कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय – Top 10 Best Home Remedies

कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय/कोंडा जाण्यासाठी उपाय/ केसात कोंडा होण्याची कारणे / konda janyasathi gharguti upay >>> कोंडा म्हणजेच dandruff हा झाल्यास सर्व मुलींना आणि महिलाना अतिशय परेशान आणि त्रासदायक वाटत असतो. कोंडा हा सर्वात मोठे कारण बनतो ते केस गळतीचे, त्यामुळे कोंडा होण्यापासून सर्वच जन आपल्या केसांना वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि चुकून जर कोंडा झालाच तर तो जाण्यासाठी किंवा घालवण्यासाठी काय करावे आणि कोणते घरगुती उपाय करावेत, जेणे करून डोक्यातील कोंडा जाईल या प्रश्नाने ग्रस्त असतात.

प्रत्येकाला आपल्या आपले केस सुंदर, मऊ, चमकदार, आणि काळे व निरोगी असावेत असे वाटते. केसांचे आरोग्य खराब होण्याचे मुख्य कारण केसात कोंडा होणे या समस्येला बरेच लोक कंटाळले आहेत. बर्‍याच महिलांना आणि मुलींना कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत याच्या शोधात असतात आणि त्यांच्या साठी आमचा आजचा हा “ कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय” लेख घेऊन येत आहोत यातील माहिती आणि घरगुती उपाय, केसातील कोंडा घालवण्यासाठी आणि केस कोंडा मुक्त करण्यास उपयोगी येतील.

केसात कोंडा झाल्यास केसाचा पोत आणि पत दोन्ही कमी होते. बरेच लोक कोंडा झाल्यास त्यावर घरगुती उपाय करण्याएवजी केमिकल्स युक्त प्रॉडक्ट वापरतात, त्यामुळे आपल्या केसांच्या समस्या या कमी होण्याएवजी उलट अधिक वाढतात. प्रदूषण, धूळ, केसांची अस्वच्छता, केसातील गुंता न काढणे, केसांच्या मुळाशी तेल न लावणे किंवा कधी अधिक तेल लावणे, आहारात योग्य त्या पालेभाज्या याचा समावेश न करणे, मानसिक ताण-तणाव घेणे यासारखी बरीच काही कारणे आहेत केसात कोंडा होण्याचे, त्याविषयी विस्तृत माहिती ही आपण पुढे पाहणारच आहोत.

तर आता सर्वप्रथम आपण पाहूया की, कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत, ते पाहूया. हे सर्व उपाय केल्याने तुमचा कोंड्याचा त्रास नक्कीच कमी होईल.

कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय

कोंडा झाल्यास तो कमी करण्यासाठी किवण जाण्यासाठी केमिकल्स युक्त साधने वापरल्यास त्याचा केसांवर नक्कीच विपरीत परिणाम होत असतो, त्यामुळे असे मार्ग वापरण्याएवजी आम्ही खाली सांगत असलेले घरूगुती उपाय करावेत. हे उपाय खालील प्रमाणे

लिंबाच्या झाडाची पाणे

लिंबाच्या झाडाचे पाणे तोडून त्यांना मिक्सर मधून दळून घ्यावे. वापरताना त्यात एक लिंबू हे पिळून घ्यावे आणि त्याच बरोबर त्यात एक व्हीटॅमिन c ची कॅप्सूल देखील टाकावी. आता यात चार चमचे नारळाचे तेल टाकावे व सर्व मिक्स करावे हे सर्व मिश्रण सूर्यप्रकाशात ठेवावे. त्यावर सूती कापड बांधून ठेवावे. चार तास झाल्यानंतर हे मिश्रण केसांवर नीट लावावे व एक तासानंतर केस धुवून घ्यावे. हा उपाय केल्याने केसातील कोंडा, खाज येणे, केस गळती संसर्ग म्हणजे infection, होत नाहीत. तसेच याचा कोणताही दुष्परिणाम म्हणजे साइड इफेक्ट देखील होणार नाही. लिंबाचा पाला हा आयुर्वेदिक वनस्पती मध्ये येत असल्याने केस निरोगी राहतात.

कडीपत्याची पाणे

कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय/कोंडा जाण्यासाठी उपाय/ केसात कोंडा होण्याची कारणे / konda janyasathi gharguti upay
कडीपत्ता पाने

कडीपत्त्याची पाणे ही देखील केसातील कोंडा काढण्यासाठी फायदा होतो. कडीपत्याची पाणे वाटीभर खोबरेल तेलात रात्रभर भिजत ठेवावी. त्यामुळे कडीपात्याची सर्व आयुर्वेदिक गुणधर्म हे तेलात उतरतात. नंतर ते पाणे काढून घ्यावी व तेलामध्ये दोन चमचे लिंबूचा रस टाकावा हे तेल रात्रभर लावून ठेवावे आणि सकाळी आयुर्वेदिक शाम्पु ने केस धुवावे, असं चार वेळेस केस धुवावे. या साहित्याने चार वेळेस केस धुतले तर 100% कोंडा हा दूर होतो.

आयुर्वेदिक श्याम्पू

आयुर्वेदिक श्याम्पू वापरुन आपण कोंडा कमी करू शकतो. तर असा आयुर्वेदिक श्याम्पू आपण घरच्या घरी बनवून कोंडा आणि केस गळती पासून आराम मिळवू शकता. चला तर पाहूया आता की, आयुर्वेदिक श्याम्पू कसा बनवायचा.

कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय/कोंडा जाण्यासाठी उपाय/ केसात कोंडा होण्याची कारणे / konda janyasathi gharguti upay
आयुर्वेदिक शाम्पू

आयुर्वेदिक श्याम्पू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे:

  • शिकेकाई – 200 ग्रॅम
  • आवळा – 200 ग्रॅम
  • रिठा किंवा साबण
  • अंबाडीच्या बिया(flax seeds)

आयुर्वेदिक श्याम्पू बनवण्याची कृती

  • सर्वप्रथम रीठा घ्याव्यात आणि त्यातील बिया काढून, रिठा बारीक कुटून घ्याव्यात.
  • आता अंबाडीच्या बिया देखील बारीक करून घ्याव्या आणि त्यात पाणी टाकावे.
  • शिकेकाई आणि आवळा देखील दळून घ्याव्या.
  • या चार देखील साहित्याचे साफ आणि बारीक केलेलं मिश्रण हे गॅस वर गरम करून घ्यावे.

आता हा तीन लिटर पाणी टाकून उकळून घ्यावे, नंतर 10 मिनिटे झाल्यानंतर त्यात चार चमचे खोबरेल तेल टाकावे. गॅस बंद करून ते मिश्रण गरम – गरम गाळून घ्यावे व काचाच्या बोटल मध्ये किंवा मातीच्या भांड्यात मध्ये ठेवावे हे फ्रीज मध्ये ठेवण्याएवजी सूर्यप्रकाशा मध्ये ठेवावे. फ्रीज मध्ये ठेवण्याएवजी सूर्यप्रकाशात ठेवल्याने आपला श्याम्पू अधिक स्ट्रॉंग होईल. यात अंबाडीच्या बिया टाकल्याने हा क्रीमयुक्त श्याम्पू बनतो आणि याच्या वापराणे केसांना जेल सारखी पोत देतात. हा श्याम्पू आपण एकदा बनवला तर तीन महीने पर्यंत वापरू शकतो. ह्या श्याम्पू मुळे केसातील कोंडा तर निघतोच शिवाय केस मऊ बनवतो आणि केस गळती देखील थांबवतो. ह्याच्या वापराने केस देखील पांढरे होत नाहीत आणि केसात ऊवा देखील होत नाहीत, तसेच टक्कल पडत असेल तर ते देखील कमी होते.

सूर्यप्रकाश- कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय

कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय/कोंडा जाण्यासाठी उपाय/ केसात कोंडा होण्याची कारणे / konda janyasathi gharguti upay

केसातील कोंडा घालवण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे सूर्यप्रकाश. केस निरोगी आणि कोंडा विरहित ठेवण्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश घेतल्याने केसाच्या सर्व समस्या दूर होतात त्यामुळे केस धुतल्यानंतर केस हेयर-ड्रायर ने सुकवण्या ऐवजी कोवळ्या सूर्यप्रकाशात सुकवावे त्यामुळे केसातील संपूर्ण कोंडा निघून जातो यात काही शंका नाही. केसा बरोबरच सूर्यप्रकाश घेणे हे संपूर्ण आरोग्यासाठी देखील अतिशय फायदेशीर आहे.

