इसब त्वचारोग घरगुती उपाय/ इसब/ eczema in marathi / eczema treatment in marathi / इसब उपचार / इसब रोगाची लक्षणे>>> आपल्या शरीराची त्वचा ही शरीराच्या इतर सर्व अवयवा एवढीच महत्वाची असते. ज्या प्रमाणे आपली शरीर आणि सर्व अंतर्गत आणि बाह्य इंद्रिय हे निरोगी आणि सक्रिय कार्यरत असायला पाहिजेत अगदी त्याचप्रमाणे आपली त्वचा म्हणजेच स्कीन देखील निरोगी असली पाहिजे, सक्रिय असली पाहिजे ;
परंतु आपण पाहतोय की, अनेक गोष्टींचा परिणाम होऊन बर्याच वेळी त्वचेच्या काही समस्या या निर्माण होतात आणि त्या समस्येवर वेळीच औषधोपचार आणि घरगुती उपाय केले गेले नाहीत तर त्या समस्या नंतर गंभीर आजारात रूपांतरित होत असतात, त्यातीलच एक आजार आहे जो आपल्या त्वचेशी निगडीत असतो आणि तो म्हणजे इसब त्वचारोग.
इसब हा आजार किंवा समस्या तशी दुर्मिळ असली तरी तिचे ज्ञान असणे हे आवश्यक आहे आणि त्याच साठी हा लेख आणि यातिल ” इसब त्वचारोग घरगुती उपाय/ इसब/ eczema in marathi / eczema treatment in marathi / इसब उपचार” माहिती या आजारावर परिणामकारक ठरणारी आहे, तर आता आपण जाणून घेणार आहोत अधिक माहिती या इसब विषयी, इसब हा एक त्वचा विकार आहे, या आजाराला इंग्लिश मध्ये eczema असे म्हणतात. काही वेळेस हा आजार अतिशय दाहक असा त्रास देणारा ठरतो, त्यामुळे कोणत्याही त्वचेच्या समस्येला छोटे न समजता त्यावर त्वरित घरगुती उपाय करावा.
त्वचेची समस्या हे देखील जटिल आणि गुंतागुंतीच्या आजारात समाविष्ट असल्याने या उपायांचा प्रभाव न जाणवल्यास आपण वैद्यकीय सल्ला हा अवश्य घ्यावा, जेणे करून ही अथवा इतर कोणतीही समस्या ही न वाढता तिच्यावर योग्य तो औषधोपचार केला जाईल. चला तर पुढील लेखात जाणून घेऊया इसब उपचार याविषयी आणि त्याच्या लक्षणाविषयी अधिक माहिती.

Eczema in marathi
एक्झिमा ही एक आपल्या त्वचेला होणारी समस्या आहे, यामध्ये शरीरावर असणार्या त्वचेला लालसरपणा येत असतो, तसेच अतिशय दाह होतो म्हणजेच त्वचा खूप खाजवावी वाटते, तसेच काही वेळेस त्वचेवर खवले देखील येऊ शकतात, तर जास्त खाजवले गेले तर जखम देखील होते परंतु तरी देखील खाज कमी होत नाही. काही रुग्णांना इसब झाल्यानंतर त्वचा सुजण्याची देखील समस्या त्रास देते. इसब झाल्यास शरीराला अगदी खवले पडल्या सारखी त्वचा दिसू लागते. काही वेळेस नखाने जास्त खाजवले गेल्याने यातून रक्त देखील निघते, त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच उपचार करावेत.
इसब हा आजार तसा बर्याच लोकांना माहिती नाही त्यामुळे याची लक्षणे काय आहेत हे देखील माहीत असायला हवे. तर साधारणपणे इसब या आजाराची लक्षणे, त्वचा लाल होणे किंवा रंग जाणे, इसब झालेल्या भागाची त्वचा कोरडी पडणे, त्या भागावर सूज येणे, चट्टे पडणे, खरपुडया निघणे, यांसारखी काही लक्षणे ही हा इसब आजार झाल्यास दिसतात.
इसब होण्याचे काही कारणे आहेत, त्यातील सर्वप्रथम समजले जाणारे कारण म्हणजे वैयक्तिक अस्वच्छता, अस्वच्छतेमुळे हा आजार जास्त करून होतो, तसेच चुकीचा आहार म्हणजे त्वचेला खाज आणणारे पदार्थ खाल्याने जसे की चमकुराचे पाने (पोथीचे पाने). तेलगट किंवा अति तिखट पदार्थ खाल्याने देखील इसब त्वचारोग होऊ शकतो तसेच जर तुमची त्वचा अति संवेदनशील असेल आणि तुमच्या त्वचेला कशाचीही अॅलर्जी होत असेल तर हे देखील इसब होण्याचे कारण असू शकते.

