You are currently viewing सेंद्रिय शेती माहिती | सर्वोत्तम  5 सेंद्रिय खत निर्मिती माहिती |
सेंद्रिय शेती माहिती / सेंद्रिय शेती म्हणजे काय /  सेंद्रिय शेती फायदे/ सेंद्रिय शेती प्रकल्प महत्व / सेंद्रिय खत निर्मिती

सेंद्रिय शेती माहिती | सर्वोत्तम 5 सेंद्रिय खत निर्मिती माहिती |

सेंद्रिय शेती माहिती / सेंद्रिय शेती म्हणजे काय /  सेंद्रिय शेती फायदे/ सेंद्रिय शेती प्रकल्प महत्व / सेंद्रिय खत निर्मिती >>>> भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात पिकावला जाणारा माल म्हणजे शेतीत उगवलेले अन्न-धान्य, फळे -फुले, भाजीपाला या सर्व वस्तु देशातच नव्हे; तर विदेशात देखील भरपूर प्रमाणात मागवल्या जातात. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपल्या देशात नवनवीन तंत्रज्ञान वापरुन शेती केली जाते. हरित क्रांतीच्या आधी शेतीत केवळ शेण खत टाकूनच शेती केली जात असत; परंतु त्यानंतर वेगवेगळे खत आणि तंत्रज्ञान वापरुन शेती केली जाऊ लागली.  या खतांच्या वापरानुसार शेतीचे दोन प्रकारात विभाजन झाले, रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती. चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊया सेंद्रिय शेती याविषयी अधिक माहिती.

रासायनिक खतांचा वापर करून म्हणजे युरिया, यांसारखे खत वापरुन जी शेती केली जाते, तिला रासायनिक शेती असे म्हणतात, तर ज्या शेती प्रकारात पीक वाढवण्यासाठी केवळ, शेण खत, आणि गाई-म्हशीचे मलमूत्र, शेतातील अतिरिक्त कचरा आणि पिकांचा पाला-पाचोळा, गांडूळ खत यांसारख्या खतांचा वापर करून जी शेती केली जाते, त्या शेती प्रकारास सेंद्रिय शेती म्हणतात, अशी सेंद्रिय शेती विषयीची एक ढोबळ संकल्पना आपण सांगू शकतो.

आपल्या भारतात शेती या मुख्य व्यवसायास अनुसरून भरपूर लोक जोडधंदा म्हणून अनेक व्यवसाय करतात, जसे की रेशीम उद्योग, कुक्कुट पालनन यांसारखे अनेक व्यवसाय, याची माहीती आपण रेशीम उद्योग माहिती या लेखात पाहिलीच आहे. याद्वारे आणखी फायदा होण्यासाठी आणि जमिनीचा पोत आणि पर्यावरण चांगले राहण्यासाठी सेंद्रिय शेती करणे हे केंव्हाही फायद्याचेच ठरेल.

रासायनिक शेती केल्याने जमीनचा पोत खराब होऊ शकतो, तसेच अती रासायनिक खतांचा वापर केल्याने मानवी आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आजच्या आधुनिक काळात देखील बरेच लोक रासायनिक खत आणि बियनांचा वापर करण्याऐवजी सेंद्रिय खत, बियाणे आणि औषधे वापरुन सेंद्रिय शेती करण्यावर अधिक भर देत आहेत. या सर्व बाबींची अधिक माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी सेंद्रिय शेती माहिती, हा लेख अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. चला तर मग सुरूवातीला जाणून घेऊया की, सेंद्रिय शेती म्हणजे काय?

सेंद्रिय शेती म्हणजे काय / सेंद्रिय शेती माहिती

सेंद्रिय शेती माहिती / सेंद्रिय शेती म्हणजे काय /  सेंद्रिय शेती फायदे/ सेंद्रिय शेती प्रकल्प महत्व / सेंद्रिय खत निर्मिती
सेंद्रिय शेती माहिती

सेंद्रिय शेती ही प्रामुख्याने सेंद्रिय खत आणि बियाणे यांचा वापर करून केली जाते. या प्रकारच्या शेती मध्ये शेणखत, गांडूळ खत, हिरवळ खत, माशाचे खत, यांसारख्या खतांचा वापर केला जातो. यांसारख्या खताचा वापर करून मातीचा आरोग्य स्तर आणि उत्पादन क्षमता टिकून ठेवण्यास मदत केली जाते.