हेयर मास्क

कोंडा पुर्णपणे घालवण्यासाठी सूर्यप्रकाशा बरोबरच घरी बनवलेला हेयर माक्स देखील वापरावा.त्यासाठी एका वाटीत चार चमचे दही घ्यावे, त्यात चार ते पाच चमचे कोरफड गर घ्यावा. आता यात एक चमचा लिंबूचा रस टाकावा तसेच चार चमचे खोबरेल तेल टाकावे झाला आपला हेयर मास्क तयार. केसातील कोंडा घालवण्यासाठी हा मास्क ब्रश च्या सहाय्याने लावावे. एक तासाने आपण बनवलेल्या श्यामपू ने केस धुवून टाकावे. त्यामुळे या श्यामु मुळे केसातील पूर्ण कोंडा नाहीसा झालेला दिसेन.

पुदिना व लिंबू- कोंडा जाण्यासाठी उपाय

कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय/कोंडा जाण्यासाठी उपाय/ केसात कोंडा होण्याची कारणे / konda janyasathi gharguti upay
पुदिना व लिंबू

पुदिना व लिंबू हे लावल्याने देखील केसातील कोंडा दूर होतो. त्यासाठी केस धुण्याआधी चार ते पाच लिंबू मधोमध अर्धे कापावे आणि त्यावर पुदिना लावून केसांना चोळावे. मीठ व लिंबू लावल्याने केसातील कोंडा नक्कीच दूर होण्यास मदत होते.

कडूलिंबाचे तेल- konda janyasathi gharguti upay

कडूलिंबाचे तेल आपण घरी बनवू शकतो. त्यामुळे कोंडा, खाज, फोड यांसारखे आजार दूर होतात. तर बघूया हे तेल कसे बनवायचे कडूलिंबाचे पाने चार वाटी तेलात गॅसवर गरम करून घ्यावीत. दोन वाटीत दोन तेल घ्यावे एका वाटीत व्हीटमिन C चे पाच ते सहा कप्सुल टाकावे आणि दुसर्‍या वाटीत सरसों चे तेल घ्यावे आता तिसर्‍या वाटीत गुलाबजल घ्यावे. चौथ्या वाटीत कडीपत्त्याचे तेल किंवा साधे तेल घ्यावे.

सर्वात महत्वाचे म्हणजे चारही वाट्या या कडक सूर्यप्रकाशात चार ते पाच तास ठेवाव्या याने सूर्यप्रकाशातील सर्व गुणधर्म त्या तेलात उतरतील. आता हे चारही तेल एकत्र करून एका काचेच्या बॉटल मध्ये भरून ठेवावे. तेल छान मिक्स होण्यासाठी चमच्याने छान हलवावे. या तेलाच्या वापराने केसातील संपूर्ण कोंडा निघून जातो आणि केस दाट, मऊ. चमकदार होतात. या तेलाच्या मालीश ने तणाव देखील नाहीसा होतो.

लिंबू रस, खोबरेल तेल आणि दही

कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय/कोंडा जाण्यासाठी उपाय/ केसात कोंडा होण्याची कारणे / konda janyasathi gharguti upay
लिंबू रस,खोबरेल तेल आणि दही

लिंबू रस खोबरेल तेल आणि दही याच्या मिश्रणाने देखील डोक्यातील कोंडा हा पुर्ण पणे नाहीसा होण्यास मदत होते. त्यासाठी दोन चमचा लिंबू रस घ्यावा, त्यात चार चमचे खोबरेल टाकावे आता यात सॉफ्ट पणा येण्यासाठी दोन ते तीन चमचे दही टाकावे आणि या मिश्रणाने डोक्याच्या स्कीन वर घासावे. याने केस मऊ राहतील चमकदार होतील आणि कोंडा देखील नाहीसा होईल.

