दातांची काळजी कशी घ्यावी/ दातांचे आरोग्य / दातांचे आजार / how to take care of teeth >>>> दातांच्या काळजी ची गरज आज सगळ्यांनाच आहे, आधीच्या काळात तरी दातांच्या समस्या ह्या फक्त म्हातार वयात किंवा अति वयस्कर लोकांना येत असत, परंतु सध्याच्या काळात आपण पाहत आहोत की, लहान मुलांपासून तर माध्यम वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच दातांच्या समस्या या निर्माण झाल्या आहेत, त्यांना इतर डॉक्टरांच्या कडे जाण्यापेक्षा दातांच्या डॉक्टर कडे सर्वात जास्त वेळेस आणि आधी जावे लागते, परंतु त्यापेक्षा ह्या सर्व महागड्या डेन्टल ट्रीटमेंट घेण्या पेक्षा आपण आधी पासूनच दातांची काळजी घ्यावी ती कशी घ्यावी हीच माहिती आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही हा लेख सादर करीत आहोत.
आमच्या आधीच्या लेखातील दातांची कीड काढण्यासाठी काही घरगुती उपाय ही माहिती आपण वाचली असेल, तर आता आपण पाहूया कशा प्रकारे आपण दातांची काळजी घेऊन त्यांना खराब होण्यापासून, दातांचे आजार होण्यापासून वाचवू शकता आणि त्यासाठी आम्ही हा अत्यंत महत्वपूर्ण असा लेख घेऊन येत आहोत दातांची काळजी कशी घ्यावी. चला तर मग सुरू करूया आजची माहिती. दातांची काळजी कशी घ्यावी आणि दातांचे आरोग्य या विषयी

दातांचे आरोग्य
आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण व्यायाम, योग्य आहार, आरोग्याची तपासणी करत असतो, आपल्या शरीरसोबत आपल्या दातांच्या आरोग्याची काळजी घेणे हे देखील अत्यंत महत्वाचे आहे, कारण जर दातांच्या आरोग्याच्या समस्या ह्या जर निर्माण झाल्या तर, शरीराच्या आरोग्याची काळजी घेतलीत तरी देखील शरीराला व्याधी जडू शकते, त्यामुळे दातांचे आरोग्य देखील सांभाळणे हे गरजेचे आहे, त्यामुळे आता आपण पाहू की, दातांचे आरोग्य म्हणजे काय आणि ते कसे जपावे हे आपण पाहूया-
तर दातांचे आरोग्य म्हणजे आपल्या शरीराच्या इतर भागाला रक्तपुरवठा करणार्या ज्या रक्त वाहिन्या आहेत अगदी त्याच प्रमाणे आपल्या दातांना देखील रक्त पुरवठा करण्यासाठी हिरडी आणि त्या खाली रक्त वाहिन्या असतात, जर दातांना कीड लागली नाही किंवा दात खराब झाले नाहीत, तर या दातांना रक्त पुरवठा करणार्या रक्त वाहिन्या सुरळीत काम करतात, दातांना कीड लागत नाही, किंवा दात दुखत देखील नाहीत.
दातांच्या आरोग्याची काळजी नाही घेतल्यास हिरड्यांचे विकार देखील निर्माण होऊ शकतात. रोज दात स्वच्छ न ठेवल्यास त्या जागी आम्ल तयार होते आणि या तयार झालेल्या आम्ल मुळे दात खराब होतात, कीड लागते किंवा दातांना छिद्र पडतात. अशा वेळी हे छिद्र आणि कीड काढली गेली नाही तर तेथील रक्त वाहिन्या बाकीचे दात देखील खराब करतात. नंतर कीड लागलेला दात दुखण्यास सुरुवात होते आणि दात किंवा दाड पडते, त्यामुळे दातांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

दातांचे आरोग्य सांभाळणे हे आपल्या संपूर्ण जीवन शैली साठी अत्यंत महत्वाचे आहे, त्यासाठी खालील गोष्टी नक्की कराव्या.
