पित्त झाल्यावर घरगुती उपाय – Best 10 Home Remedies

पित्त झाल्यावर घरगुती उपाय / पित्त उसळणे घरगुती उपाय / पित्त लक्षणे मराठी / pitt upay in marathi >>>> आजकाल आपण पाहतोय की, बदललेली जीवनशैली, आहार आणि व्यायामाचा अभाव या सर्व गोष्टींचा आपल्या आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम हा होत आहे. या सर्व गोष्टी सोबत अजून भर पडते तर ती म्हणजे इंटरनेट बघत रात्री उशिरा पर्यंत जागरण करण्याची. या सर्व बाबींमुळे म्हणजे जड अन्न, अयोग्य आहार, शारीरिक मेहनतीच्या कामाचा अभाव, व्यायामाचा अभाव,अवेळी झोप- जागरण यामुळे पित्त होणे , अजीर्ण होणे, खाल्लेले अन्न न पचणे ,अॅसिडिटी होणे यांसारख्या समस्या या उद्भवत असतात आणि आपल्याला त्यास सामोरे जावे लागते.

आजकाल पित्त आणि अॅसिडीटी ही अगदी लहानांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत अगदी कोणाला देखील होताना दिसते आहे. आपल्या कामामुळे तसेच बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि वेळा तसेच मानसिक ताणताणावात होत असलेली वाढ, मसाला युक्त पदार्थांचे, तेलकट पदार्थांचे, फास्ट फूड यांचे सेवन करण्याकडे वाढत चाललेली लोकांची प्रवृत्ती, मोबाइलमुळे झोपेच्या बदललेल्या वेळा यामुळे पित्ताचे विकार होण्याचे प्रमाण देखील वाढले आहेत. पित्त झाले की, आपली पूर्ण प्रकृतीच खराब होते आणि दिनचर्या देखील बदलते. त्यामुळे पित्त लक्षणे ओळखणे आणि पित्त झाल्यावर घरगुती उपाय करणे गरजेचेच आहे.

पित्त झाल्यावर घरगुती उपाय / पित्त उसळणे घरगुती उपाय / पित्त लक्षणे मराठी / pitt upay in marathi

आपण पाहतोय की, पित्तावर आजकाल बाजारात अनेक प्रकाराच्या औषध-गोळ्या या उपलब्ध आहेत. त्यांच्या जाहिराती या देखील मोठ्या प्रमाणावर केल्या जातात हे आपण पाहतोच आहोत परंतु : वारंवार पित्त होत असल्यास गोळ्या घेणे एकंदर प्रकृतीच्या दृष्टीने अजिबात चांगले नसते. त्यामुळे जर पित्ताचा त्रास होत असेल तर, घरच्याघरी काही रोजच्या वापरातले पदार्थ वापरून ही त्यावर नियंत्रण मिळविता येते. आपल्या पर्यंत ही माहिती पोहचविण्यासाठीच आम्ही हा लेख घेऊन येत आहोत ज्यामुळे आपल्याला पित्त लक्षणे लक्षात आली तर लगेचच त्यावर उपाय करता येतील, याचसाठी ” पित्त झाल्यावर घरगुती उपाय / पित्त उसळणे घरगुती उपाय / pitt upay in marathi / पित्त लक्षणे मराठी ” हा लेख घेऊन येत आहोत. चला तर मग पित्तावर घरच्या घरी करता येणारे उपाय कोणते आहेत ते पाहूया …..

पित्त लक्षणे मराठी

आपल्याला बर्‍याच वेळेस पित्त झालेले लक्षात येत नाही आणि मग पित्त उसळले की अतिशय त्रास होतो, त्यामुळे सुरूवातीलाच जर आपल्या लक्षात आले की, पित्त झाले आहे तर आपला नंतर होणारा बराच त्रास हा कमी होऊ शकतो याच साठी आपण पाहूया की, पित्त लक्षणे काय आहेत मराठी मध्ये –

 • सतत मळमळ झाल्यासारखे वाटणे.
 • राहून राहून डोके दुखणे.
 • पोटाच्या वर आणि छातीच्या खाली दुखणे.
 • डोके जड पडणे , चक्कर आल्यासारखी वाटणे.
 • अन्न खाण्याची इच्छा न होणे , खालेले अन्न न पचणे, उलट्या होणे.
 • छातीत जळजळ होणे, खूप उचक्या येणे. वरील सर्व पित्त लक्षणे मराठी, आपल्याला जाणवल्यास आपण त्यावर घरगुती उपाय करावेत त्याने आपल्याला त्रास होणार नाही.

पित्त झाल्यावर घरगुती उपाय / पित्त उसळणे घरगुती उपाय / pitt upay in marathi

आपल्याला जर पित्त झाले असेल तर आपण आमच्या या लेखातील आम्ही सांगितलेले खालील घरगुती उपाय करावेत या उपायाने तुमचा त्रास नक्कीच कमी होईल;

पिकलेली केळी खाणे

केळी - घरगुती उपाय
केळी

आपल्याला पित्त जर झाले असेल तर, आपण काही खाण्याच्या आधी पिकलेले केळ खावे. पिकलेली केली अनाशेपोटी खाल्याने पोटाला आणि छातीत जळजळ होत असेल तर त्याला आराम मिळतो. केळीमधील पोटॅशियम हे विषहारक म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी करण्यास हे अतिशय मदत करते. त्यामुळे पिकलेली केळी खाणे, हा पित्त झाल्यावर घरगुती उपाय हमखास उपयोगी येतो.

बडीशेप :- पित्त झाल्यावर घरगुती उपाय

पित्त झाल्यावर घरगुती उपाय / पित्त उसळणे घरगुती उपाय / पित्त लक्षणे मराठी / pitt upay in marathi
बडीशेप

बडीशेपमध्ये असणारे एन्टी अल्सर घटक हे पचनक्रिया सुधारण्यास अतिशय मदत करतात. बडीशेपमुळे पोटात थंडावा निर्माण होतो व पोटातील जळजळ कमी होते. बडीशेप चे काही दाणे केवळ चघळून खाल्ल्याणे पित्ताची लक्षणे कमी होण्यास फायदा होतो. तसेच पित्तामुळे जर अस्वस्थ वाटत असेल तर बडीशेपचे दाणे पाण्यात उकळून थंड करून ते पाणी प्यायल्याने ही पित्तापासून आराम मिळतो.

दूध :-पित्त उसळणे उपाय

पित्त झाल्यावर घरगुती उपाय / पित्त उसळणे घरगुती उपाय / पित्त लक्षणे मराठी / pitt upay in marathi
दूध आणि साजूक तूप

दूध हे पित्तशामक असते. दूध थंड करून त्यात साखर किंवा इतर कोणतेही पदार्थ न मिसळता प्यावे. मात्र दूधामध्ये चमचा भर तूप घातल्यास ते फायदेशीर ठरते. थंड दूध प्यायल्याने पित्तामुळे पोटात व छातीत होणारी जळजळ कमी होते. त्यामुळे पित्त झाले असेन तर एक ग्लास दूध फ्रीज मध्ये ठेवावे आणि साखर टाकून थंड दूध प्यावे, याने पित्त कमी होते, तसेच उसळलेले पित्त शांत होते॰

लवंग : पित्त झाल्यावर घरगुती उपाय

पित्त झाल्यावर घरगुती उपाय / पित्त उसळणे घरगुती उपाय / पित्त लक्षणे मराठी / pitt upay in marathi
तुळशी,लवंग,वेलची आणि अद्रक काढा

लवंग ही चवीला तिखट जरी असली तरीही  लवंग तोंडातील अतिरिक्त लाळ खेचून घेते व पचन सुधारते, तसेच पित्ताची लक्षणंही दूर करते. पित्त झाल्यास लवंग तोंडात ठेवली तर, उलटी होण्याची शक्यता देखील नाहीशी होते.लवंगामुळे गॅस व पोटफुगी सारखे विकार दूर होण्यास देखील बराच फायदा होतो आणि पित्ताची समस्या ही दूर होते.जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा. त्यामधून येणारा रस तसाच तोंडात राहू द्या. या रसामुळेच पित्ताची तिव्रता कमी होते.

तुळशी

जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा. यामुळेही पित्ताचा त्रास कमी होतो. तुळशी पाणे , विलायची , लवंग आणि साखर टाकून त्याचा काढा जरी घेतला तरी आपला पित्त चा त्रास बराच कामी होईल. तुळशी चा चहा किंवा काढा हा पित्त शामक म्हणून ओळखला जातो, त्यामुळे डोकेदुखी किंवा पित्त यासाठी

वेलची

आयुर्वेदानुसार वेलची म्हणजेच वेलदोडे शरीरातील वात, पित्त व कफ यांमध्ये समतोल राखण्यास मदत करते. औषधी गुणांणी परीपूर्ण असलेल्या वेलची च्या सेवनामुळे पचन सुधारते व पित्ताचा त्रास कमी होतो. वेलची ही अगदी पूर्वीच्या काळापासून च पित्त साठी घरगुती उपाय म्हणून वापरली जाते.पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून ते पाण्यात टाकून उकळून हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून त्वरीत आराम मिळेल.

पुदिना

पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करण्यास मदत करते. पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधरते व त्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व छातीत होणारी जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होत असेल तर आपण पुदिन्याची काही पाने घ्या व पाण्यासोबत ती उकळा, आता थंड झाल्यावर हे पुदिण्याचे पाणी प्या. असे केल्याने आपले पित्त उसळले असेल तर आपल्याला आराम मिळतो.

आलं : पित्त उसळणे घरगुती उपाय

भारतीय स्वयंपाकघरात आलं या औषधी मुळाचा प्रामुख्याणे वापर केला जातो. पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो व त्याच्या सेवनामुळे पचन ही सुधारते. आल्यामधील पाचकरसांमुळे व तिखटपणमुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा छोटा तुकडा चघळत रहा. जर आलं तुम्हाला तिखट वाटत असेल तर तुम्ही आलं चेचून पाण्यात उकळून ही पिवू शकता. किंवा त्यासोबत गूळ ही खावू शकता.

आवळा

पित्त झाल्यावर घरगुती उपाय / पित्त उसळणे घरगुती उपाय / पित्त लक्षणे मराठी / pitt upay in marathi - आवळा पावडर
आवळा पावडर

आंबट व तुरट चवीचा आवळा पित्तनाशक असून त्यामधील ‘व्हिटॅमिन सी’ हे आपले पोट व अन्ननलिका दोन्ही स्वच्छ ठेवण्यास मदत करत असते. आपल्याला जर सतत पित्त होत असेल तर, पित्त उसळत असेल तर, पित्त उसळणे घरगुती उपाय म्हणून हे करा – रोज एक चमचाभर आवळा पावडर किंवा आवळा चुर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास पुर्णपणे कमी होतो.

ओवा

पित्त झाल्यावर घरगुती उपाय / पित्त उसळणे घरगुती उपाय / पित्त लक्षणे मराठी / pitt upay in marathi
ओवा

ओवा शरीराची पचनशक्ती वाढवण्यास मदत करतो, त्यामुळे अधिक खाल्लेलं अन्न पचन्यास व पित्त नाहीसं होण्यास मदत होते. रोज एक चमचा ओवा किंवा ओव्याचे पाणी प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होतो.

पित्त किंवा अ‍ॅसिडीटीचा त्रास जर होत असेल तर खालील गोष्टी नक्की करून पहा.

पित्त किंवा जळजळ होत असेल तर खालील गोष्टी नक्की करून पहा त्याचा तुम्हाला बराच फायदा होईल.

 • काहीही खाल्यानंतर थोडासा गूळ खा.
 • सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास कोमट पाणी प्या.
 • जेवणानंतर लवंग चघळा.
 • सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने स्वच्छ धवून चघळा.
 • जेवणानंतर अर्धा चमचा बडीशोप खा.
 • दुधात मनुका उकळून ते दूध ठंड करून प्या.
 • पित्तामुळे जर उलट्या होत असतील तर दूध आणि घरातील फ्रिजमध्ये तयार केलेला चांगल्या पाण्याचा बर्फ एकत्र करून पिल्याने उलट्या कमी होतात.

वरील सर्व उपाय नक्की घरी करून पहा तुम्हाला फरक नक्की दिसून येइल.

सारांश – पित्त झाल्यावर घरगुती उपाय /पित्त उसळणे घरगुती उपाय /pitt upay in marathi / पित्त लक्षणे मराठी

आपल्याला जर सतत पित्त होण्याची समस्या होत असेल किंवा पित्त झाले असेल, पित्त उसळले असेल तर आपण आमच्या आजच्या, ” पित्त झाल्यावर घरगुती उपाय / पित्त उसळणे घरगुती उपाय/ पित्त लक्षणे मराठी ” या लेखात आम्ही सांगितलेले उपाय करावेत, याने आपल्याला बराच आराम मिळेन आणि आपला त्रास कमी होईल.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले , पित्त झाल्यावर घरगुती उपाय/पित्त लक्षणे मराठी/ (pitt upay in marathi) हे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top