कॅन्सर ची लक्षणे सांगा/ कर्करोग म्हणजे काय / कॅन्सरचे प्रकार / कॅन्सर विषयी माहिती सांगा/ cancer symptoms in marathi >>>आपल्या शरीराला अनेक आजार पासून वाचवणे हे अत्यंत गरजेचे आहे. जर काही आजार झाल्यास त्यावर ताबडतोब उपचार करून त्या पासून मुक्त होऊ शकता, परंतु काही आजार असे असतात, जे झाल्यास, त्याचे निदान लवकर होत नाही आणि आजार जास्त वाढून नियंत्रणात येणे हे अतिशय कठीण जाते, असे लवकर लक्षात लक्षात न येणारे आजार असणार्या आजारातीलच एक आजार म्हणजे, कॅन्सर. तर या आजारा विषयी अधिक माहिती आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही हा लेख सादर करीत आहोत.
काही वर्षांपूर्वी कॅन्सर हा अतिशय भयानक आणि कमी न होणारा आजार समजला जात असे, परंतु सध्या मात्र प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार पद्धती या सर्व गोष्टी मुळे कॅन्सर सारख्या भयानक आणि न बर्या होणार्या रोगावर देखील आपण नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो आहोत.

कर्करोग म्हणजे काय / कॅन्सर विषयी माहिती सांगा
कर्करोग म्हणजेच कॅन्सर. कर्करोग हा आधीच्या काळी अतिशय भयानक असा समजला जाणारा आजार होता, मात्र सध्या या आजारावर आपण मात करू शकतो, कारण वेगवेगळ्या चाचण्या द्वारे हा आजार तिसर्या टप्यात जाण्यापासून आणि आपल्या शरीरात वेगाने पसरण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो.
कॅन्सर किंवा कर्करोग म्हणजे शरीरात तयार झालेल्या अनावश्यक आणि अनियंत्रित पेशींचा समुच्चय होय. कर्करोग हा रुगांच्या कोणत्याही अवयवला, किंवा उतींना होऊ शकतो, जसे की, अन्न नलिका, जीभ, घसा, तोंड गर्भ पिशवी, स्तन, योनि, मूत्रपिंड यांपैकी कुठलाही अवयव हा आंनियंत्रित पेशींनी ग्रस्त झाला असेल तर, त्या अवयवला कॅन्सर म्हणजेच कर्करोग झाला असे आपण म्हणू शकतो.
या सर्व अवयवांवरूनच कॅन्सर, कर्करोग चे प्रकार ओळखले जातात, त्यामध्ये सर्वात सामाईक असणारे एक कॅन्सर चे लक्षण आणि वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या आणि अवयवांच्या मध्ये त्या भागात अनिर्बंध अशा उतींची आणि पेशींची वाढ होते, आणि त्याची गाठ तयार होते. आपल्या शरीरात कोणत्याही अवयवसाठी ठराविक अशी पेशींची वाढीची जागा असते, ती जास्त प्रमाणात व्यापल्यास, या पेशींच्या वाढीचा मार्ग रक्ता वाटे पसरत जातो. आणि कॅन्सर चा टप्पा देखील वाढत जातो. स्तनाचा किंवा गर्भाशयचा कर्करोग हा स्थानिक स्वरूपाचा असल्याने त्या ठिकाणी वाढलेल्या पेशी ह्या तेवड्याच स्थानिक अवयवर आक्रमण करतात, त्यामुळे तेवढा भाग काढून टाकला तर कर्करोग किंवा कॅन्सर च्या पेशी ह्या समूळ नष्ट होऊ शकतात, परंतु रक्ताचा कॅन्सर झाल्यास त्याचा विलाज करणे थोडे
कॅन्सर चे प्रकार
कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा शरीराच्या कोणत्याही अंतर्गत किंवा बहिर्गत भागात होऊ शकतो आणि त्यावर कॅन्सर चे प्रकार, म्हणजेच कर्करोगाचे प्रकार पडतात. तर कॅन्सर हा खालील पैकी कोणत्याही प्रकारचा असू शकतो, तुम्हाला खि व्यसन किंवा अयोग्य सवयी असतील तर त्याचा विपरीत परिणाम हा कॅन्सर आहे, जसे तंबाखू खाणे, सुपारी खाणे, मद्यपान करणे, तर काही वेळेस कोणत्याही वाईट सवयी किंवा व्यसणे नसल्यास देखील कर्करोग म्हणजे कॅन्सर हा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया माहिती, कॅन्सर च्या प्रकरणविषयी. तसे तर जगात आतापर्यंत जवळपास दोनशे पेक्षा ही अधिक प्रकारचे कॅन्सर झालेले रुग्ण आढळून आले आहेत, परंतु या लेखात आपण सर्वात जास्त आणि प्रामुख्याने जास्त प्रमाणात होणार्या कॅन्सर च्या प्रकारांविषयी जाणून घेणार आहोत.