- दातांनी कुठलेही झाकण वगैरे काढू नये, दातांच्या मुळाला आणि नस यावर तान पडून, हिरड्यांपासून दात ढीले होऊ शकतात. दातांना बर्याच प्रमाणात इजा होऊ शकते.
- कडक वस्तु जसे की सुपारी, बदाम चे बी, यांसारख्या कडक वस्तु आपल्या दातांनी फोडण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न करू नये. कडक पदार्थ खाणे टाळावे।
- दात सतत पिन किंवा सुई यांसारख्या वस्तूंनी कोरू नये, त्यामुळे दातांच्या मुळाणा आणि हिरड्यांना इजा पोहचू शकते.
- दातात काही अडकल्या सारखे वाटत असल्यास त्वरित दंत वैद्य कडे जाणे आणि त्यावर विलाज करावा, सारखे सारखे अडकलेले काढत बसल्यास दात आणखी झिजू शकतात आणि समस्या वाढू शकतात.
- लहान मुलांचे दुधाचे दात पडून गेल्यावर, नवीन येणार्या दातांना जीभ किंवा सारखे सारखे हात लावू देऊ नये.
- दातांचे आरोग्य जर चांगले ठेवायचे असेल तर, सुपारी, तंबाखू किंवा गुटखा यांसारखे कुठलेही व्यसन असल्यास त्वरित बंद करावे.
- दातांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी कल्शियम वाढवण्यासाठी आवशयक ते पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करावेत, त्यामुळे आपले दात चांगले राहतील.
- दात पांढरे करण्यासाठी दाब देऊन जोरात घासू नये, त्यामुळे हिरड्यांच्या त्वचेला इजा होऊ शकते आणि दातांची झीज देखील जास्त प्रमाणात होते.
हे सर्व झाले दातांच्या आरोग्याच्या बाबतीत आवशयक असणारे सर्व मुद्दे, आता आपण पाहूया की, दातांचे आरोग्य सांभाळण्यासाठी आपण दातांची काळजी कशी घ्यावी, दात खराब होऊ नयेत म्हणून काय करावे, याविषयी अधिक माहिती.

दातांची काळजी कशी घ्यावी / how to take care of teeth in marathi
खालील प्रकारे तुम्ही तुमच्या आणि लहान मुलांच्या दातांची काळजी घ्यावी-

रोज दोन वेळेस ब्रश करणे
आपण जे खातो त्याने दातांवर आम्ल तयार होते आणि दात खराब होतात. तयार झालेले आम्ल हे दातांच्या रूट जवळ कीड म्हणजेच छिद्र पडण्याचे कारण बनते, आणि तो दात पुर्णपणे खराब होऊ शकतो, त्यामुळे रोज सकाळी तर ब्रश करावाच, परंतु; रात्री झोपताना देखील रोज पालकांनी स्वताः आणि मुलांना रात्री झोपताना ब्रश करण्याची सवय लावावी. दातांची काळजी कशी घ्यावी यासाठी हा सर्वात उत्तम मार्ग आहे.

कोलगेट पावडर ने दात साफ करावे
आपण पाहतो, की बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट हे उपलब्ध असतात, परंतु काही वेळेस ह्या जेल पेस्ट ने दात साफ करण्याएवजी पावडर पेस्ट वापरून बोटाने दात साफ करावे त्यामुळे बोटांचा दाब हिरड्या आणि दातांवर पडून, दातांचे आरोग्य उत्तम राहते.
हिरडीचा बोटाने मसाज करणे
ज्या प्रमाणे, आपल्या शरीराचा व्यायाम आणि मसाज आवश्यक आहे, अगदी त्याच प्रमाणे दातांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी, तुम्हाला तुमच्या दातांचा मसाज करणे हे, देखील अत्यंत आवश्यक आहे. दातांचा मसाज होण्यासाठी, आणि दातांचा रक्तप्रवाह हा सुरळीत चालू राहण्यासाठी हिरडीचा बोटाने मसाज करणे हे अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे रोज रात्री तोंडात मीठाचे पाणी धरून, तोंड बंद करून बोटाने हिरडीला हळुवार पणे मसाज करावी, त्यामुळे दातांना होणारा रक्तप्रवाह हा सुरळीत होईल आणि दातांचे आरोग्य हे उत्तम राहील.