मुलतानी माती आणि लिंबू रस

कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय/कोंडा जाण्यासाठी उपाय/ केसात कोंडा होण्याची कारणे / konda janyasathi gharguti upay
मुलतानी माती

मुलतानी माती घ्यावी, आपले केस दाट असतील तर अर्धी वाटी मुलतानी माती घ्यावी आणि त्यात अर्धी वाटीच्या वर लिंबू रस काढून टाकावा, आता हे तयार मिश्रण केसांना मूळापासून लावावे आणि अर्धा किंवा एक तास झाला की, कोमट पाण्याने केस धुवून टाकावे. याने डोक्यातील कोंडा पुर्णपणे जाईल.

नारळाच तेल, लसूण तेल, आवळा तेल

केसात झालेला कोंडा घालवण्यासाठी नारळाच तेल, आवळा पावडर किंवा आवळा तेल आणि त्यात बारीक केलेल्या लसूण पाकळ्या टाकाव्या याने तुमच्या केसात झालेला कोंडा हा कमी होईल. त्यासाठी खोबरेल तेल चार ते पाच चमचे घ्यावे त्यात बारीक कापलेला लसूण टाकावा आणि आवळा पावडर किंवा दोन चमचे आवळा तेल टाकावे आणि त्याने केस धुण्याच्या एक दिवस रात्री केसांना मसाज करावी. यामुळे केसांना पोषकता देखील मिळेल आणि कोंडा देखील निघून जाईल.

केसात कोंडा होण्याची कारणे

साधारणपणे डोक्यात कोंडा होण्याची खालील काही कारणे आहेत ज्यांना माहिती झाल्यानंतर आपण ते कारण आपल्या केसात कोंडा होण्यासाठी कारणीभूत ठरू देणार नाहीत , तर ते कारणे खालील आहेत –

केसात शांपु राहणे -केसात कोंडा होण्याची कारणे

कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय/कोंडा जाण्यासाठी उपाय/ केसात कोंडा होण्याची कारणे / konda janyasathi gharguti upay
केसात शांपु रहाणे

आपल्याला कधी घाई-गडबड असेल तर आपण गडबडीत शांपु झाल्यानंतर केस नीट धुवत नाहीत म्हणजेच शांपु किंवा शिकेकाई काढत नाहीत, अशावेळी हा शांपु किंवा शीकेकाई केसात राहिली तर त्याच्यामुळे देखील कोंडा होऊ शकतो त्यामुळे केसात शांपु किंवा शीकेकाई राहणार नाही याची काळजी घ्यावी.

खूप जास्त तेल लावणे – केसात कोंडा होण्याचे कारण

दुसरे कोंडा होण्याचे मुख्य कारण म्हणजे रात्री झोपताना किंवा रोज केसांना खूप जास्त तेल लावणे, त्यामुळे देखील त्या तेलामुळे केसात धूळ आणि माती मुळाणा चिटकुन बसते आणि त्याचाच कोंडा होतो. त्यामुळे रोज रात्री खूप जास्त तेल लावण्यापेक्षा आठवड्यातून दोन वेळेस हेडबाथ घेण्याच्या एक दिवस आधी केसांना तेल लावावे आणि दुसर्‍या दिवशी केस स्वच्छ धुवून घ्यावे.

सारांश – कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय/ केसात कोंडा होण्याची कारणे/konda janyasathi gharguti upay

तुमच्या डोक्यात झालेल्या कोंडया पासून मुक्तता मिळवण्यासाठी आमच्या या लेखात सांगितलेले वरील पैकी कोणतेही उपाय वापरुन तुम्ही डोक्यात झालेला कोंडा पुर्णपणे कमी करण्यास नक्कीच यशस्वी होऊ शकता. वरील लेखात सांगितलेले सर्व उपाय हे नैसर्गिक असून त्याचा कोणताही विपरीत दुष्परिणाम होणार नाही. त्याचबरोबर वरील लेखात आम्ही केसात कोंडा होण्याचे कारण काय ते देखील सांगिलेले त्यामुळे ते होणे टाळावे जेणे करून कोंडा होणार नाही.

आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, “कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय / केसात कोंडा होण्याची कारणे/ konda janyasathi gharguti upay” कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top