रक्ताचा कॅन्सर
रक्ताचा कॅन्सर हा आटोक्यात आणणे तसे अतिशय कठीण आहे, कारण आपल्या संपूर्ण शरीरात रक्तवाहिन्या या पसरलेल्या असतात, त्यांमुळे या प्रकारच्या कॅन्सर ला नियंत्रणात आणणे तसे थोडे कठीण जाते. रक्ताचा कॅन्सर हा प्रामुख्याने अस्थिमज्जा म्हणजेच bone marrow मध्ये अनावश्यक ग्रंथी वाढून तयार होतो, त्यामुळे रक्तात white blood cells आणि red blood cells तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. कॅन्सर च्या इतर प्रकारातील हा सर्वात जास्त प्रमाणात त्रास देणारा, आणि लवकर बरा न होणारा कॅन्सर चा प्रकार समजला जातो. याविषयी अधिक माहिती देणारा लेख आम्ही लवकरच सादर करू.
गर्भ पिशवीचा कॅन्सर

गर्भ पिशवी चा कॅन्सर हा रक्ताच्या कॅन्सर येवढा भयानक आणि नियंत्रणात न येणारा प्रकार नाहीय, जर ह्या प्रकारचा कॅन्सर झाला तर शरीरातील ह्या भागाला तूनही काढून समूळ नष्ट देखील करू शकता कारण गर्भ पिशवीचा कॅन्सर हा स्थानिक म्हणजेच त्याच स्थानावर वाढलेल्या ग्रंथिंमुळे होतो. गर्भ पिशवी च्या कॅन्सर हा सहसा मध्यम वयस्क झाल्यानंतर म्हणजेच राजोनिवृती जवळ आल्यावर होण्याची शक्यता असते. या प्रकारच्या कॅन्सर मध्ये मासिक पाळीत गर्भ पिशवीला इजा झाल्याने जास्त रक्तस्राव होतो.
गर्भाशयात गाठी झाल्याने गर्भ पिशवीचा आकार देखील वाढतो आणि सूज येऊन खवले पडल्यासारखी अवस्था गर्भ पिशवीची होते, अशा वेळी डॉक्टर गर्भ पिशवी काढण्याचा सल्ला देतात, कारण या ठिकाणी स्थानिक उतींच्या वाढीमुळे गाठ तयार झालेली असते.
स्तनाचा कॅन्सर
स्तनाचा कॅन्सर हा स्तनामध्ये अतिरिक्त आणि अनियंत्रित स्वरुपात वाढलेल्या उती किंवा पेशींच्या संक्रमणामुळे स्तनात जी गाठ तयार होते त्यावरून ओळखला जातो. स्तनाचाकॅन्सर झाल्यास, स्तन कोणत्याही एका बाजूचा स्तन हा गाठ युक्त आणि दुसर्या स्तना पेक्षा आकाराने बेढब झालेला जाणवतो. तसेच त्यात असणारी गाठ देखील थोड्या बहुत प्रमाणात दुखते, हा स्तनाचा कॅन्सर झाला आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी बायोप्सी नावाची चाचणी करून तपासले जाते.
स्तनाचा कॅन्सर म्हणजेच स्तनाचा कर्करोग झाल्यास
घश्याचा कॅन्सर
घश्याचा कॅन्सर हा कॅन्सर चा प्रकार घशात वाढलेल्या आंनियंत्रित आणि असंख्य उतींमुळे होतो. घशा चा हा कॅन्सर होण्यामागे असणारे कारण काही वेळेस एखादे व्यसन देखील असू शकते. ह्या प्रकारच्या कॅन्सर मुळे रुग्णाचा आवाज बर्याच प्रमाणात खराब होऊ शकतो, बेढब होऊ शकतो. घशाची शस्त्रक्रिया करून ही गाठ काढली जाते आणि स्वरयंत्रचा काही भाग देखील काढला जातो॰
तोंडाचा कॅन्सर

तोंडाचा कॅन्सर होण्याचे सर्वात मुख्य आणि महत्वाचे कारण म्हणजे तुम्हाला कुठले तरी व्यसन असणे , हे आहे. तोंडाचा किंवा जबड्याचा कॅन्सर हा ज्या लोकांना गुटखा किंवा तंबाखू खाण्याची सवय किंवा व्यसन असते त्या लोकांना जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. या प्रकारच्या कॅन्सर मध्ये कॅन्सर ग्रस्त जबड्याचा भाग हा काढून टाकला जातो. सतत तंबाखू किंवा गुटखा खाल्याने तोंडाच्या आतील त्वचा आणि भाग खराब होऊन ह्या प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो.