जेवण केल्यानंतर व काही गोड खाल्ल्या नंतर चूळ भरणे
दातांवर आपण जे खातो, त्या अन्नाचे कण बसू नये यासाठी नियमित पणे, काहीही खाल्ले तरी चूळ भरावी, त्यामुळे दात खराब होत नाहीत. सहसा गोड पदार्थ खाल्ले तर आवर्जून दात साफ होण्यासाठी, दातांवर अन्नाचे कण न राहण्यासाठी जेवण केल्यानंतर चूळ भरावी, दातांची चूळ भरल्याने दातांवर साचलेले अन्न निघून आहे, जर हे अन्न तसेच राहिले तर त्यामुळे food lodgement होऊन दात खराब होण्यास सुरुवात होते.
हिरड्याची काळजी घ्यावी
ज्या प्रमाणे झाडाच्या रोपणाचे मूळ हे जमीन असते, अगदी त्याच प्रमाणे आपल्या दातांच्या उभारणीचे मूळ हे हिरड्या असतात, जर आपल्या दातांच्या हिरड्यांचे आरोग्य निरोगी असेल, तर आपले दात देखील निरोगी राहतात. दातांच्या हिरड्याचे हाड खराब झाल्यास दातांचे आरोग्य हे धोक्यात येते, या आजारास पायोरिया असे म्हणतात. या आजाराचे लक्षण म्हणजे, हिरडी सुजणे, हिरडीतून रक्त येणे, दुर्गंधी येणे, दात हालणे. यांसारखी लक्षणे जाणवू लागल्यास दंतवैदयचा सल्ला अवश्य घ्यावा, नाहीतर तुमच्या दाताचे आरोग्य हे धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आपल्या हिरड्यांची आवर्जून काळजी घ्यावी.
माऊथ वॉश चा वापर करणे
ज्या प्रमाणे अन्न जर भांड्याला राहिले, तर ते आपले पोट खराब करू शकते, अगदी त्याच प्रमाणे, खाल्लेल्या अन्नाचा अंश दातांवर किंवा दाता मध्ये राहिल्यास, ते दात खराब करू शकतात, त्यामुळे काहीही खाल्ले की, गुळण्या कराव्या किंवा ब्रश करावा, हे आपण वर वाचलेच, परंतु जर Chlorhexidine mouth wash ने गुळण्या केल्यास तोंडतील अधिक आम्ल नाहीसे होते मधुमेह म्हणजेच डायबटीस च्या रुग्णाणी याचा वापर अवश्य करावा.
ही झाली संपूर्ण माहिती दातांची काळजी कशी घ्यावी याविषयी, आता आपण पाहूया, जर आपण अशा प्रकारची काळजी नाही घेतली गेली तर, दातांना कोणत्या प्रकारचे आजार हे होऊ शकतात.

दातांचे आजार
जर आपण दातांची योग्य प्रकारे काळजी नाही घेतली, किंवा सतत सतत दातांना हानी पोहचेल अशा प्रकारे काही गोष्टी करत राहिलो तर नक्कीच तुमच्या दातांना खालील आजार होण्याची संभावना नाकारता येणार नाही. काही वेळेस दातांची योग्य काळजी घेऊन देखील, दातांचे आरोग्य हे धोक्यात येते आणि दातांचे काही आजार हे आपल्या मागे लागतात, तर ते आजार म्हणजे
पायोरिया Pyorrhoea
पायोरिया हा आजार हिरड्या आणि दातांच्या हाडशी संबंधित आहे, हिरडीतून रक्त येणे, हिरडीला सूज येणे, दाताचे हाड खराब होणे तोंडातून दुर्गंधी येणे, दात हालणे यासारख्या समस्या जाणवल्यास हा दातांचा आजार म्हणजेच पायोरिया असण्याची शक्यता आहे. पायोरिया या आजारात साधा ब्रश जरी केला तरी, त्यातून बरेच रक्त येते, तसेच हिरड्या लाल आणि पिवळ्या रंगाच्या दिसतात॰
दातात फूड लोजमेंट होणे, अन्न अडकणे
दातांच्या खराब होण्याची पहिली स्थिति म्हणजे दातात, food lodgement होणे, खालेल्या अन्नाचे कण अडकणे होय. दातांच्या मुळणा किंवा दोन दातांच्या फटी मध्ये काहीही खाल्ले तरी त्याचे कण जाऊन अडकून बसने, याला फूड लोजमेंट म्हणतात. हे असे बरेच दिवस झाले तर हळू हळू आम्ल तयार होऊन दातांना छिद्र देखील पडू शकते आणि मग त्या छिद्रात कीड लागून, दात किडण्यास सुरुवात होते.
