You are currently viewing लिव्हर खराब होण्याची लक्षणे | कारणे | उपाय | आयुर्वेदिक औषध

लिव्हर खराब होण्याची लक्षणे | कारणे | उपाय | आयुर्वेदिक औषध

लिव्हर खराब होण्याची लक्षणे /लिव्हर साठी घरगुती उपाय/ लिव्हर वर सूज येण्याची कारणे / लिव्हर साठी आयुर्वेदिक औषध >> लिव्हर हे आपल्या शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवातील एक अवयव समजला जातो. लिव्हरला मराठी मध्ये यकृत असे म्हणतात. खर तर, हे यकृत मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. जे शरीरातील बरेच महत्वाचे कार्य करीत असते.त्यामुळे याची काळजी घेणे आणि याबाबत संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे त्यासाठी हा आरोग्यविषयक लेख सादर करीत आहोत. जेणे करून तुम्हाला अशा स्वरुपाच्या समस्या जाणवल्या तर तुम्ही काही उपचार करून आराम मिळवू शकता आणि ज्या कारणांमुळे हे आजार होतात, त्यापासून स्वतःला दूर ठेऊ शकता. परंतु लक्षात असू द्या असे काही आजार असतात त्यावर प्राथमिक उपचार म्हणून घरगुती उपाय करायचे असतात, अति गंभीर परिस्थिती निर्माण होण्याआधीच वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.

यकृत म्हणजेच लिव्हर, हे लिव्हर आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे, खाल्लेल्या अन्नातून जे पौष्टिक तत्व शरीराला मिळालेले आहेत त्याचे चयापचाय करणे आणि त्या अन्नाची साठवणूक करणे तसेच हे साठवणूक करत असताना जर काही शरीरास घातक रासायनिक पदार्थ शरीरात आले असतील तर त्या पासून शरीराला सुरक्षित ठेवणे, तसेच इतर आजरापासून आराम मिळवण्यासाठी आपण जी औषधी घेतो त्या औषधा पासून जे विष समान घटक तयार होत असतात, त्यापासून शरीराला सुरक्षित ठेवण्याचे कार्य यकृत म्हणजेच लिव्हर करीत असते. एखाद्या व्यक्तिला अल्कोहोल ची सवय असेल तर त्या अल्कोहोल , मधील घटक द्र्व्व्या पासून पोटाचे रक्षण करणे देखील लिव्हरच करत असतो, त्यामुळे अति अल्कोहोल असलेल्या व्यक्तीच्या सरळ लिव्हर वर परिणाम होतो आणि शेवटी तिचे लिव्हर काम करणे बंद पडते. यालाच लिव्हर फेल होणे असे म्हणतात.

लिव्हर खराब होण्याची लक्षणे /लिव्हर साठी घरगुती उपाय/ लिव्हर वर सूज येण्याची कारणे / लिव्हर साठी आयुर्वेदिक औषध
लिव्हर खराब होण्याची लक्षणे

शरीरात या सर्व क्रिया करण्यासाठी लिव्हर ची स्वतःची अशी एक विशिष्ट संरचना असते आणि या संरचनेतच लिव्हर त्याचे कार्य करत असतो परंतु लिव्हर म्हणजेच यकृत खराब झाल्यास किंवा त्याच्या कार्यातील व संरचनेतील कार्यात कुठे जरी कोणतीही विसंगती झाली तर, यकृताचे आजार म्हणजेच लिव्हर खराब झाल्याची शक्यता असते. लिव्हर च्या आजार चे निदान करण्यासाठी रक्त-तपासणी, अल्ट्रा-सोनोग्राफी, सी.टी.स्कॅन, किंवा लिव्हर बायोप्सी या चाचण्या केल्या जातात. यकृतच्या, लिव्हर खराब होण्याची सर्वात अंतिम अवस्था ही लिव्हर काम करणे बंद पडणे ही आहे, शक्यतो असे केवळ लवकर निदान न झाल्यास अथवा अती-अल्कोहोल घेतल्यास होते. आता आपण पाहूया की, नेमके कोणती लक्षणे ही लिव्हर खराब झाल्यास जाणवतात.

Topics

लिव्हर खराब होण्याची लक्षणे

लिव्हर च्या आजारात सुरूवातीस लक्षणे स्पष्ट समजत नाहीत आणि ती दिसून आली तरी त्यात संदिग्धता असते म्हणजेच ही लक्षणे निश्चित-अनिश्चित स्वरूपाची असतात. परंतु लिव्हवरच्या पेशींवर जखम आणि दुरुस्तीच्या वेळी लिव्हर खराब होण्याची लक्षणे दिसू लागतात. लिव्हर खराब होण्याची खालील काही गंभीर लक्षणे आहेत, जी लिव्हर खराब होत असल्याचा संकेत देत असतात.

रुग्णाच्या पोटावर बरीच सूज येते

लिव्हर खराब होण्याच्या सर्व लक्षणात, हे सर्वात लवकर लक्षात येणारे आणि ठळक लक्षात येणारे दार्शनिक लक्षण आहे, ज्यात रुग्णाचे पोट हे लिव्हर खराब झाल्याने अगदी गर्भवती महिलेसारखे सुजते. अशी पोटावर सूज येणे हा लिव्हर सिरोसिस चा गंभीर आजार समजतो आणि यात पोटात एक द्रव्य तयार होते ज्यात रक्त, प्रोटीन, एल्बुमीन चा स्तर समाविष्ट असतो. त्यामुळे असे जर पोट सुजले तर शक्यता असते की, लिव्हर खराब झालेले असू शकते.

रुग्णास लघवी पिवळी येते

लिव्हर खराब झाल्याने शरीरातील रक्तात बिलिरुबिनचा वाढलेला स्तर हा शरीराच्या बाहेर काढण्यास खराब झालेला लिव्हर काही प्रमाणात असमर्थ ठरतो आणि त्यामुळे मुत्राचा, लघवीचा रंग हा पिवळा होतो. अशी पिवळ्या रंगाची लघवी येणे, हे लक्षण प्रामुख्याने कावीळ चे असू शकते आणि त्यामुळेच कावीळ हा आजार लिव्हर ची समस्या असेल तर उद्भतो, असे म्हणतात॰

पोटात बर्‍याच वेदना होतात

लिव्हर खराब झाल्यास पोट जास्त प्रमाणात दुखण्याचे लक्षण जाणवते परंतु हे लक्षण अनिश्चित स्वरूपाचे समजले जाते कारण पोट इतर कारणामुळे देखील दुखू शकते. परंतु जर पोटात उजव्या बाजूस आपल्या बरगड्याच्या खाली आणि ओटीपोटाच्या वरच्या भागात दुखत असेल तर ते दुखणे, हे देखील लिव्हर खराब होण्याचे लक्षण असू शकते.

शौच काळी येणे

लिव्हर खराब झाले तर मूत्र-आणि शौच यांच्या रंगात परिवर्तन होते. म्हणजे लघवी पिवळी होते आणि संडास काळी होते. कधी कधी रक्त देखील येऊ शकते. हे लक्षण देखील लवकर लक्षात येण्यासारखे आहे. त्यामुळे अशी माल मूत्र यांच्या रंगात बदल होणे हे देखील लिव्हर खराब होण्याचे लक्षण असल्याने आपण लगेचच घरगुती उपचार करावा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कावीळ होणे

लिव्हर खराब होण्याची लक्षणे /लिव्हर साठी घरगुती उपाय/ लिव्हर वर सूज येण्याची कारणे / लिव्हर साठी आयुर्वेदिक औषध

कावीळ हा लिव्हरच्या आजारात सर्वात जास्त होणारा आजार आहे, म्हणजे लिव्हरचा आजार झाल्यास कावीळ होतो. या आजारात त्वचा, डोळे ,लघवी पिवळी होते कारण रक्तात बिलिरुबिन चा स्तर वाढतो जो एक पित्त निगडित असतो याच्या म्हणजेच बिलिरुबिनच्या वाढण्याणे शरीरात असणारे व्यर्थ घटक हे शरीरा बाहेर पडू शकत नाहीत.

द्रव प्रतिधारण होणे

एक तरळ पदार्थ, हा टाच आणि पायच्या तळव्या वर जमा होऊन त्याचे एक वेगळे लक्षण दिसण्यास सुरुवात होते त्याला औएडम असे म्हणतात. याचा अर्थ लिव्हर गंभीर स्वरुपात खराब झाल्याचे समजते. ज्यावेळी तुम्ही सुजलेल्या भागावर दाबता तेंव्हा बोट काढल्या नंतर देखील तो भाग तसाच दाबलेला दिसतो. अशा वेळी आपण ताबडतोब यावर विलाज करावा.

