्धतीने करता येते. एक म्हणजे उपटून काढणे आणि दुसरी म्हणजे कापून काढणे. कोथिंबीरच्या दोन महिन्यांनंतर त्याला फुले यायला सुरुवात होते त्यामुळे फुले येण्याआधीच काढणी करावी.

सारांश – कोथिंबीर लागवड/ कोथिंबीर लागवड कोणत्या महिन्यात करावी/ कोथिंबीर फवारणी औषध/ kothimbir lagwad

तुम्ही जर शेती करत असाल आणि एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल परंतु जर त्यात यश येईल की नाही, पिकाला योग्य बाजारभाव मिळेल की नाही उत्पादन आणि उत्पन्न मिळेल की नाही या विचारात असाल तर चिंता करत बसू नका आणि कोथिंबीरीच्या लागवडीच्या तयारीला लागा. या लेखातील माहिती आणि नियोजन याचा वापर करून तुम्ही नक्कीच चांगला नफा मिळवू शकता.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले “कोथिंबीर लागवड / कोथिंबीर कोणत्या महिन्यात करावी/ कोथिंबीर फवारणी औषध/ kothimbir lagwad “ही घरगुती माहिती ” हे कसे वाटले, ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top