सेंद्रिय शेतीच्या तत्वांचे पालन करून, जैविक विविधतेचे पालन करणारी, शेतातील संपूर्ण स्थानिक संसाधनाचा वापर करून केली जाणारी, शेतातील नैसर्गिक आणि सेंद्रिय पदार्थांचा म्हणजे मातीत कुजलेला कचरा, प्राण्यांची विष्ठा, मलमूत्र यांचा   वापर करून, रासायनिक खत आणि बियाणाशिवाय केली जाणारी शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.

सेंद्रिय शेती करत असताना, त्यात गाई-म्हशीचे शेणखत, शेतातील कुजलेला कचर्‍यापासून कंपोस्ट खत, हिरवळीचे खत आणि गांडूळ खत यांसारख्या खताचा वापर केला जातो. सेंद्रिय शेती करत असताना जैविक कीड नियंत्रण या तत्वांचा अवलंब केला जातो.

सेंद्रिय शेती फायदे /सेंद्रिय शेती प्रकल्प महत्व

सेंद्रिय शेती माहिती / सेंद्रिय शेती म्हणजे काय /  सेंद्रिय शेती फायदे/ सेंद्रिय शेती प्रकल्प महत्व / सेंद्रिय खत निर्मिती
सेंद्रिय शेती प्रकल्प महत्व

सेंद्रिय शेती ची कल्पना आणि सेंद्रिय शेती ची पद्धती ही खरोखरच सर्व शेतकरी बांधव आणि आपले पर्यावरण यांच्या साठी एक वरदानच आहे, या प्रकारची शेती करण्याचे अनेक फायदे आहेत, जे आपल्याला याचा अवलंब केल्याने मिळू शकतात. सेंद्रिय खत निर्मिती कशी करावी आणि त्याचे फायदे कोणते आहेत याची माहिती खालील उतार्‍यात आहे.

  1. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत करते
  2. जमिनीची धूप कमी होते- सेंद्रिय शेती करत असताना जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन केले जाते, त्यामुळे पावसाचा जोर किंवा आघात जास्त असला तरी देखील त्यामुळे पाला पाचोळा आणि कचरा यांचे आच्छादन असल्याने  जमिनीची धूप कमी प्रमाणात होते. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता हळू-हळू जमिनीच्या खालच्या थरापर्यंत पोहचते.
  3. जमिनीची सच्छीद्रता वाढण्यास मदत – सेंद्रिय शेती करत असताना आपण रासायनिक खते न वापरता जे सेंद्रिय खत वापरतो त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि जमीन दीर्घकाळ पर्यंत अगदी भुसभुशीत अशी राहते, त्याचबरोबर जमिनीची सच्छीद्रता अधिक प्रमाणात वाढण्यास बरीच मदत होते.
  4. जमिनीतील जिवाणूच्या संख्येत वाढ होते- सेंद्रिय शेती करताना जे सेंद्रिय खत वापरले जाते त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि तसेच जमिनीत असणार्‍या जिवाणूच्या संख्येत वाढ होते कारण जमिनीची सच्छिद्रता वाढते  आणि त्यामुळे  जमिनीच्या कार्य क्षमतेत देखील वाढ होते.
  5. प्रदूषण कमी होण्यास मदत- सेंद्रिय शेती करत असताना त्याचा पर्यावरणाला देखील बराच फायदा होतो आणि जमिनीची झीज होत नाही तसेच सुपीकता टिकून राहते. सेंद्रिय शेती केल्याने आपल्या पर्यावरणालाही बर्‍याच प्रमाणात फायदा होतो.
  6. रोग राई कमी होते – सेंद्रिय शेती करत असताना आपण जनावरांची विष्ठा आणि इतर काडी कचरा व पाला-पाचोळा वापरुन सेंद्रिय खत हे तयार करत असतो, त्यामुळे हे सर्व शेतीतील घटक जमनीत कुजले गेल्याने गावात आणि परिसरात यामुळे पसरणारी रोगराई आणि दुर्गंधी होण्याचे प्रमाण हे नाहीसे होते.