भूक कमी लागते

पोटावर सूज आल्याने, पोटात पाणी झाल्याने भूक कमी लागते आणि भूक नाही लागून जेवण न केल्याने, अशक्तपणा येतो. अन्न शरीरात नसताना असा अशक्तपणा आल्याने देखील लिव्हर हे फेल देखील होऊ शकते. त्यामुळे जर भूक लागत नसेल, जेवण जात नसेल अथवा पचनाची काही समस्या असेल तर ताबडतोब सर्व तपासणी करून घ्यावी कारण हे लिव्हर खराब होण्याक हे एक लक्षण समजले जाते.

थकवा, स्मृतिभ्रंश, संभ्रम जाणवणे

लिव्हर खराब झाल्यास जेवण न जात असल्याने थकवा येणे, चक्कर येणे, स्मरण शक्ती कमी होणे, काही गोष्टी न आठवणे अशा गोष्टी होऊ शकतात. जास्त प्रमाणात असे होत असेल तर लिव्हर हे फेल होण्याच्या स्थितीत असते. त्यामुळे तुमच्या दैनंदिन व्यवहारात, आणि कामात तुम्ही स्वतःच स्वतः कडे लक्ष देऊन का होत आहे याची शहानिशा करावी, जेणे करून समस्या अजून गंभीर होणार नाही.

त्वचेवर जळजळ किंवा खाज सुटणे

लिव्हर खराब झाल्यास त्वचेत असणार्‍या द्रव्यात कमतरता येत असल्याने त्वचा जाड पडते आणि लालिमा येऊन खाज सुटते. अशी खाज सुटणे किंवा जळजळ होणे हे लिव्हर च्या उद्भवणार्‍या आजाराचे लक्षण आहे.

वजन झपाट्याने वाढणे किंवा कमी होणे

वजन कमी जेवण करता देखील जोमाने वाढू लागले तर हे लिव्हर सिरॉसिस या आजाराचे लक्षण आहे. हा आजार लिव्हर च्या तक्रारींशी संबंधीत आहे त्यामुळे असे अचानक वजन खूप जास्त वाढणे किंवा कमी होणे हे लिव्हर खराब होण्याचे लक्षण आहे.

वरील सर्व लक्षणे ही लिव्हर खराब झाल्यास जाणवणारी आहेत परंतु ही सर्वच लक्षणे निश्चित स्वरुपात लिव्हर च्या आजारचीच आहेत असे नाही. आता आपण पाहूया की, लिव्हर वर सूज येण्याचे कारण काय आहे.

लिव्हर वर सूज येण्याची कारणे

लिव्हर ला जर विषाणूचे इन्फेकशन झाले तर सूज येऊ शकते. या आजारास हिपॅटिटीस असे देखील म्हणतात. पोटात विषाणूमुळे व्हाइरल इन्फेकशन होऊन लिव्हरला सूज येते आणि लिव्हरला सूज आल्याने कावीळ सारखे आजार होतात, याचे कारण म्हणजे-

दूषित अन्न, पाणी घेतल्याने

लिव्हर खराब होण्याची लक्षणे /लिव्हर साठी घरगुती उपाय/ लिव्हर वर सूज येण्याची कारणे / लिव्हर साठी आयुर्वेदिक औषध

उघडे अन्न आणि विहीर, नदी, ओढे, तलाव यातील पाणी आणि अन्न हे दूषित अन्न म्हणून ओळखले जाते. त्यामुळे असे अन्न किंवा पाणी आपल्या पोटात गेले तर त्या अन्न किंवा पाण्यातून हिपॅटायटीस A आणि Eया व्हायरसची लागण झाल्यास, लिव्हर वर सूज येते.

Hepatitis B रुग्णाच्या संपर्कात आल्याने

Hepatitis B हा आजार जर या लस नाही घेतली तर होतो तसेच ह्या व्हायरस शी पीडित व्यक्तीच्या, व्हाइरस बाधित रुग्णाच्या रक्त, थुंकी, लाळ, मलमूत्र, वापरलेल्या सुया यांच्या संपर्क आला तर याद्वारे संसर्ग होऊ शकतो आणि त्यानंतर लिव्हरला सूज येऊ शकते.

Hepatitis C व्हाइरस बाधित च्या संपर्कात आल्यास

जर तुम्ही अवयव प्रत्यारोपन म्हणजे लिव्हर दुसर्‍या व्यक्तीचे घेत असाल आणि त्या वेळी त्या व्यक्तिला आधीच Hepatitis लागण झालेली असेल तर चांगल्या व्यक्तिला देखील अवयव प्रत्यारोपन मुळे Hepatitis C ची लागण होते आणि लिव्हर वर सूज येऊ शकते.

Hepatitis D चा संसर्ग होणे

जर रुग्णास hepatitis B ची लागण झाली असेल तर तर त्याला hepatitis D चा संसर्ग होतो आणि लिव्हर वर सूज येते. त्यामुळे Hepatitis D चा संसर्ग होणे, हे देखील लिव्हर वर सूज येण्याचे कारण समजले जाते.

दारू

लिव्हर खराब होण्याची लक्षणे /लिव्हर साठी घरगुती उपाय/ लिव्हर वर सूज येण्याची कारणे / लिव्हर साठी आयुर्वेदिक औषध

अति जास्त प्रमाणात अल्कोहोल चे म्हणजेच दारू चे सेवन केल्याने लिव्हर वर सूज येते आणि कालांतराने लिव्हर खराब देखील होऊ शकते, त्यामुळे मद्यपाण आणि धूम्रपाण ही व्यसने त्वरित सोडावी.

अधिक वेदनाशामक औषधांचा वापर केल्याने

काही त्रास झाल्यास किंवा दुखल्यास आपण वेदनाशामक औषधींचा वापर करतो परंतु सतत जास्त प्रमाणात आणि नियमित हाय अॅंटीबायोटिक्स म्हणजे वेदनाशामक औषधीचा वापर केल्यास लिव्हर वर सूज येते.

लिव्हर साठी घरगुती उपाय / लिव्हर साठी आयुर्वेदिक औषध

आपल्याला जर वरील ठळक लक्षणे प्राथमिक स्तरावर जाणवली तर आपण त्वरित खालील उपायांचा अवलंब करावा, जेणे करून लिव्हरचे आजार कमी होण्यास, सूज आली असेल तर ती उतरण्यास मदत होईल.

मद्यपानची सवय असेल तर बंद करावे

लिव्हर खराब होण्याची लक्षणे /लिव्हर साठी घरगुती उपाय/ लिव्हर वर सूज येण्याची कारणे / लिव्हर साठी आयुर्वेदिक औषध

वर सांगितल्या प्रमाणे दारू, अल्कोहोल हे सर्वात प्रभावी कारण आहे लिव्हर खराब होण्याचे आणि लिव्हर वर सूज येण्याचे त्यामुळे आपण जर मद्यपान करत असाल तर ते त्वरित बंद करावे.

स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावाव्या

लिव्हर खराब होण्याची लक्षणे /लिव्हर साठी घरगुती उपाय/ लिव्हर वर सूज येण्याची कारणे / लिव्हर साठी आयुर्वेदिक औषध - स्वच्छतेच्या सवयी
सवयी

आपण ग्रहण करीत असलेले अन्न आणि पाणी, हे स्वच्छ असावे. कोणतेही अन्न खाताना, शौच वरून आल्यावर स्वच्छ हात धुवावे. स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावणे अत्यंत गरजेचे आहे. दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्न शरीरास अत्यंत घातक असते. त्यामुळे आजारापासून वाचण्यासाठी या चांगल्या सवयी असणे हे उत्तम आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.

उघड्यावरील पदार्थ खाऊ नये

उघड्या वरील पदार्थ खाल्ल्याने त्यावर ज्या माश्या बसतात त्या घाणीवर बसून परत अन्नावर बसतात आणि हे उघड्या वरचे अन्न खाल्ल्याने आपल्याला लिव्हर चे आजार होऊ शकतात. उघड्यावरील अन्न खाणे ही बर्‍याच वेळा अतिशय घटक ठरू शकते, त्यामुळे लिव्हर च्याच नव्हे तर बाकी सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी उघड्यावरील अन्न खाणे टाळावे.

रक्त घेताना, प्रत्यारोपन करताना हिपाटीतीस बाधित रुग्ण नसावा

Hepatitis C व्हाइरस हा जर प्रत्यारोपन करताना पीडित्न व्यक्तीच्या अवयव दानातून चांगल्या व्यक्तीस होऊ शकतो, त्यामुळे जेंव्हा तुम्ही कुणाचे रक्त किंवा अवयव घेत असाल तेव्हा तो व्यक्ति Hepatitis C व्हाइरस झालेला नाहीय याची काळजी घ्यावी.

हिपाटिटीसची लस घ्यावी

हिपाटिटीसची लस ही लिव्हर चे आजार होऊ नये यासाठी घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ही लस घेतल्याने हिपाटिटीस A आणि B या रोगाची लागण होत नाही. कारण हे दोन रोग म्हणजे लिव्हर वर घातक हल्ला करणारे आहेत. बर्‍याच वेळा एखाद्या साध्या चुका आणि दुर्लक्ष आपल्याला त्रासदायक ठरू शकते. ज्या प्रमाणे आपण लहान मुलांना वेळीच लस देतो तसेच आपण ही वेळ पडल्यास लस घ्यावी.

भोपळा, गुळवेल, हळद, धणे काळ मीठ टाकून घेणे

लिव्हर खराब होण्याची लक्षणे /लिव्हर साठी घरगुती उपाय/ लिव्हर वर सूज येण्याची कारणे / लिव्हर साठी आयुर्वेदिक औषध
गुळवेल

लिव्हर च्या कोणत्याही आजारा वर भोपळा, गुळवेल अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक औषध समजले जातात त्यामुळे गुळवेल रात्री पाण्यात भिजत घालावा आणि सकाळी गुळवेल च्या काड्या बाजूला काढून त्या पाण्यात भोपळा खिसून टाकावा व हळद, धने आणि काळे मीठ टाकून हे पाणी गरम करावे 1ग्लास असेल तर अर्धा ग्लास होईल येवढे उकळावे आणि थंड झाल्यास प्यावे.

गाजर आणि आवळयाचा ज्यूस

लिव्हर खराब होण्याची लक्षणे /लिव्हर साठी घरगुती उपाय/ लिव्हर वर सूज येण्याची कारणे / लिव्हर साठी आयुर्वेदिक औषध
अवळ्याचा ज्यूस

गाजर आणि आवळा हे दोन्ही लिव्हर च्या कार्य प्रणालीस मदत करणारे आणि आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरणारे असे आहेत, त्यामुळे तुम्हाला जर लिव्हर च्या तक्रारी असतील तर तुम्ही तीन ते चार आवळ्याचा मिक्सर मधून रस काढावा आणि त्यात दोन गाजर चा रस मिक्स करावा. हे दोन्ही योग्य प्रमाणात मिक्स करून त्या मध्ये चिमूटभर काळे मीठ घालावे त्याने तुमचा त्रास नक्कीच कमी होईल.

सारांश- लिव्हर खराब होण्याची लक्षणे / लिव्हर साठी घरगुती उपाय/ लिव्हर साठी आयुर्वेदिक औषध / लिव्हर वर सूज येण्याची कारणे

लिव्हर हा आपल्या शरीरात अतिशय महत्वाचा अवयव ग्रंथी आहे. ज्याप्रमाणे श्वास आणि हृदय बंद पडल्यास आपण जीवंत राहू शकत नाही तसेच लिव्हर बंद पडल्यास देखील आपण जीवंत राहू शकत नाही, त्यामुळे वरील सांगितलेली लिव्हर खराब होण्याची लक्षणे आठळल्यास लगेचच त्यावर उपचार करावेत. या लेखात सांगितलेले हे उपाय, प्रथमोपचार म्हणून करावेत आणि फरक वाटत नसल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.

आपल्याला वरील लेखा मध्ये आम्ही सांगितलेले, ” लिव्हर खराब होण्याची लक्षणे/ लिव्हर साठी घरगुती उपाय /लिव्हर वर सूज येण्याची कारणे ” कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (9) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (9) पोट (15) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Leave a Reply