अन्न नलिकेचा कॅन्सर – कॅन्सरचे प्रकार
अन्न नलिकेचा कॅन्सर हा श्वसन नलिका आणि अन्न नलिका याच्यात झालेल्या उतींच्या आणि पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो. ह्या प्रकारचा कॅन्सर झाल्यास रूग्णाला अन्न गिळण्यास आणि पचण्यास त्रास होतो. काही वेळेस जेवण करताना अतिशय जोरात ठसका देखील लागतो. हा अंतर्गत अवयवला होणारा असल्याने लवकर याचे निदान होत नाही, ज्याप्रमाणे स्तनाला किंवा तोंडला गाठ झाल्यास कॅन्सर ची शक्यता लक्षात येते तशी, ह्या प्रकारच्या कॅन्सर ची लक्षणे लवकर लक्षात येत नाहीत. अन्न नलिकेचा कॅन्सर झाल्यास, गाठ झालेला अन्न नलिकेचा भाग हा काढून टाकला जातो आणि त्या भागात कृत्रिम पाइप बसवला जातो.
कॅन्सर ची लक्षणे सांगा/ cancer symptoms in marathi

ज्या प्रमाणे कोणत्याही आजाराची लक्षणे ही आधीच लक्षात आल्यास आपण त्या आजाराला आपल्या शरीरात पसरण्यापासून रोखू शकतो, त्याच प्रमाणे ह्या कॅन्सर म्हणजेच कर्करोग ची लक्षणे लवकरात लवकर लक्षात येऊन त्यावर वेळीच योग्य तो औषधोपचार करणे आणि वैद्यकीय सल्ला घेऊन आवश्यक त्या सर्व चाचण्या करणे हे अत्यंत महत्वाचे आहे, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, की कॅन्सर वर सध्या कितीही उपयुक्त आणि परिणाम कारक विलाज आणि उपचार निघाला असेल तरी देखील त्याचा उपयोग आणि फायदा हा कॅन्सर पहिल्या किंवा दुसर्या टप्प्यात असेल तरच होतो, त्यामुळे वेळीच ही लक्षणे लक्षात घेऊन योग्य त्या सर्व चाचण्या आणि तपासण्या करणे हे सर्वात महत्वाचे आहे, आणि त्यासाठी तुम्हाला हा लेख, कॅन्सर ची लक्षणे, वाचणे, हे गरजेचे आणि महत्वपूर्ण आहे.
आपल्या आधीच्या लेखात आपण बर्याच आजारांची लक्षणे वाचलीत, जसे की, शुगर ची लक्षणे, कावीळ ची लक्षणे, लिव्हर खराब होण्याची लक्षणे त्याच प्रमाणे ही कॅन्सर ची लक्षणे समजून घेणे आणि जाणून घेणे हे फायद्याचे ठरेल, चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत नेमकी कॅन्सर ची लक्षणे म्हणजेच कर्करोगाची लक्षणे, जेणे करून कॅन्सर च्या पहिल्या टप्प्यातच तुमच्या ही लक्षणे लक्षात आल्याने ताबडतोब या आजारावर उपचार करता येईल.
खालील सर्व लक्षणे ही वर वाचल्या प्रमाणे कॅन्सर म्हणजेच कर्करोगाच्या वेगवेगळ्या प्रकाराची आहेत, कॅन्सर चे प्रकार हे ह्या सर्व लक्षणावरुनच ओळखले जातात, किंवा लक्षात येतात.
त्वचा खरबडीत झाल्यासारखी दिसणे – कॅन्सर ची लक्षणे
त्वचेवर कॅन्सर झाल्यास, किंवा शरीराच्या बहिर्गत भागात कॅन्सर झाल्यास त्या जागेवरची त्वचा किंवा खडबडीत झाल्यासारखी दिसते, त्वचेवर खवले आल्या सारखे दिसतात. अशा प्रकारे त्वचेवर खवले, किंवा त्वचा खडबडीत दिसल्यास, त्या जागी अतिरिक्त उती किंवा ग्रंथ वाढल्याने त्वचा ही खडबडीत झाल्याचे लक्षणे दिसू लागते.