इसब रोगाची लक्षणे
- त्वचेला खाज सुटते.
- त्वचेचे खवले निघाल्या सारखे दिसतात.
- त्वचा काळी पडल्या सारखी दिसते.
- त्वचेला दाह होत असल्या सारखे वाटते.
- त्वचेवर काळ्या रंगाचे पुरळ दिसू लागतात.
आता आपण पाहुयात की, या इसब आजारावर आपण कोणते उपाय आणि उपचार करू शकतो
इसब त्वचारोग घरगुती उपाय / eczema treatment in marathi / इसब उपचार
इसब हा त्वचेचा आजार झाल्यास आपण खालील लेखात सांगितलेले काही घरगुती उपाय आणि इसब उपचार करू शकता. प्रत्येक उपाय हा सर्वांचा फायदेशीर ठरेल असे नाही, त्यामुळे तुमच्या त्वचेच्या सेन्सिविटी प्रमाणे उपाय करावेत आणि फरक न जाणल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
इसब झालेल्या जागी टी ट्री ऑइल ने मसाज करणे
इसब आजारात त्वचेचा जो दाह होतो आणि लालसर पणा येतो, तो घालवण्यासाठी टी ट्री ऑइल अत्यंत उपयोगी आहे. त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर किंवा इयर बर्ड वर थोड्या प्रमाणात हे ऑइल घ्यावे आणि त्याने हळूवार जखम झालेल्या किंवा इसब ग्रस्त जागेवर लावावे. या उपायाने त्वचेवर जखम झालेली असेल तर ती भरण्यास देखील मदत होईल आणि हा आजार आणि इन्फेक्शन इतरत्र पसरण्यास अडकाव निर्माण होईल, त्वचा मऊ राहील.
गरम ठिकाणापासून स्वतःला दूर ठेवा
इसब झाल्यानंतर अतिशय जास्त प्रमाणात शरीरात दाह निर्माण होतो, त्वचेवर सतत जळजळ होत असते आणि त्यात जर आपण जास्त उष्णतेच्या ठिकाणी बसलो तर त्वचेची लाली वाढेल आणि त्वचेची जास्त हानी होईल. इसब मुळे होणारा दाह जर उष्ण जागी बसले तर असहय होईल, त्यामुळे गरम जागेपासून स्वतःला दूर ठेवावे, नेहमी थंड जागी जिथे उन्हाच्या झळा लागणार नाही, अशा जागी बसावे.

मध ने मसाज करणे
मध हा त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी वरदान आहे. मध हा आयुर्वेदिक औषधी म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या आजारावर हा अतिशय गुणकारी समजला जातो. मध हा उष्ण जरी असला तरी शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यास मदत करतो. बोटावर मध घेऊन त्याने खाज येत असलेल्या भागावर चोळणे किंवा मसाज करणे हे अत्यंत फायदेशीर ठरते त्यामुळे इसब या आजारावर मध ने मसाज करणे, हा उत्तम घरगुती उपाय म्हणून हमखास उपयोगी येतो.

ओट्स ची पेस्ट लावणे
उत्तम आहार म्हणून ओट्स चा सल्ला दिला जातो. आहारा सोबतच त्वचेसाठी देखील ओट्स उत्तम समजला जातो. ओट्स मध्ये सर्वात जास्त स्निग्ध घटक असते जी, इसब झालेल्या रुग्णाच्या रुक्ष आणि कोरड्या त्वचेला स्निग्धता देण्यास मदत करते. त्यासाठी चार पाच ओट्स घ्यावे आणि तीन तास पाण्यात भिजत घालावे नंतर ते मऊ पडले की, हाताने बारीक करावे किंवा मिक्सर मधून त्याची पेस्ट करावी आणि ही पेस्ट इसब झालेल्या भागावर लावून ठेवावी. अर्धा तास नंतर थंड किंवा कोमट पाण्याने किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्यावे. या उपायाने त्वचा मऊ आणि थंड पडते तसेच खवले असेल तर ते देखील कमी होतात.

कोरफड चा गर
कोरफड ही आरोग्यासाठी तसेच उत्तम त्वचेसाठी निसर्गाचे एक उत्तम वरदान आहे. चेहर्याला कोरफड कशी लावायची, या लेखात कोरफड चे उपयोग आणि वापर कसा करायचा हे आपण पाहिले. त्याच्याच प्रमाणे आपण कोरफड चा गर काढावा आणि हा इसब ग्रस्त असलेल्या त्वचेच्या भागी लावावा. कारण कोरफडचा गर देखील त्वचेच्या दाह ला शांत करण्यास बरीच मदत करतो.
नारळाचे तेल
नारळाचे तेल हे कोणत्याही जखमेस भरून काढण्यास मदत करते. जखम उघडी पडली असेल, किंवा झालेल्या जखमेची खपली निघाली असेल तर त्यामध्ये देखील घट्ट झालेले नारळाचे तेल भरावे, असे केल्याने जखम मऊ होते आणि थंडाव्याने त्वचेचा दाह शांत होतो. त्यामुळे नारळाचे तेल वापरणे, हा देखील घरगुती उपाय म्हणून इसब वर बराच फायदेशीर ठरतो.

पौष्टिक आहार
आपल्या शरीरावर आपल्या आहाराचा परिणाम होत असतो, त्यामुळे आपण जो काही आहार घेतोय तो, आपल्या शरीरास घातक आणि त्रासदायक ठरणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्याला इसब झाल्यास पौष्टिक आहार घ्यावा. जास्त प्रमाणात मांसाहार, तेलगट तिखट पदार्थ खाऊ नये तर स्निग्धता देणारे पदार्थ खावे. आहारात तुपाचा जास्त वापर करावा. दही, काकडी, लोणी याचा आहारात समावेश करावा.
सारांश – इसब त्वचारोग घरगुती उपाय/ इसब/ eczema in marathi / eczema treatment in marathi / इसब उपचार
अशा प्रकारे जर तुम्हाला इसब हा आजार झाला असेल तर, वरील माहिती आणि घरगुती उपाय म्हणून तुम्ही वरील लेखात संगीतलेली ऊयपी आणि उपचार करावेत, हे केल्याने तुम्हाला बराच आराम मिळेन आणि हळूहळू तुमचा इसब आजारमुळे होणारा त्रास आणि हा आजार देखील कमी होईल. असे करून देखील काही त्रास जाणवल्यास वैद्यकीय मार्गदर्शन घेणे हे हिताचे राहील.
आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले ,’ इसब त्वचारोग घरगुती उपाय /eczema in marathi / eczema treatment in marathi / इसब उपचार ‘ कसे वाटले आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात