बटाट्याचे पदार्थ / बटाटा पासून बनवता येणारे विविध पदार्थ

बटाट्याचे पदार्थ / बटाटा पापड कसे करायचे/ बटाटा चिप्स कसे बनवायचे/ potato chips/ potato pickle >>>बटाटा या फळभाजी पासून कोणी अज्ञात असणे शक्यच नाही, कारण बटाटा हा सर्व परिचित तर आहेच परंतु त्याच बरोबर या बटाट्याचा अनेक पदार्थ बनवताना मोलाचा वाटा असतो. बटाटा पासून आपण अनेक नव-नवीन तसेच कुर-कुरीत आणि चम-चमीत पदार्थ हे बनवू शकतो. बटाट्याचे विविध पदार्थ हे अगदी सर्वांनाच मनापासून आवडतात आणि हे बटाट्याचे पदार्थ घरोघरी बनवले देखील जातात.

बटाट्याचे पदार्थ / बटाटा पापड कसे करायचे/ बटाटा चिप्स कसे बनवायचे/ potato chips/ potato pickle
बटाटा

परंतु तरी देखील बर्‍याच महिलाना हे बटाट्याचे पदार्थ बनवायचे तरी कसे आणि कोण- कोणते बटाट्याचे पदार्थ आपण बनवू शकतो याचा प्रश्न हा पडलेला असतो. त्या सर्व महिलांसाठी आणि नव-शिक्या तरुणींसाठी आजचा हा ‘बटाट्याचे पदार्थ/ बटाटा पापड कसे बनवायचे/ बटाटा चिप्स कसे बनवायचे / potato pickle’ हा अतिशय महत्वपूर्ण आणि स्वादपूर्ण असा लेख आम्ही सादर करीत आहोत.

या लेखातील माहिती आणि बटाट्याचे पदार्थ हे तुम्हाला माहिती होतील, तसेच ते कसे बनवायचे, कसे टिकवायचे त्याची कृती काय हे देखील या लेखाद्वारे समजण्यास मदत होईल. लहान मुलांच्या अगदी छोट्या-मोठ्या भुकेला दूर पळवण्यास बटाटा हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे हे बटाट्याचे पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा. बटाट्याचे पदार्थ हे खाण्यास देखील अतिशय पौष्टिक असतात आणि चवीस चवदार लागतात.

आपले वजन वाढत नसेल तर बटाटा खाणे, असा सल्ला अगदी डॉक्टरांपासून ते घरातील वडीलधार्‍या माणसापर्यंत सगळेच देत असतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व भारदस्त आणि सढृड बनवायचे असेल. तुमचे किंवा तुमच्या बाळांचे वजन वाढवायचे असेल तर तुम्ही या बटाट्यापासून वेगवेगळे पदार्थ नक्की बनवून खा आणि दुसर्‍यांना देखील खाऊ घाला. हे अगदी फायदेशीर ठरू शकते.

बटाटा हे असे आहे जे वर्षभर उपलब्ध होणारे कंदमूळ आहे. बटाटा हे अनेक पदार्थ करण्यास उपयोगी ठरणारे आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण पाहुया की, या बटाट्याचे कोणकोणते पदार्थ आपण घरच्या घरी बनवू शकता तसेच ते बनवून बाजारात विकू देखील देखील शकता, असे केल्याने तुमच्या उत्पन्नात देखील भर पडण्यास मदत होते.

चला तर मग जाणून घेऊया आजच्या या लेखात बटाट्याचे पदार्थ कोणते आहेत ,बटाटा पापड कसे करायचे, बटाटा चिप्स कसे बनवायचे, potato pickle मराठी रेसिपी आणि ते कसे बनवावे, याची परिपूर्ण माहिती या एकाच लेखात.

बटाट्याचे पदार्थ

आपण नियमित बटाट्याचे अनेक पदार्थ बनवून खातो जसे की, बटाट्याचे पराठे, फिंगर चिप्स, बटाटा वडा, बटाट्याचा शिरा, भेळ, बटाट्याचा समोसा यांसारखे एक ना अनेक पदार्थ आपण बनवून लगेच खातो. परंतु बटाट्याचे असे काही पदार्थ आहेत जे आपण बनवून आपण वर्षभर देखील साठून ठेऊ शकतो आणि हवे तेंव्हा बनवून खाऊ शकतो. जसे की, potato chips म्हणजेच बटाटा चिप्स potato pickle बटाट्याचे लोणचे, आणि बटाटा पापड कसे करायचे ते आपण आता पाहूया

बटाट्याचे असे काही पदार्थ बनवून आपण ते विकू देखील शकतो आणि त्यांतून बराच नफा देखील आपल्याला मिळेल. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे बटाट्याचे विविध पदार्थ कोणते आहेत आणि ते कसे बनवायचे हे आपण या लेखात जाणून घेऊया –

बटाट्याचे पापड

बटाट्याचे पदार्थ / बटाटा पापड कसे करायचे/ बटाटा चिप्स कसे बनवायचे/ potato chips/ potato pickle
बटाट्याचे पापड

बटाट्याचे पापड हे उन्हाळ्यात बनवून आपण योग्य प्रकारे साठवण करून वर्षभर टिकवून ठेऊ शकतो आणि उपवास किंवा कुणी पाहुणे आले तसेच मुलांना भूक लागली असता आपण लगेचच तळून देऊ शकतो. त्यामुळे असे बटाटा पापड बनवने हे फायद्याचे ठरेल. चला तर मग आता जाणून घेऊया की, हे बटाटा पापड कसे बनवायचे आणि त्यासाठी हे बनवण्यासाठी लागणारे साहित्य काय आहे-

  • चार ते पाच माध्यम आकाराचे बटाटे
  • चार वाटी शाबूदाणा
  • आठ वाटी पाणी
  • एक चमचे मिरची पावडर
  • एक चमचा मैदा
  • एक चमचा जिरे
  • चवी पुरते मीठ
  • अर्धा चमचा हिरवी मिरची

आता आपण पाहूया या सर्व साहित्यापासून पापड बनवण्याची कृती काय आहे ते पाहूया नक्कीच ही कृती वापरल्याने तुमचे बटाटा पापड उत्तम आणि अगदी चवदार असे होतील.

बटाट्याचे पापड बनवण्याची कृती

सर्वात अगोदर बटाटे छान उकडून घ्यावे आणि बटाट्याची सालं काढून त्याचे बारीक तुकडे करून कापावे. त्या नंतर त्यात शाबूदाणा मिक्सर मधून काढून टाकावा आणि त्याची चांगली पेस्ट बनवावी. आता बटाट्याचे देखील बारीक तुकडे करून घ्यावे आणि ते देखील मिक्सर मधून काढावे. चार कप पाणी उकळून गॅस चालू ठेवा पाण्याला उकळी येऊ लागली की, त्यामध्ये शाबूदाण्याचे पीठ टाकावे.

पीठ आणि पाणी हे छान व्यवस्थित हलवून घ्यावे. एकजीव होई पर्यंत गॅसला कमी ठेवा नंतर त्यामध्ये तयार केलेली बटाट्याची पेस्ट टाकावी. हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे. आता हे मिश्रण थोडे घट्ट होईल आणि घट्ट झाले की त्यात थोडे पाणी टाकावे. या तयार मिश्रणात तुमच्या आवडीनुसार मीठ टाकावे, मिरची टाकावी, थोडीशी कोथिंबीर टाकावी आणि जिरे देखील टाकावे. आता एका वाटीत मैदा घ्यावा, आणि त्यात थोडे पाणी टाकून एकत्र करावे. हा पाण्यात भिजवलेला मैदा शिजणार्‍या पीठात म्हणजेच मिश्रणात टाकावा.

हे तयार मिश्रण शिजले की, थोडे घट्ट झाले की, गॅस बंद करावा. दहा मिनिटांनी एका प्लॅस्टिकवर किंवा कॉटनच्या कपड्यावर बटाट्याचे पापड पळीने टाका आणि ते उन्हात चांगले वाळू द्यावे. ऊन्हात दोन ते तीन दिवस चांगले वाळले की हे पापड हवा बंद डब्यात भरून ठेवावे. हे पापड वर्षभर देखील टिकतात. आपल्याला जेव्हा खावेसे वाटतील तेंव्हा तेलात तळून किंवा तेल लावून भाजून खावे।

बटाट्याचे लोणचे / potato pickle

बटाट्याचे पदार्थ / बटाटा पापड कसे करायचे/ बटाटा चिप्स कसे बनवायचे/ potato chips/ potato pickle
बटाट्याचे लोणचे

आपण बटाट्याचे सर्व पदार्थ खाल्ले असतील पण आपण बटाट्याच्या लोंणच्याचा आस्वाद घेतला नसेल तर, हे बटाट्याचे लोणचे बनवण्याची कृती आणि साहित्य खालीलप्रमाणे

बटाट्याचे लोणचे करण्याचे साहित्य –

  • पाच मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  • एक बारीक कापलेला कांदा
  • चार ते पाच हिरवी मिरची
  • दोन टेबल स्पून लिंबू रस
  • चिमूटभर जिरे
  • आवडीनुसार काळे मीठ आणि कोथिंबीर
  • एक चमचा मिरे
  • एक चमचा काळे तीळ
  • तीन चमचे मोहरीचे तेल
  • चिमूटभर मेथीचे दाणे

बटाट्याचे लोणचे बनवण्याची कृती

एका भांड्यात बटाटा, हिरवी मिरची, कांदा, लिंबू रस, कोथिंबीर आणि काळी मिरी तसेच काळे मीठ हे सर्व टाकावे. त्यानंतर थोडे जिरे, थोडी कोथिंबीर आणि पांढरे तीळ यात घाला. आता गॅसवर एका भांड्यात मोहरीचे तेल टाकावे व ते तेल गरम करावे.

बटाट्याचे पदार्थ / बटाटा पापड कसे करायचे/ बटाटा चिप्स कसे बनवायचे/ potato chips/ potato pickle
बटाटा लोणचे

त्यामध्ये मेथीचे सर्व दाणे टाकावे व गरम होऊ द्यावे. हेच तेल नंतर बटाट्याच्या मिश्रणावर टाकावे. त्यानंतर हे मिश्रण छान असे ढवळून घ्यावे. अशा प्रकारे तुमचे चविष्ट असे बटाट्याचे लोणचे तयार आहे. हे लोणचे जास्त दिवस टिकवण्यासाठी तुम्ही याला बरणी मध्ये भरून फ्रीज मध्ये बरेच दिवस स्टोर करू शकता आणि वर्षभर वापरू शकता.

बटाट्याचे स्नॅक्स (ब्रेड रोल्स)

बटाट्याचे पदार्थ / बटाटा पापड कसे करायचे/ बटाटा चिप्स कसे बनवायचे/ potato chips/ potato pickle

बटाट्याचे स्नॅक्स म्हणजे ब्रेड रोल्स हा देखील लहान मुलांचा अगदी आवडता पदार्थ आहे. बटाट्याचे हे ब्रेड रोल्स बनवण्याची कृती आणि त्यासाठी लागणारे साहित्य हे खालीलप्रमाणे आहे.

  • नऊ ते दहा मध्यम आकाराचे बटाटे
  • चार चमचे जिरे
  • दोन इंच आले
  • दोन ब्रेड
  • बारा ते तेरा हिरव्या मिरच्या
  • दोन लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ
  • एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • तळणासाठी तेल

बटाट्याचे स्नॅक्स बनवण्याची कृती

बटाट्याचे पदार्थ / बटाटा पापड कसे करायचे/ बटाटा चिप्स कसे बनवायचे/ potato chips/ potato pickle
फिंगर चिप्स

सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावे आणि मग त्याचे साल हे सोलून घ्यावे. आता हे बटाटे छान असे खिसणीने खिसून घ्यावे. मिरची आणि अद्रक हे मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. आता ब्रेड च्या स्लाइस चे बारीक तुकडे करून घ्यावे आणि ते देखील मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.

आता यात अद्रक, लिंबाचा रस ,मीठ, जिरे ,कोथिंबीर टाकावी आणि त्यावर थोडा थोडा ब्रेडचा बारीक चुरा पसरवावा आणि त्याचा चांगला गोळा तयार करावा. आता या तयार मिश्रणाचे अगदी लिंबा एवढे गोळे तयार करावे आणि कपड्या खाली झाकून ठेवावे आणि थोड्या वेळांनी गरम -गरम तळून सर्वांना सर्व्ह करावे.

बटाटा चिप्स कसे बनवायचे / potato chips

बटाट्याचे पदार्थ / बटाटा पापड कसे करायचे/ बटाटा चिप्स कसे बनवायचे/ potato chips/ potato pickle
बटाटा चिप्स / वेफर्स

बटाटा चिप्स हे अगदी सर्वांना आवडतात तसेच ते वर्षभर देखील टिकतात. बटाटा चिप्स हे बाजारात देखील विकत मिळतात. उपवास यासाठी तर हमखास हे बटाटा चिप्स वापरले जातात. त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला अतिशय उपयोगी ठरेल. तर बटाटा चिप्स potato chips बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे,

  • बटाटा चिप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य
  • मोठ्या आकाराचे बटाटे
  • मोठे पातेलेभर पाणी बटाटे चिप्स उकडण्यासाठी
  • चवीपुरते मीठ
  • बटाटे काळे पडू नये म्हणून एक छोटा तुरटी चा तुकडा

आता वरील सर्व साहित्य वापरुन बटाटा चिप्स बनवण्याची कृती खालील प्रमाणे

बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे कृती

बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी सुरूवातीला बटाटे स्वच्छ धुवून घ्यावे आणि नंतर त्याचे साल काढावे आणि हे साल काढलेले बटाटे पाण्यात टाकावे कारण ते पाण्याबाहेर ठेवले तर लाल पडतात. आया या साल काढलेल्या बटाट्याला चिप्सच्या खिसणीने खिसून त्याच्या पातळ चकत्या कराव्यात आणि त्य मीठाच्या पाण्यात टाकाव्या. संपूर्ण बटाट्याचे चिप्स होई पर्यंत हे चिप्स मीठाच्या पाण्यात भिजू द्यावे.

बटाट्याचे पदार्थ / बटाटा पापड कसे करायचे/ बटाटा चिप्स कसे बनवायचे/ potato chips/ potato pickle
बटाट्याचे चिप्स

सर्व चिप्स करून झाल्यावर एका मोठ्या पातेल्यात गरम पाणी करावे त्यावर तुरटीचा तुकडा फिरवावा त्यामुळे चिप्स पांढरे शुभ्र राहतात . आता त्या उकळत्या पाण्यात थोडे चिप्स टाकावे आणि थोडे वाफावले गेल्यावर काढून गाळणीत गाळावे आणि उन्हात सूती कापडवर वाळत घालावे.

अशा प्रकारे आपले बटाट्याचे विविध पदार्थ हे तयार आहेत. ते आपण बनवून विकू देखील शकता आणि त्यातून आपला नवीन व्यवसाय देखील पुढे नेऊ शकता. तसेच हे पदार्थ आपण फ्रीज मध्ये देखील साठवून ठेऊ शकता.

सारांश – बटाट्याचे पदार्थ / बटाटा पापड कसे करायचे, बटाटा चिप्स कसे बनवायचे , potato chips, potato pickle

आपल्याला जर बटाट्याचे पदार्थ कोणते आहे ते कसे करावे हे माहिती करून घ्यायचे असेल तर, हा लेख वाचवा. या लेखातील माहिती आणि कृती वापरुन तुम्ही हे पदार्थ घरच्या घरी आरामात बनवू शकता.

आपल्याला वरील लेखामध्ये सांगितलेली “बटाट्याचे पदार्थ रेसिपी /बटाटा पापड कसे बनवायचे ” या विषयीची माहिती कशी वाटली, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top