सेंद्रिय शेतीची उद्दिष्टे

सेंद्रिय शेती माहिती / सेंद्रिय शेती म्हणजे काय /  सेंद्रिय शेती फायदे/ सेंद्रिय शेती प्रकल्प महत्व / सेंद्रिय खत निर्मिती
सेंद्रिय शेतीची उद्दिष्टे

सेंद्रिय शेतीचे सर्वात जास्त प्रमाणात परिचित असलेले सर्वात महत्वाचे उद्दीष्ट म्हणजे, शेत जमिनीची सुपीकता वाढवणे, हे या प्रकारच्या शेतीचे सर्वात मुख्य उद्दीष्ट समजले जाते; परंतु या व्यतिरिक्त देखील आणखी बरेच काही उद्दीष्ट आहेत, ज्यामुळे ह्या प्रकारची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते ती उद्दिष्टे म्हणजे –

  1. पर्यावरणास अनुकूल आणि लाभदायक अश्या प्रकारची शेती करणे. तसेच केल्या जाणार्‍या शेती मधून अल्प-भू-धारक शेतकर्‍यांना देखील लाभ झाला पाहिजे.
  2. जेंव्हा शेती करण्यासाठी लागणारी साधने आणि उपकरणे ही उपलब्ध नसतील, तेंव्हा देखील त्या शेतकर्‍यांना उत्पन्नाची आणि उत्पादनाची वाढ होईल, हे उद्दीष्ट साध्य झाले पाहिजे.
  3. आपल्या भागातील जैव-विविधतेचे चक्र सुरळीत चालले पाहिजे, आणि त्याच बरोबर सर्व नैसर्गिक संसाधनाचे जतन केले जावे, हे देखील महत्वाचे उद्दिष्ट ह्या प्रकारच्या शेतीचे आहे.
  4. आपल्या कृषिप्रधान भारत देशात, सर्व शेतकर्‍यांना त्यांच्या कामाची मिळकत आणि मालाला भाव मिळण्यासाठी उत्तम गुणवत्तेचा माल काढत असताना जमिनीचा पोत खराब न होऊ देणे आणि कमी खर्चात शेतीची सर्व कामे मार्गी लावली जाण्याचे उद्दीष्ट साध्य करणे.
  5. रासायनिक खतांचा वापर करून, शेतीतून काढले जाणारे खाद्य पदार्थ हे आरोग्यास हाणीकारक ठरू शकतात, त्यामुळे सेंद्रिय शेतीचे अजून एक महत्वाचे उद्दीष्ट म्हणजे आरोग्यासाठी सुरक्षित असे वेगवेगळे खाद्य पदार्थ यांचे उत्पादन घेणे.

साधारणपणे वरील सर्व सेंद्रिय शेती करण्याचे महत्वाचे उद्दीष्ट आहेत, हे सर्व उद्दिध्ट साध्य करणे, हाच या प्रकारच्या शेती प्रकल्पाचा उद्देश आहे. आता आपण पाहूया की, सेंद्रिय शेती करण्यासाठी वापरण्यात येणारे कोणकोणते सेंद्रिय खत आहेत आणि ते कशापासून मिळवले जातात, या विषयीची संपूर्ण माहिती –

सेंद्रिय खते / सेंद्रिय खत निर्मिती

सेंद्रिय शेती माहिती / सेंद्रिय शेती म्हणजे काय /  सेंद्रिय शेती फायदे/ सेंद्रिय शेती प्रकल्प महत्व / सेंद्रिय खत निर्मिती
सेंद्रिय खत निर्मिती

सेंद्रिय खत म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच झाले असेल, सेंद्रिय खत म्हणजे, शेतातील वनस्पति, प्राणी यांच्या पडलेल्या अवशेष पासून जे खत बनवले जाते, ते म्हणजे सेंद्रिय खत होय. तर या सेंद्रिय खतात प्रामुख्याने खालील खतांचा समावेश होतो, ते म्हणजे

शेणखत – सेंद्रिय शेती खत निर्मिती

सेंद्रिय शेणखत निर्मिती ही प्रामुख्याने बरेच सेंद्रिय शेतकरी करत असतात. हे सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी गाई-म्हशीचे शेण, मूत्र, गोठ्यातील पाला-पाचोळा आणि काडी-कचरा या सर्व घटकांना कुजवून जे खत तयार केले जाते, त्याला शेणखत असे म्हणतात. सेंद्रिय खत निर्मिती केल्याने या खत मधून आपल्याला नत्र, स्फुरद, आणि पालाश हे घटक मिळतात.

