कावीळ घरगुती उपचार – Top 10 Best Home Remedies

कावीळ घरगुती उपचार / kavil var upay / kavil chi lakshane / कावीळ वर औषध सांगा >>> पावसाळा आला की सर्वांना आनंद होतो, बळीराजा सुखावतो. सगळीकडे हिरवाई पसरते. असं नजरेस पहायला सगळं अगदी छान दिसते आणि नजरेस अगदी प्रसन्न असे वातावरण वाटत असते. पण पावसाळा म्हणलं की सर्वांना काळजी लागते ती म्हणजे पावसाळ्यात होणार्‍या अनेक आजारांची, कारण पावसाळ्यात जर आपण स्वच्छता नाही ठेवली तर अनेक आजारांना आपण आमंत्रण देत असतो. साधारणपणे पावसाळ्याला सुरुवात झाली की, अनेक आजार हे डोकी वर काढायला लागतात. सर्दी-खोकला, ताप, अंगात कणकण यांसारखे आजार हे वाढायला लागतात. त्याचबरोबर अस्वच्छ पाणी, साचलेले पाणी , रस्त्यावरचे उघडे आणि खराब खाणे या सर्वांमुळे पोटाचे आजार आणि बक्टेरियल आजार वाढतात आणि त्यातलाच एक आजार म्हणजे कावीळ आजार.

साधारण पावसाळा सुरु झाला की, कावीळ हा आजार डोक वर काढायला लागतो. पावसाला सुरुवात झाली की, कावीळ चे रुग्ण वाढायला सुरुवात होते,म्हणजेच आपल्याला कावीळ होण्याची शक्यता ही वाढलेली असते कारण या दिवसात अनेक आजार पसरण्या सारखेच वातावरण निर्माण झालेलेअसते व पावसाळ्यानंतरही कावीळीचे रुग्ण हे वाढलेले दिसतात, याचे कारण म्हणजे पावसामुळे झालेले गढूळ पाणी. गढूळ व दुषित पाणी व दुषित अन्न यांचे सेवन केल्यामुळे कावीळ या आजाराचे रुग्ण वाढू लागतात.

kavil / कावीळ

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हा कावीळ आजार कसा होतो? तर जेव्हा माणसाच्या शरीरातील अन्नपचन करणारे ‘पित्त’ हे योग्य मार्गाने आतड्यात न जाता ते पित्त जेव्हा रक्तात मिसळण्यास सुरवात होते तेव्हा आपल्याला कावीळ हा आजार होतो.  कावीळ या आजारालाच ‘हिपॅटायटस बी’ किंवा ‘इन्फेक्टिव्ह हिपॅटायटस’ असे देखील म्हणतात. आता आपण कावीळ होण्याची कारणे कोणती आहेत, कावीळ ची लक्षणे कोणती आहेत, आणि त्यावर कोणते घरगुती उपचार करता येतात किंवा कावीळ वर औषध सांगा या प्रश्नांची उत्तरे काय आहेत ते पाहूया, आजच्या आपल्या या लेखात …….

कावीळ ची लक्षणे (kavil chi lakshane)

कावीळ या आजाराची लक्षणे

  • ताप येणे व त्यामुळे वारंवार थकवा जाणवणे.
कावीळ ची लक्षणे
कावीळ ची लक्षणे (kavil chi lakshane) – ताप येणे आणि थकवा जाणवणे
  • बद्धकोष्ठतेचा वारंवार त्रास होणे.
  • सतत उलट्या होणे.
kavil chi lakshane - उलट्या होणे
kavil chi lakshane – उलट्या होणे
  • पोटाच्या वरील भागात दुखणे.
  • लघवी पिवळी होणे.
  • नखं, त्वचा आणि डोळे पिवळे होणे.
kavil chi lakshane
  • वजन झपाट्याने कमी होणे.

कावीळ होण्याची कारणे :

  • काविळीच्या रुग्णांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात वाढ होताना दिसते कारण या दिवसात पाणी दुषित व गढूळ होते. हे पाणी पिल्यामुळे कावीळ होण्याची शक्यता जास्त असते.
  • आजकाल बाहेर, रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ खाण्याचं प्रमाण वाढल आहे. कावीळ होण्यासाठी हे ही एक कारण असू शकतं. पावसाळ्यात बाहेरच्या पदार्थामध्ये वापरण्यात येणारे पाणी त्रासदायक ठरु शकते.
  • जे लोक मद्यपानाचे सेवन अति प्रमाणात करतात त्यांना कावीळ होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.
  • टायफाइड, डेंग्यु, मलेरिया झाल्यानंतर माणसाच्या शरीरातील पेशी कमी होतात. त्यावेळी कावीळ होण्याची शक्यता अधिक असते.

कावीळ घरगुती उपचार /कावीळ वर औषध सांगा /kavil var upay

या आजारावर प्रामुख्याने सहसा खालील उपचार आणि औषध घेतले जाते, त्यामुळे जा आजार नियंत्रणात येण्यास बरीच मदत होते, आपल्याला माहीतच असेल की, कावीळ हा आजार लवकर नियंत्रणात न आल्यास त्याचे घातक आणि गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. तर ते उपाय उपचार आणि औषध हे खालील आहे.

ऊसाचा रस

कावीळ घरगुती उपचार / kavil var upay / kavil chi lakshane / कावीळ वर औषध सांगा
कावीळ घरगुती उपचार – ऊसाचा रस

 खूप लोकांना ऊसाचा रस आवडतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उसाचा रस आवर्जून प्यायला जातो. पण जेव्हा कावीळीचे निदान होते तेव्हा ऊसाचा रस हमखास प्यायला सांगितला जातो. ऊसाच्या रसामुळे शरीरात उष्णता निर्माण होते व रक्त तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. तसेच ऊसाच्या रसा मुळे रोगप्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते. जर ऊस मिळत असेल तर त्याचे तुकडे चावून खावेत, पण जर ऊस मिळत नसेल तर ऊसाचा रस प्यावा. ऊसाचा रस हा कावीळी साठी अत्यंत गुणकारी आहे, त्यामुळे ३ ते ४ ग्लास ऊसाचा रस कावीळ झाल्यानंतर नक्की प्या.

लिंबाचा रस

कावीळ वर घरगुती उपचार - लिंबाचा रस
लिंबू सरबत

लिंबाचा रस किंवा लिंबू सरबत हे कावीळ या आजारावर मात करण्यासाठी सर्वात प्रभावी औषध आहे. कावीळ जर झाली असेल तर लिंबाच्या रसाचे आणि लिंबू सरबत यांचे सेवन करावे. कावीळी मध्ये यक्रुताला त्रास होतो. यक्रुताचे कार्य पूर्ववत व चांगले करण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. याचसाठी लिंबू रस आणि लिंबू सरबत एचआर कावीळ घरगुती उपचार म्हणून सर्वात प्रभावी आहे.

तुळशीची पाने

कावीळ घरगुती उपचार / kavil var upay / kavil chi lakshane / कावीळ वर औषध सांगा - तुळशीची पाने - कावीळ वर आयुर्वेदिक औषध
तुळशीची पाने – कावीळ वर गुणकारी

तुळशी ही देखील इतर आजरा प्रमाणेच कावीळ वर अत्यंत गुणकारी औषधी वनस्पती आहे. तुळशीच्या पानांमधील औषधी सत्व कावीळ कमी करण्यासाठी चांगले व फायदेशीर असतात. त्यामुळे तुळशीची पाने चावून खावीत. एकावेळी जर ७ ते ८ पाने चावून खाल्ली तर कावीळ बरी होण्यास मदत होते.

टोमॅटोचा रस

कावीळ वर टोमॅटोचा रस हा देखील अत्यंत गुणकारी असा असतो. रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास टोमॅटोचा रस पिल्याने कावीळ पासुन आराम मिळतो. जर टोमॅटोचा रस नुसता पिणे जमत नसेल तर त्यामध्ये मीठ व मिरपूड घालून प्यावे यामुळे तोंडाला चव देखील छान येते आणि आपला कावीळ लवकर बारा होतो. टोमॅटो हे पचनास आणि आजारास दूर करण्यास मदत करेल.

मुळ्याचा रस

कावीळ झाल्यानंतर काहिही खाण्यापिण्याची इच्छा मरून जाते. पण अश्या दिवसांमध्ये शरीरास उर्जा मिळवून देणारा चांगला आहार खाण्याची गरज असते. पण भूक लागत नाही म्हणून या दिवसात मुळा आहारात असणं आवश्यक असतं. मुळ्यावर मीठ आणि मिरपूड टाकून खावे. मुळ्याचा रस किंवा त्याच्या पानांचा रस प्यावा. मुळ्याच्या पानांच्या रसामुळे पोट साफ होते व त्यामुळे भूक लागते. त्यामुळे दिवसातून एकवेळ तरी मुळ्याचा रस प्यावा.

पपईच्या पानाचा रस

कावीळ घरगुती उपचार / kavil var upay / kavil chi lakshane / कावीळ वर औषध सांगा - पपई च्या पानांचा रस  - कावीळ वर आयुर्वेदिक औषध
कावीळ घरगुती उपचार – पपई च्या पानांचा रस

पपई ची पाने ही अनेक गुणांनी परपुर्ण अशी असतात . पपई च्या पानाचा रस हा रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी खूप गुणकारी असतो, त्यामुळे पपईची कोवळी पाने वाटून त्याचा रस बनवला जातो व तो पिण्याचा सल्ला या जर कावीळ झाला असेल तर या दिवसात दिला जातो. पपई आणि त्याची पाणे हे दोन्ही अनेक आजारावर रामबाण उपाय म्हणून उपयोगी येतात.

भिजवलेले मनुके

kavil var gharguti upay - भिजवलेले मनुके
भिजवलेले मनुके

आपल्या शरीराची उर्जा वाढवण्याचे काम हे अतिशय चांगल्या प्रकारे ड्रायफूट करतात. त्यामध्ये मनुके हे कावीळ साठी अधिक चांगले असतात . त्यामुळे कावीळ चे लक्षणे दिसू लागली तर मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते खावेत. असे कमीत-कमी १५ ते २० दिवस मनुके खावेत याने कावीळ लवकरात लवकर बरा होईल आणि आपल्याला अशक्तपणा देखील जाणवणार नाही.

आवळ्याचा रस

कावीळ घरगुती उपचार / कावीळ वर औषध सांगा - आवळ्याचा रस - कावीळ वर आयुर्वेदिक औषध
आवळ्याचा रस

आवळ्याचा रस हा सुद्धा कावीळ या आजारावर गुणकारी असतो, त्यामुळे कावीळ झाल्यानंतर आवळ्याचा रस हा नियमित प्यावा.

दूध आणि दुधाचे पदार्थ

दूध व त्यापासून बनलेल्या पदार्थापासून शरीराला प्रोटिन मिळतात, त्यामुळे दूध आणि दुधाचे पदार्थ कावीळ झाल्यानंतर आवर्जून खाल्ले पाहिजेत. रोज एक ग्लास ताक नक्की पिले पाहिजे.

हिरव्या भाज्या आणि फळे

कावीळ झालेल्या दिवसात हिरव्या पालेभाज्यांचे भरपूर सेवन केले पाहिजे यामुळे पोट साफ राहण्यास मदत होते. त्याशिवाय शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक भाज्यांमधून मिळतात. फळे, फायबर असलेले पदार्थ या दिवसात म्हणजे कावीळ झाल्यास जास्त खावेत, ज्यामुळे शरीरास ऊर्जा मिळते. फळांमध्ये आंबा, पपई यासारखी फळे खावीत त्यामुळे पचनशक्ती जास्त प्रमाणात वाढते.

कावीळ झाली असेल तर, या गोष्टी करा

कावीळ होऊ नये यासाठी आपण जे कारणे आहेत त्यापासून दूर राहावे आणि जर झालाच तर या गोष्टी करा नक्कीच आराम मिळेन.

मांसाहारी पदार्थ खाणे टाळा.

तेलकट पदार्थ जसे वडा, चायनीज यासारखे पदार्थ टाळा.

मद्यपान कमी करा.

मीठाचे प्रमाण कमी करा.

भरपूर पाणी प्या.

सारांश – कावीळ घरगुती उपाय / कावीळ वर औषध / kavil var upay / kavil chi lakshane

आपल्याला आम्ही वरील लेखात सांगितलेली जर कावीळ झाल्याची लक्षणे दिसली तर आपण त्यावर लगेच कावीळ घरगुती उपचार , कावीळ वर औषध सांगा यातील माहिती वापरुन विलाज करावा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि आपल्याला कावीळ पासून होणारा त्रास कमी होईल व आपण लवकर या आजारातून लवकरात लवकर कमी होईल.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले, “कावीळ घरगुती उपचार कावीळ वर औषध सांगा / kavil var upay /kavil chi lakshaneहे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top