शरीराच्या कोणत्याही भागावर गाठ झाल्यासारखे दिसणे
मुळात कॅन्सर हा आजार शरीरात झालेल्या पेशींच्या किंवा उतींच्या अनियंत्रित वाढीमुळेच होतो, त्यामुळे ज्या ही भागात अशी अनियंत्रित आणि अनावश्यक पेशींची वाढ झाल्यास त्या भागावर किंवा अवयवावर एका विशिष्ट आकारात गाठ झाल्यासारखी दिसते.
शरीरात अनियंत्रित पेशींची वाढ होत असताना या अनावश्यक आणि
अन्न गिळण्यास त्रास होणे – कॅन्सर ची लक्षणे सांगा
साधारण पणे, घशाचा किंवा अन्न नलिकेचा कॅन्सर झाल्यास ह्या प्रकारचे लक्षण जाणवते. घशात किंवा अन्न नलिकेत गाठ झाल्यास पेशी आणि उटी वाढल्यास अशा प्रकारे अन्न गिळ्न्यास त्रास होण्याचे लक्षण दिसते.
काहीही खाल्ले तरी अतिशय तिखट लागणे
काहीही खाले तरी तिखट लागणे,सारखे तोंड येणे, तोंडात फोड येणे हे सर्व तोंडाचा किंवा जबड्याचा कॅन्सर झालेला असण्याची शक्यता असते,
स्त्रियांना मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होणे
मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असेल, तर त्याचे कारण गर्भ पिशवी मध्ये काही तरी आजार झाला असेल, हे कारण असते. मासिक पाळीत वेदना दायक रक्तस्त्राव होण्याचे कारण म्हणजे गर्भपिशवीत कॅन्सर ची गाठ झाली असल्याची शक्यता ही, नाकारता येत नाही, आणि त्यासाठीच जर अशा प्रकारचे, मासिक पाळीत जास्त रक्त स्त्राव होणे हे लक्षण दिसू लागल्यास, योग्य त्या चाचण्या करून घ्यावा, जेणे करून जो ही आजार झाला असेल, त्याचे निदान लवकर होईल.
सारांश – कॅन्सर ची लक्षणे सांगा/ कर्करोग म्हणजे काय / कॅन्सरचे प्रकार / कॅन्सर विषयी माहिती सांगा / कॅन्सर ची गाठ कशी ओळखावी
कॅन्सर हा आजार आधीच्या काळी सर्वात क्लिष्ट आणि बरा न होणारा आजार समजला जात असे, परंतु सध्याच्या काळात मात्र अत्याधुनिक सोई आणि सुविधांमुळे तसेच वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे, या आजारावर आपण मात करू शकलो आहे, आणि काही विशिष्ट औषधोपचार केल्याने रूग्णाला झालेला हा आजार पुर्णपणे बरा होऊन, कॅन्सर ग्रस्त रूग्णाला पुनर्जन्म मिळत आहे. तर त्या विषयीची संपूर्ण माहिती आणि हा वाढण्याआधीच त्यावर उपचार करता यावेत, यासाठी हा कॅन्सर ची लक्षणे, लेख आम्ही घेऊन आलो आहोत.
आपल्याला माहितीच असेल की, कॅन्सर ची जे तीन टप्पे आहेत म्हणजे कॅन्सर च्या स्टेज , त्यातील पहिल्या दोन स्टेज मध्ये केलेल्या उपचारचाच जास्त फायदा होतो, त्यासाठी तुम्हाला वेळीच म्हणजे पहिल्या स्टेज मध्येच हा आजार लक्षात यावा यासाठी, या लेखात कॅन्सर ची लक्षणे सांगा, ह्या विषयी जी माहिती दिली गेली आहे, ती तुम्ही अवश्य वाचा, या माहितीचा तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या लोकांना नक्कीच फायदा होईल.
आपल्याला ” कॅन्सर ची लक्षणे सांगा/ कॅन्सरचे प्रकार / कॅन्सर विषयी माहिती सांगा/ cancer symptoms in marathi, ही घरगुती माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला सांगा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फाॅलो करा.
Products इतर इतर आजार इतर पदार्थ कान केस घर घरगुती उद्योग घसा चटणी डोळे तोंड त्वचा दक्षिण भारतीय पदार्थ दिवाळी फराळ नाक पाय पोट फायदे महाराष्ट्रीयन पदार्थ हात