गांडूळ खत – सेंद्रिय खत

गांडूळ खत हे जिवाणू खत म्हणून देखील ओळखले जाते. गांडूळ खत हे जमिनीतील गांडूळांची विष्ठा, इतर कुजलेले पदार्थ, गांडूळांची अंड बीजे तसेच इतर अनेक जमिनीस उपयुक्त असलेल्या जिवाणूंचा समावेश करून तयार केलेल्या खताला गांडूळ खत असे म्हणतात.

कंपोस्ट खत

शेतातील उर्वरित पाला-पाचोळा, कापणी नंतर राहिलेले पिकांचे अवशेष, काढलेल्या उसाचे राहिलेले पाचट, भुसा, कापसाची धसकटे तसेच जमिनीतील इतर काही सूक्ष्म जीव-जंतु यांचे विघटन होऊन जे खत तयार केले जाते, त्या खतास कंपोस्ट खत असे म्हणतात. या खत मध्ये देखील जास्त प्रमाणात नत्र, पालाद आणि स्फुरद असते.

माशाचे खत

समुद्र किनारी जर तुमचे शेत असेल आणि तुमच्या सभोवतालच्या परिसरात कुणी मासेमारी करत असेल तर, माशांच्या उरलेल्या अवशेशांपासून तसेच माशाचे तेल काढल्या नंतर उरलेल्या अवशेषाला कुजवून जे खत तयार केले जाते त्याला, माशाचे खत असे म्हणतात, आणि यात मात्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण हे अधिक असते.

हिरवळीचे खत – सेंद्रिय खत निर्मिती

जे पीक लवकर वाढतात त्या पीकांची निवड केली जाते आणि , त्यांची दाट पेरणी करुन पीक फुलो-यावर येण्याच्या आधी ते नांगराच्या मदतीने जमिनीत गाडतात त्यापासून जमीनीला नत्र मिळते. जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात. ह्या गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी जवळपास दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो. 
ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी आणि  बरसीम व ग्लीरीसिडीया यांच्या तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो.मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होते. त्यामुळे सेंद्रिय शेती करत असताना, हिरवळीच्या खताचा फायदा होतो।

सारांश – सेंद्रिय शेती माहिती/ सेंद्रिय शेती फायदे / सेंद्रिय शेती प्रकल्प महत्व / सेंद्रिय शेती खत निर्मिती

अशाप्रकारे, तुम्ही सेंद्रिय शेती केल्याने तुमच्या जमिनीचा पोत देखील कायम राहील, गुणवत्ता देखील टिकून राहील, पर्यावरणाला देखील हानी पोहचणार नाही. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे बाजारात या सेंद्रिय मालाला सर्वात जास्त मागणी आणि भाव आहे जो तुम्ही सेंद्रिय शेती केल्यास तुम्हाला नक्कीच मिळेन.

या प्रकारची शेती केल्याने तुमच्या शेत मालाचे उत्पादन हे अनेक पटीने वाढेल आणि त्यामुळे तुमचे उत्पन्न देखील वाढेल. रासायनिक शेती ही पावसावर अवलंबून राहते, त्यामुळे जर तुम्ही सेंद्रिय शेती केली तर तुम्हाला पाऊस कमी पडला तरी त्याचा फटका हा बसणार नाही.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले” सेंद्रिय शेती माहिती /सेंद्रिय शेती फायदे/ सेंद्रिय शेती प्रकल्प महत्व / सेंद्रिय खत निर्मिती, याविषयीची घरगुती माहिती ” कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात