जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय | कारणे – Best 13 remedies

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय/ जुलाब होण्याची कारणे/ जुलाब होत असल्यास काय खावे/ लहान मुलांचे जुलाब उपाय/ julab gharguti upay >>> जुलाब झाल्यास होणारा अशक्तपणा हा अतिशय त्रास देणारा ठरू शकतो, कारण जुलाब होत असल्यास त्याद्वारे आपल्या शरीरातील पाणी देखील कमी होते. हा आजार लहान मुलांना जास्त प्रमाणात होऊ शकतो, अति जास्त प्रमाणात जुलाब झाल्यास त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो, कारण जुलाब होण्याचे मुख्य कारण हात न धुता काहीपण खाणे, अस्वच्छता आणि हे सर्व प्रकार लहान मुलांच्या बाबतीत जास्त घडत असतात.

लहान मुलांप्रमाणेच काही वेळेस दूषित अन्न, पाणी, शारीरिक अस्वच्छता, पोटाच्या आतड्यात जंतुची लागण झाल्यास आपल्याला देखील होऊ शकतात, जुलाब म्हणजे गस्ट्रेइंटेस्टाईनल हे संक्रमण झाले असल्याच एक लक्षण आहे. यालाच अतिसार असे देखील म्हणतात. हे जुलाब होण्याचे कारण म्हणजे म्हणजे आपल्या शरीरात जिवाणू, विषाणू किंवा मग इतर परजीवी अमिबा यांचे संक्रमण होणे होय.

जुलाब झाल्यास पोटात देखील अतिशय वेदना होत असतात तसेच, पोटातील आतड्यांवर तान जाणवतो, पोत फुगल्या सारखे वाटते, तहान जास्त लागते कारण जुलाब द्वारे जास्त पाणी शरीराबाहेर पडते, मळमळ होते आणि जास्त दिवस हा त्रास झाला तर वजन देखील कमी होते. या आजाराचे गंभी लक्षण म्हणजे सतत उल्टि येणे, सतत शौच येणे, पाणी देखील न पचणे हे आहे. त्यामुळे यावर गंभीर लक्षणे सुरू होण्याधीच त्वरित काही घरगुती उपचार करावेत, हे उपाय करून आपण सुरूवातीस जुलाब नियंत्रणात आणू शकतो.  

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय/ जुलाब होण्याची कारणे/ जुलाब होत असल्यास काय खावे/ लहान मुलांचे जुलाब उपाय/ julab gharguti upay
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय

Table of Contents

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय –

सतत जुलाब होत असतील तर थांबवणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण जास्त जुलाब आणि उलट्या झाल्या तर शरीरातील पाणी कमी होऊ शकते आणि अत्यंत घातक आहे. पाणी कमी झाल्यास रुग्ण बेशुद्ध पडू शकतो, खूप अशक्त होऊ शकतो किंबहुना त्याच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो. त्यामुळे जुलाब बंद होण्यासाठी ताबडतोब उपाय करणे गरजेचे आहे.

ओआरएस इलेक्ट्राल पाणी देणे – जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय

सतत उलट्या आणि शौच झाल्याने शरीरातील पाणी कमी होते, सोडीयम, पोटॅशियम आणि क्षार यांचे प्रमाण देखील कमी होते, या सर्व कारणामुळे डिहायड्रेशन होऊ शकते आणि त्यामुळे चक्कर, बेशुद्ध पडणे, अतिशय अशक्तपणा वाटणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात यासाठी कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये ओआरएस चे पॅक मिळते ते घ्यावे, याने शरीराला सोडीयम आणि पोटॅशियम मिळते आणि होणारी झीज भरून निघण्यास मदत होते. तसेच जुलाब होणे देखील बंद होते.

कोमट पाणी, मीठ आणि साखर –

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय/ जुलाब होण्याची कारणे/ जुलाब होत असल्यास काय खावे/ लहान मुलांचे जुलाब उपाय/ julab gharguti upay
कोमट पाणी आणि साखर – जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय

कोमट पाणी केल्याने, पाण्यात चुकून जरी कोणते जंतु असतील तर ते नष्ट होतात. कोमट करून थंड केलेले एक लीटर पाणी घ्यावे आणि त्यात सहा चमचे साखर टाकावी व अर्धा चमचा मीठ टाकावे, याचे पूर्ण मिश्रण तयार करून ठेवावे आणि जेंव्हा जुलाब किंवा उलट्या होतील त्या नंतर रुग्णास पिण्यास द्यावे, याने पाणी आणि ग्लुकोज भरून निघण्यास मदत होईल.

आल्याचा रस आणि लिंबू रस व मिरे पावडर-

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय/ जुलाब होण्याची कारणे/ जुलाब होत असल्यास काय खावे/ लहान मुलांचे जुलाब उपाय/ julab gharguti upay
अद्रक, लिंबू रस- julab gharguti upay

आल्याचा रस आणि लिंबू रस व मिरे पावडर हे जुलाब बंद करण्यासाठी आणि झालेली हानी भरून काढण्यासाठी प्रभावीपणे काम करते. एक ग्लास पाणी, आणि त्यात दोन चमचे अद्रकचा रस व एक चमचा लिंबू रस, दोन चिमुट मिरे पावडर टाकावी आणि आवडी नुसार साखर टाकून हे मिश्रण ढवळून जुलाब झालेल्या व्यक्तीस पिण्यास द्यावे. अद्रक आणि लिंबू हे शरीरारील सर्व बॅक्टेरियल इन्फेक्शन दूर करण्यास मदत करते.

मेथीचे दाणे –

मेथी दाणे देखील जुलाब बंद होण्यासाठी अनुकूल काम करतात. त्यामुळे मेथी दाणे चा जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय म्हणून जास्त प्रमाणात वापर केला जातो. त्यासाठी दोन चमचे मेथी दाणे घ्यावे आणि जवळपास एक ग्लासभर पाण्यात भिजत ठेवावे, त्यानंतर हे भिजेलले दाणे आणि ते पाणी गरम करून कोमट झाल्यावर गाळून प्यावे, तुम्हाला वाटल्यास त्यात साखर देखील टाकू शकता. ह्या उपायाने जुलाब पातळ होणे बंद होते.

जिरे – जुलाब बंद होण्यासाठी उपाय

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय/ जुलाब होण्याची कारणे/ जुलाब होत असल्यास काय खावे/ लहान मुलांचे जुलाब उपाय/ julab gharguti upay
जिरे- जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय

मेथी दाणे प्रमाणेच जिरे देखील जुलाब बंद होण्यास मदत करतात, त्यासाठी जिरे पाण्यात भिजत घालावे आणि मग पाणी गरम करून नंतर कोमट किंवा थंड झाल्यावर थोड्या-थोड्या वेळाला प्यावे, याने पोटदुखी देखील कमी होते आणि पातळ शौच्यास होणे देखील थांबते. अशा प्रकारे वरील सर्व घरगुती उपाय करून तुम्ही जुलाब होणे बंद करू शकतात.

दही – जुलाब होत असल्यास काय खावे

जुलाब होत असल्यास दही खावे कारण दही मध्ये मूलतःच लॅक्टिक अॅसिड असते, जे जुलाब चे बॅक्टेरिया शरीरातून संपवण्याचे काम करतात. त्यामुळे जुलाब होत असल्यास सौम्य आहार घेतल्यानंतर दही साखर खावे, त्यामुळे परत परत जुलाब होणे बंद होते.

जुलाब होत असल्यास काय खावे-

जुलाब होत असल्यास आपल्या आहारात आणि शरीरात ग्रहण करावयाच्या पदार्थांचा विचार करूनच समावेश करावा लागतो, नाही तर जुलाब होण्याचा त्रास जास्त वाढू शकतो त्यामुळे बर्‍याच जणांना प्रश्न पडतो की, जुलाब होत असल्यास काय खावे म्हणजे जुलाब मुळे झालेली शरीराची हानी भरून निघेण, तर त्यासाठी या लेखातील खालील माहिती उपयोगी पडेल.

  1. भातावरची पेज खावी
  2. पचनास हलका आहार घेणे
  3. वरणभात, मुगाची खिचडी खावी
  4. दही साखर खावे
  5. तळलेले, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये
  6. मांसाहार घेऊ नये
  7. फळे खावी
  8. उन्हाळ्यात जुलाब झाल्यास आंबा फणस खावू नये
  9. जुलाब होत असल्यास नाचणीचे किंवा ज्वारीच्या पीठाचे आंबील खावे

साधारण पणे, वरील सर्व पदार्थ हे तुम्हाला जुलाब होत असतील तर खावेत, कारण त्यामुळे तुमच्या शरीरातील कमी झालेली पाण्याची पातळी हे वाढेल, शरीराची झालेली झीज ही भरून निघेण आणि तुमच्या शरीराची होणारी अधिक हानी, ही रोखली जाईल. जुलाब जास्त झाल्यास त्याचा तुमच्या शरीरावर अतिशय गंभीर असा परिणाम देखील होऊ शकतो, त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, आणि तुमच्या आहारवर आणि शरीरावर होणार्‍या परिणाम वर नक्कीच लक्ष द्यावे.

लहान मुलांना देखील जुलाब होण्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते, त्यासाठी याविषयी ची माहिती देखील तुम्हाला असणे हे, अतिशय गरजेचे आहे. लहान मुलांना खाण्या – पिण्याच्या अयोग्य आणि अस्वच्छ राहणीमान याच्या सवयी असल्यास अशा मुलांना सतत जुलाब होण्याची शक्यता असते, तर अशा वेळेस त्यांना काय दिले पाहिजे, त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे आणि जुलाब बंद होण्यासाठी कोणते घरगुती उपाय केले पाहिजेत, याची संपूर्ण माहिती आपण खालील लेखात बघूया-

लहान मुलांचे जुलाब उपाय-

लहान मुलांना जुलाब उलट्या होण्याचे प्रमाण हे जास्त असते, कारण लहान मुले खाली पडलेल्या कोणत्याही वस्तु न धुता तोंडात घालतात, हात स्वच्छ न धुता काहीही खातात आणि त्यामुळे जुलाब होतात, अशा वेळी जुलाब झाल्यास त्यांना वरील पदार्थ खाण्यासाठी द्यावे, तसेच खालील उपाय करावेत.

पातळ पदार्थ देणे- लहान मुलांचे जुलाब उपाय

लहान मुलांना जुलाब लागल्यास त्यांना घट्ट किंवा कडक पदार्थ हे खाऊ घालू नये, कारण असे पदार्थ पचनास जड जातात, त्यामुळे सहसा जुलाब होत असल्यास पातळ लिक्विड पदार्थच खाण्यास द्यावे.

पेज , आंबिल , ताक देणे- लहान मुलांचे जुलाब उपाय

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय/ जुलाब होण्याची कारणे/ जुलाब होत असल्यास काय खावे/ लहान मुलांचे जुलाब उपाय/ julab gharguti upay
पेज/ आंबिल/ ताक – लहान मुलांचे जुलाब उपाय

लहान मुलांना जुलाब होत असल्यास पोळी भाजी एवजी, भातावरची पेज द्यावी किंवा थोड्या दही मध्ये थोडे ज्वारीचे किंवा तांदळाचे पीठ टाकून त्याचे आंबिल करून खाऊ घालावे, त्यामुळे त्यांना पोटाला हलके आणि पचण्यास सोपे असे आंबिल, पेज खाण्यास द्यावी.

दूध पिणारे बाळ असेल, आईने जास्त पाणी प्यावे-

जर जुलाब होणारे बाळ आईचे दूध पिणारे म्हणजे एक दीड वर्षाचे असेल तर आईने उष्ण, गरम आणि मसालेदार पदार्थ न खाता, जास्त प्रमाणात पाणी प्यावे यामुळे बाळाच्या शरीरात देखील पाणी जाते, आणि जुलाब मुळे झालेली झीज भरून निघण्यास मदत होते.

पाणी, साखर आणि मीठ-

जुलाब होत असल्यास पाणी , मीठ आणि साखर दिल्यास ती अमृत संजीवनी प्रमाणे काम करते, कारण मीठ साखर आणि पाणी हे जुलाब मुळे शरीरातून गेलेल्या पाणी आणि इतर घटकांची पूर्तता करण्यास मदत करते, त्यामुळे लहान मुलांना जुलाब होत असल्यास, मीठ साखर मिसळून पाणी पाजावे.

लाहया – जुलाब होत असल्यास काय खावे

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय/ जुलाब होण्याची कारणे/ जुलाब होत असल्यास काय खावे/ लहान मुलांचे जुलाब उपाय/ julab gharguti upay
लाहया – जुलाब होत असल्यास काय खावे

लाहया आणि लाहया भिजवलेले पाणी, हे जुलाब वर अत्यंत फायदेशीर असते. त्यासाठी एका ग्लास मध्ये थोड्या ज्वारीच्या लाहया हया भिजत घालाव्या आणि नंतर एक दोन तासांनी त्या लाहया काढून घ्याव्या आणि ते पाणी पिण्यास द्यावे.

पिष्टमय पदार्थ(बटाटा) आणि भात-

जुलाब होत असल्यास पिष्टमय पदार्थ शरीराची हानी भरून काढण्यास मदत करतात त्यामुळे असे पदार्थ जुलाब झाल्यास खावे. बटाट्यात भरपूर पिष्टमय घटक असतात, भात किंवा बटाटा कुस्करून त्यात जिरे पावडर आणि मीठ टाकावे.

आरारूट पावडर –

आरारूट पावडर ही लहान मुलांच्या जुलाब वर उत्तम उपाय म्हणून आधीच्या काळापासून वापरली जाते. ही जलपातळी वाढवण्यास मदत करते तसेच पिष्टमय पदार्थणे परिपूर्ण असतात. आरारूट पावडर मध्ये पाणी अथवा दही मध्ये मिसळून लापशी करावी व ती बाळास द्यावी.

जुलाब होण्याची कारणे-

जुलाब हे सहसा आतडयात जंतूची लागण झाल्यास होतात. जुलाब या रोगाचे जंतु शरीरात गेल्याने हा आजार होतो. जुलाब सहसा काही विशेष कारणामुळे होत असतात, म्हणजेच तुमच्या पोटात काही अयोग्य घटक खाण्यातून किंवा काही अस्वच्छ खाण्यात आल्यास होत असतात, त्यामुळे हे जुलाब होण्याचे नेमके कारणे कोणते कोणते आहेत, हे तुम्हाला समजणे अतिशय आवश्यक आहे. तसहसा खालील कारणाने जुलाब होतात.

अस्वच्छ पाणी- जुलाब होण्याची कारणे

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय/ जुलाब होण्याची कारणे/ जुलाब होत असल्यास काय खावे/ लहान मुलांचे जुलाब उपाय/ julab gharguti upay
अस्वच्छ पाणी – जुलाब होण्याची कारणे

सहसा प्राणी किंवा मानवी विष्ठा पाण्यात मिसळली गेली तर ते पाणी दूषित होते, आणि त्यातील जंतु जिवाणू आणि मानवी शरीर यांचा संबंध आला तर जुलाब होतात. त्यामुळे विहीर, नदी, यातील पाणी अस्वच्छ होते आणि ते देखील या आजाराचे कारण बनू शकते.

दूषित अन्न- जुलाब होण्याची कारणे

दूषित अन्न म्हणजे उघड्यावरचे अन्न खाल्ल्याने हा आजार होऊ शकतो, कारण इरत्र उघड्यावरच्या शौच वर माशा बसून त्याच उघड्या अन्नावर देखील बसतात आणि त्यातून या जुलाब ची लागण होऊन आपल्याला संडास उलट्या होऊ शकतात. त्यामुळे दूषित अन्न हे देखील जुलाब होण्याचे कारण ठरु शकते.

वैयक्तीक अस्वच्छता- जुलाब होण्याची कारणे

खाण्या आधी हात स्वच्छ धुणे अत्यंत आवशयक आहे. त्यामुळे शौच करून आल्यानंतर लहान बाळ असेल तर त्याची संडास साफ केल्या नंतर हात स्वच्छ धुवावे, तसेच खाली पडलेली वस्तु तसीच न धुता खाऊ नये, रोज कपडे आणि शरीर स्वच्छ ठेवावे.

सारांश – जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय/ जुलाब होण्याची कारणे/ जुलाब होत असल्यास काय खावे/ लहान मुलांचे जुलाब उपाय /julab gharguti upay

जुलाब होणे हा असा आजार आहे, जो लहान मुले किंवा मोठे व्यक्ति कुणालाही वरील ठराविक कारणामुळे होऊ शकतो, आणि या आजारामुळे शरीराची होणारी हानी देखील बरीच त्रासदायक असते, त्यामुळे यावर वेळीच उपाय करणे हिताचे ठरते, त्यामुळे, या लेखात आम्ही सांगितलेले घरगुती उपाय करावेत; परंतु अती जुलाब होत असल्यास किंवा फरक जाणवत नसल्यास डोक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले ,’ जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय / जुलाब होण्याची कारणे / लहान मुलांचे जुलाब उपाय / julab gharguti upay कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात

Scroll to Top