मांडी दुखणे उपाय | मांडी दुखीवर करा हे सर्वोत्तम उपाय

मांडी दुखणे उपाय | मांडी दुखीवर उपाय (mandi dukhane upay in marathi) >> हल्लीच्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला काहीना काही अडचणीचा म्हणा किंवा आजाराचा त्रास सहन करावा लागतो. अशाच काही आजारांमधील एक म्हणजे ‘‘मांडी दुखणे‘‘. कामाचा ताण पडला, जास्त वेळ उभे रहावे लागले किंवा जास्त चालण्यात आले, तर बर्‍याच जणांना मांडया दुखण्याचा त्रास होतो. विशेष करून महिला वर्गाची सर्वात जास्त तक्रार असते की, मांडी दुखत आहे. तर हे ‘ मांडी दुखणे‘ म्हणजे नेमके काय? आणि त्याचा त्रास असतो तरी काय? हे आपण सर्वप्रथम जाणुन घेवुया.

मांडी दुखणे हा म्हणायला छोटासा, पण हा त्रास सहन करणार्‍या व्यक्तीसाठी वेदनादायक आणि त्रासदायक ठरत असतो. आपल्या मांडयामध्ये जे स्नायु, ग्रंथी असतात, आणि मांडी दुखायला लागल्यावर त्या तटस्थ किंवा अगदी आखडल्यासारख्या वाटतात. दोन्ही मांडयामध्ये गोळे आल्यासारखे वाटणे, अगदी पाय उचलण्यासाठी देखील कष्ट करावे लागत आहेत असे वाटते. म्हणजे मांडी दुखी, मांडी दुखण्याचा दार्शनिक किंवा फार गंभीर असा परिणाम नसतो, पंरतु हा सतत अत्यंत त्रासदायक वाटणारा आजार आहे. जास्त वजन असणार्‍या व्यक्तीसाठी मात्र हा मांडी दुखणे प्रकार अगदी भस्सासुरा सारखा वाटतो.

मांडी दुखणे उपाय | मांडी दुखीवर करा हे सर्वोत्तम उपाय (mandi dukhane upay in marathi)

प्रत्येकवेळी डॉक्टरांकडे जाणे सर्वांना शक्य नसते. त्यासाठीच आम्ही या लेखात ‘‘मांडी दुखणे‘‘ या समस्येंवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. जेणेकरून मांडी दुखीचा त्रास पुर्णपणे नाहीसा नाही झाला तरी बर्‍याच अंशी नक्कीच कमी होईल. घरगुती उपचार किंवा व्यायाम करणे तसेच आपल्या आहारात कॅल्शियम युक्त घटकांचा समावेश करणे आणि आपल्या मांडीत/ पायात कुठे गाढ तर झाली नाही ना, याची योग्य वेळीच शहानिशा करणे आवश्यक आहे.

चला तर मग जाणून घेऊयात मांडी दुखणे उपाय काय आहेत आणि ते कसे करावे त्याची माहिती.

नियमित पणे सपाट जागीच फिरावे

मांडी दुखणे उपाय | मांडी दुखीवर उपाय (mandi dukhane upay in marathi)
सपाट जागी फिरणे – मांडी दुखणे उपाय | मांडी दुखीवर उपाय (mandi dukhane upay in marathi)

बर्‍याच वेळेस स्नायुंच्या आखडण्यांमुळे किंवा ग्रंथी आखडल्यामुळे देखील मांडया जड होतात आणि सध्याची जीवनशैली पाहता आपल्याला बैठे आणि आरामदायीच कामे आहेत. शरीरातील स्नायु मोकळे राहण्यासाठी व्यायाम असावा, परंतु सुखसुविधा यांच्या प्रभावामुळे शरीरास व्यायाम होईल अशी कामे केली जात नाहीत. त्यामुळे रोज एक तास तरी चांगला सपाट रस्ता, किंवा मैदान असलेल्या ठिकाणी फिरायला जावे. त्यामुळे कंबरेपासुन ज्या मांडी, गुडघे, पिंडर्‍या आणि पायांपर्यत रक्तवाहीन्या असतात तसेच जे स्नायु असतात ते मोकळे राहतात आणि मांडी दुखीचा त्रास कमी होतो. असे नियमित पणे रोज सकाळी फिरायला गेल्याने साधारण महिन्याभरात तुम्हाला मांडी दुखी पासून निच्छित आराम मिळेल.

गरम पाण्याने मांडी शेकावी- मांडी दुखणे गुणकारी उपाय

गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे - मांडी दुखणे उपाय | मांडी दुखीवर उपाय (mandi dukhane upay in marathi)
मांडी दुखणे उपाय (mandi dukhane upay in marathi)

पुष्कळ वेळेस आकसलेल्या स्नायुंना, रक्तवाहीन्यांना उत्तेजित करण्यासाठी सुज आलेल्या जागी सुज कमी करण्यासाठी गरम पाण्यानी शेकले तर बर्‍यापैकी आराम जाणवतो. सुज असेल तर सुज देखील कमी होते, त्यासाठी मस्कुल्यर पेन जर असेल तर रिकाम्यापाणी बॉटल मध्ये गरम पाणी टाकुन ती बाटली मांडीवर फिरवावी. त्याने देखील भरपुर प्रमाणात आराम मिळेल. बर्फाने किंवा गरम पाण्याने शेकल्यास सुज देेखील कमी होते. सतत जर तुम्हाला मांडी दुखणे चा त्रास होत असेन तर तुम्ही गरम पाण्याची उशी घेऊन त्याने मांडी शेकली तरी तुम्हाला मांडी दुखणे पासून नक्कीच आराम मिळेल. ही उशी तुम्हाला पाठ, मन, कंबर, पाय आणि मांडी शेकायला नक्कीच उपयोगी पडते त्यामुळे अशी उशी तुमच्या घरात आणुनच ठेवा.

वजन नियंत्रणात ठेवावे

वजन नियंत्रणात ठेवावे - मांडी दुखणे उपाय | मांडी दुखीवर उपाय (mandi dukhane upay in marathi)
व्यायामाने वजन नियंत्रणात ठेवावे – मांडी दुखीवर उपाय (mandi dukhane upay in marathi)

आपल्या उंचीपेक्षा जास्त वजन असल्यास त्याने देखील पायांवर आणि पर्यायाने मांडी वर ताण येतो आणि मग मांडी दुखण्याचा त्रास होतो. त्यामुळे तुमचे वजन योग्य प्रमाणात असणे जास्त महत्त्वाचे असते. वजन जर आवाक्याच्या बाहेर गेले तर आपण अनेक आजारांना आपल्या शरीरात आमंत्रण देत असतो. त्यासाठी निरोगी, सदृढ, सशक्त शरीर हवे असेल तर आपल्या वजनावर आपले नियंत्रण असावे. अवाढव्य जास्त वजन असल्यास त्याचा ताण पाय आणि मांडयावरच पडत असतो, आणि त्यामुळे शरीराचा अतिरिक्त भार वाढल्याने मांडी दुखणे हा त्रास सुरू होतो. म्हणुन सुरूवातीपासुन संतुलित वजन राहील असाच सकस आहार घ्यावा.तुमचे जर वजन आधीच जास्त असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करणे गरजेचे आहेच आणि त्या बरोबर सकाळी फिरायला गेल्यास वजन नियंत्रणात येण्यास नक्कीच मदत होते.

योग्य आकाराची पादत्राणे वापरावीत

योग्य आकाराची पादत्राणे वापरा - मांडी दुखणे उपाय | मांडी दुखीवर उपाय (mandi dukhane upay in marathi)
योग्य आकाराची पादत्राणे वापरा – मांडी दुखणे उपाय (mandi dukhane upay in marathi)

आजच्या काळात लहानांपासुन ते मोठयांपर्यंत उंच टाचाच्या सॅंडल चे फॅड च निघाले आहे. पण सावधान ! जर तुम्ही उंच टाचांच्या चप्पल / सॅडल्स वापरत असाल तर, तुम्हाला पाय दुखणे, मांडया दुखणे, कंबरेचा भाग मोठा होणे, यांसारख्या समस्यांना तोंड दयावे लागणार आहे. जर तुम्हांला मांडी दुखणे ही समस्या भेडसावत असेल तर, तुम्ही उंच टाचांची चप्पल वापरने त्वरीत बंद करावे, व साधारण एक ते दोन इंच एवढीच उंच चप्पल वापरावी. साधारणपणे महिलांमध्ये ऊंच टाचांची चप्पल किंवा सॅडल्स वापरण्याची क्रेज असते त्यामुळे महिलांमध्येच मांडी दुखणे यांसारखे आजार दिसून येतात.

आहार हा कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा असावा – मांडी दुखणे उत्तम उपाय

कॅल्शिअम हे आपल्या शरीरात अतिशय आवश्यक असते. पायदुखी, मांडीदुखी, दातदुखी, नखे न वाढणे, केस गळणे या सगळयांसाठी उपाय म्हणजे कॅल्शिअम चे पदार्थ जास्तीत जास्त सेवन करणे, कॅल्शिअम आणि आयर्न लोह ची कमतरता असेल तर निश्चितच मांडया पाय दुखते ही समस्या सतावते. त्यामुळे तुमचा आहार हा कॅल्शिअम युक्त असावा याची तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे.

अस्थिरोग तज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा

आपल्या रोजच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो; परंतु कधी कधी आपली ही सवय आपल्या अंगलट येवु शकते. आपल्या पायात, मांडीत सतत दुखत असेल आणि खुप तीव्र वेदना जाणवत असतील, तर आवश्य अस्थिरोग तंज्ञाचा सल्ला घ्यावा. तसेच त्यांनी सांगितलेल्या चाचण्या किंवा इतर परिक्षण करून घ्यावे. एखाद्या वेळी दुखणे वेगळे आणि काही घरगुती उपाय करून देखील सतत दुखणे वेगळे त्यामुळे अस्थिरोग तज्ञांचा सल्ला घेणे कधीही चांगले.

मांडीचा एक्स-रे किंवा सिटी स्कॅन करा

मांडीचा एक्स रे काढणे - मांडी दुखणे उपाय | मांडी दुखीवर उपाय (mandi dukhane upay in marathi)
mandi dukhane upay in marathi

पुष्कळ वेळेस आपल्या शरीराच्या आतील, म्हणजे अंतर्गत भागात असलेली जखम आपल्या लक्षात येत नाही. जेव्हा त्यांचे गंभीर परिणाम जाणवायला लागतात, तेव्हा आपण पुढील तपासणीला सुरूवात करतो. अस्थिरोग तज्ञांच्या मते, नसवर नस आली, हाडाला मार लागला, मांडीच्या आतील रक्तवाहिन्यांची गती किंवा आकार कमी-जास्त झाला तर त्याचे निदान हे एक्स रे म्हणजेच क्ष-किरण चाचणीद्धारे किंवा सिटी स्कॅन द्धारेच लक्षात येते. त्यामुळे जर मांडीचे दुखणे जास्त प्रमाणात वाढले तर लगेचच डाॅक्टरांच्या सल्ल्याने या प्रकारच्या चाचण्या कराव्यात.

सारांश – मांडी दुखणे उपाय (mandi dukhane upay in marathi)

आपल्याला जर मांडी दुखणे त्रास होत असेन तर वरील मांडी दुखणे उपाय तुम्ही करून बघू शकता, आणि जर त्रास हा खूपच जास्त असेल तर अस्थिरोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. वरील उपाय केल्याने तुमचा मांडी दुखणे त्रास निश्चितच कमी होईल व आपले शरीर सदृढ, निरोगी आणि स्वस्थ राहील.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले मांडी दुखणे उपाय कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top