दातांवर जास्त प्रमाणात आम्ल तयार होणे
दातांवर चिकट आम्ल हे जास्त प्रमाणात तयार होण्याची ही समस्या प्रामुख्याने जास्त करून शुगर असलेल्या लोकांच्या दातांना होते, काहीही खाऊन 3 तास जरी झाले, आणि जरा अधिक वेळ तोंड बंद राहिले, तर लगेचच दातांवर आम्ल म्हणजेच चिकटपणा जाणवणे, हा देखील एक दातांच्या आजाराचा भाग आहे. पूर्ण रात्रीतुन सकाळ पर्यंत तर हे या रुग्णाचे दात बरेच चिकट आणि आम्लयुक्त बनतात, यासाठी डायबटीस असल्यास आपण वरील mouth wash आवर्जून वापरावा.
दातांची झीज होणे
जास्त जोरात किंवा चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्यास दातांची झीज होण्यास सुरुवात होऊ शकते. काही वेळेस शरीरातील कल्शियम कमी झाल्यास देखील दातांची झीज होते. दातांची झीज होणे याला dental abrasion असे म्हणतात, हे टाळण्यासाठी शरीरातील कल्शियम योग्य राहणे अत्यंत महत्वाचे आहे.
दात आंबणे (Dental Hypersensitises)
बरेच लोक दात अगदी पांढरे शुभ्र करण्यासाठी दाब देऊन दात घासतात, परंतु त्यामुळे दात तर पांढरे होत तर नाहीतच याउलट दातांच्या वरचा इनमल Enamel चा थर हा झिजतो आणि त्याच्या आत असलेला डेंटिन Dentine चा थर हा उघडा पडतो आणि दात पिवळे पडण्यास सुरुवात होते. या आजारा मुळे थंड किंवा गरम पाणी, वारा, आंबट पदार्थ हे दातांना झोंबण्यास सुरुवात होते.
हा आजार टाळण्यासाठी, घरीच दाब देऊन जोरात दात घासण्यापेक्षा डॉक्टर कडे जाऊन दातसाफ करून घ्यावेत, त्यामुळे दातांच्या बर्याच समस्या कमी होतील आणि दातांचे आरोग्य उत्तम राहील.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आणि लहान मुलांच्या दातांची काळजी घ्यावी, दातांचे आरोग्य याकडे लक्ष द्यावे आणि जे काही दातांना होणारे आजार आहेत, त्या पासून तुमच्या दातांना वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न करावा, त्यामुळे तुमचे आहे तुमच्या दातांचे आरोग्य नक्कीच उत्तम राहील, यात काही शंका नाही.
सारांश – दातांची काळजी कशी घ्यावी
तुम्हाला जर दातांची काळजी कशी घ्यावी, दातांचे आरोग्य कसे सांभाळावे आणि दातांचे होणारे जे काही वेगवेगळे आजार आहेत, त्यापासून तुमच्या दातांना कसे सुरक्षित ठेवावे, याबाबत माहिती हवी असल्यास हा लेख तुम्ही अवश्य वाचावा. यात सांगितलेली दातांची काळजी कशी घ्यावी, ही माहिती नक्कीच तुम्हाला उत्तम आणि निरोगी दातांसाठी फायदेशीर ठरेल.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले ,’ दातांची काळजी कशी घ्यावी/ दातांचे आरोग्य / दातांचे आजार वर घरगुती उपाय / / how to take care of teeth‘ कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात